Presentation of Success Stories of Schools Under School Leadership Development Program Guidelines
Presentation of Success Stories of Schools Under School Leadership Development Program Guidelines
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर
Maharashtra Institute of Educational Planning and Administration (MIEPA), Chhatrapati Sambhajinagar
जा.क्र/मिपा/SI.A/२०२५-२६/३०७
दिनांक -०४/०७/२०२५
प्रति,
- उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
- प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
- शिक्षणाधिकारी, बृहमुंबई, महानगरपालिका
- शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम दक्षिण/उत्तर)
- प्रशासन अधिकारी (मनपा/नपा/नप), सर्व.
विषय – शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यांनुसार सादर करणेबाबत.
संदर्भ – NCSL, निपा, नवी दिल्ली यांचे पत्र दि.23 में, 2025.
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील उत्तम शाळांच्या यशोगाथा (Case Study) मिपा संस्था, छत्रपती संभाजीनगर मार्फत NCSL., निपा, नवी दिल्ली येथे पाठविल्या जातात व NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल
मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या वेबपेज
//
वर प्रकाशित करण्यात आले आहे.
संदर्भिय पत्रानुसार सन 2025-26 मध्ये शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत, अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठवावयाच्या आहेत.
आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान 02 ज्यात शासकीय/जिल्हा परिषद/नगर परिषद/महानगरपालिका/कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या यशोगाथा सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन या कार्यालयाच्या miepasla2019@gmail.com या ईमेलवर दि.21/07/2025 पर्यंत Google Input मध्ये Arial Unicode MS या Font मध्ये टंकलिखित करुन Word व PDF स्वरुपात पाठवाव्यात.
सोबत
१ यशोगाथा लेखनासाठी क्षेत्रांची विषयांची यादी
२ यशोगाथा लेखन – मार्गदर्शक सूचना, समाविष्ट करावयाचे मुद्दे व Format.
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर
यशोगाथा लेखनासाठी क्षेत्र/ विषय निवडण्यासाठी संदर्भ यादी
- शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमता वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न
- शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये कौशल्य आधारित आणि व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न
- शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये पायाभूत शिक्षण मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यात सक्षम करण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न
- शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये लिंग समभाव व समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न.
- आदिवासी बहुल भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध कृती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न
- समता, सामाजिक ज्ञान आणि दिव्यांगासाठीचे शिक्षण समावेशन यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न शाळा यशोगाथा लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना
- लेखनाची भाषा मराठी/हिंदी/इंग्रजी
- एकूण लेखन शब्द मर्यादा अंदाजे 2500 ते 3000 शब्द
- वरील यादीतील क्षेत्रांपैकी एकाच क्षेत्रावर आधारित लेखन अपेक्षित
- मुख्याध्यापक व इतर सहकारी यांनी शाळेत घडविलेले सकारात्मक परिवर्तन यावर लेखन अपेक्षित
- सकारात्मक परिवर्तनाबाबत लेखन करतांना फोटो व व्हीडीओ लिक समाविष्ट करणे आवश्यक
- शाळेत / विद्यार्थ्यांत झालेले सकारात्मक परिवर्तन याबाबतची स्पष्ट माहिती यशोगाथेत आवश्यक आहे.
- शाळा निवड पूर्व प्राथमिक/ प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक / उच्च माध्यमिक
- शाळा व्यवस्थापन शासकीय जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका/ कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित शाळेची प्रारंभिक माहिती बाबत मुद्दे
- शाळेचे पूर्ण नाव, पत्ता व ईमेल आयडी
- मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी
- शाळेचे व्यवस्थापन
- शाळेचे माध्यम
- शाळेतील इयत्ता… ते…
- एकूण विद्याधर्थी संख्या
महत्वाचे 1. Google Input मध्ये Arial Unicode MS font.
- Word व PDF फाईल miepasla2019@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात.
Also Read 👇
Also Read –
School Leadership Development Program Guidelines
Regarding the submission of success stories of at least two schools which have made positive changes in different areas of school education in our district under the School Leadership Development Program as per the guidelines.
शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यानुसार सादर करणेबाबत.
Maharashtra Institute of Educational Planning and Administration (ΜΙΕΡΑ), Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर
जा.क्र/प्रशिक्षण/SLA/२०२४-२५/१७१
दिनांक ०६/११/२०२४
विषय – शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यानुसार सादर करणेबाबत.
संदर्भ – १.NCSL, निपा, नवी दिल्ली संस्थेचे पत्र दि. ०१ ऑक्टोबर २०२४.
२.NCSL, निपा, नवी दिल्ली मार्फत राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ऑनलाईन बैठकीतील सूचना दि.०४/१०/२०२४. ३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मिपा/SLA/२०२४-२५/१५४/दि.१०/१०/२०२४.
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील उत्तम शाळांच्या यशोगाथा (Case Study) मिपा संस्था, छत्रपती संभाजीनगर मार्फत NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठविल्या जातात व राष्ट्रीय स्तरावर http://ncsl.niepa.ac.in/repository.php या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. संदर्भ क्र.१ नुसार सन २०२४-२५ मध्ये शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत, अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा NCSL,
, नवी दिल्ली येथे पाठवावयाच्या आहेत. तशा सूचना संदर्भ क्र.२ नुसार प्राप्त आहेत. निपा आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान ०२ ज्यात शासकीय / जिल्हा परिषद / नगर परिषद / महानगरपालिका/ कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या यशोगाथा सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून या
कार्यालयाच्या miepasla2019@gmail.com या मेलवर दि.३०/११/२०२४ पर्यंत Google Input मध्ये Arial
Unicode MS या font मध्ये टंकलिखित करून word व pdf स्वरुपात पाठवाव्यात. सोबत – १. यशोगाथा लेखनासाठी क्षेत्रांची / विषयांची यादी
२. यशोगाथा लेखन – मार्गदर्शक सूचना, समाविष्ट करावयाचे मुद्दे व format
(डॉ. वैशाली जामदार)
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) छत्रपती संभाजीनगर
यशोगाथा लेखनासाठी क्षेत्र / विषय निवडण्यासाठी संदर्भ यादी
- कला क्षेत्रातील यश
- क्रीडा क्षेत्रातील यश
- पटनोंदणी व नियमित उपस्थिती
- गळती रोखणे
5.Building as Learning Aid (BaLA)
- आनंददायी शिक्षणासाठी नवोपक्रम
- आपत्ती व्यवस्थापन
- Cyber safety
- विद्यार्थी सुरक्षा
- सामाजिक भावनात्मक शिक्षणासाठीचे प्रयत्न
- विद्यार्थी विकासात पालक सहभाग
- मूल्यमापनाची नवीन तंत्रे
- पायाभूत साक्षरता आणि अंकगणितीय क्षमता
- व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन
- स्थलांतरित बालकांचे शिक्षण
- स्वच्छ व सुंदर शाळा
- लोकसहभागातून विद्यार्थी विकास
- शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेतील यश
- किशोरवयीन मुलींचे आरोग्य
20.. जीवन कौशल्यांद्वारे विद्यार्थी विकास
- शालेय व्यवस्थापन समितीचा विद्यार्थी विकासात सहभाग
- बहुभाषिक विद्यार्थी विकासात शाळेचा सहभाग
- आदिवासी भागातील विद्यार्थी विकासात शाळेचे योगदान
- मूल्याधिष्ठित शिक्षण आणि विद्यार्थी विकास
25.. शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापनातून गुणवत्ता विकास
- स्थानिक/भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार घेतलेले विशिष्ट उपक्रम
- आदिवासी भागातील शाळांमध्ये बोलीभाषा ते प्रमाणभाषा प्रवास
. भाषा/इंग्रजी / गणित-विज्ञान / सामाजिक शास्त्र या विषयांबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम
28 29. माध्यान्ह भोजन योजनेचा सकारात्मक परिणाम
- अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या निरिक्षणासाठी विकसित केलेल्या प्रयोग शाळा किंवा टेलीस्कोप, खगोलशास्त्र
(ऍस्ट्रॉनॉमी) क्लब,
- विषय कोपरा किंवा विषय कक्ष विकसित करणे
- जल साक्षरता, पर्यावरण पोषक उपक्रम,
- राष्ट्रीय छात्र सेना मधील विशेष यश
- राष्ट्रीय स्तरावरील खेळ स्पर्धा मधील यशस्वी सहभाग
- नेचर क्लब, हेरिटेज क्लब
- आनंददायी शिक्षण
- आर्ट ऑफ इंटिग्रेशन
- अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर (ई-लर्निंग)
- सह शालेय उपक्रमातून विद्यार्थी गुणवत्ता विकास
- विविध अध्यापन शास्त्रीय कौशल्यांचा यशस्वी वापर
- कौशल्य आधारित व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी
- लिंग समावेशकता मध्ये शालेय नेतृत्वाची कामगिरी
- विविध सामाजिक स्तरातून येणारे विद्यार्थी / CWSN विद्यार्थी यांच्यासाठी सामाजिक न्याय, समता, समावेशकता,निः पक्षपातीपणा यात शालेय नेतृत्वाची कामगिरी.
यशोगाथा लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना
१. शाळा निवड – पूर्व प्राथमिक / प्राथमिक/ उच्च प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक
२. व्यवस्थापन – शासकीय / जिल्हा परिषद / नगर परिषद / महानगरपालिका / कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक
३. यशोगाथा लेखन करतांना आवश्यक तेथे फोटो व व्हिडिओ लिंक जोडाव्यात.
४. एकूण लेखन शब्द मर्यादा 2500 ते 3000 शब्द टंकलिखित 2/3 पृष्ठ असावी ज्यात खालील मुद्यांवर
लेखन अपेक्षित आहे. ५. वरच्या यादीतील एक किंवा अधिक निवडलेल्या क्षेत्र / विषय तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP
2020) यावर यशोगाथा लेखन करावे
६. यशोगाथे मध्ये शाळा आणि शाळा प्रमुखांच्या तपशिलासह सदर शाळेत झालेल्या सकारात्मक शालेय बदल प्रक्रियेचे लेखन आणि फोटो (पूर्वीचे आणि बदलानंतरचे) समाविष्ट करणे आवश्यक आहे. बदल प्रक्रियेचे ठोस आणि दृश्य परिणाम स्पष्टपणे मुद्देनिहाय फोटो / व्हिडीओ क्लिप सह स्पष्टपणे नमूद केले जावेत.
यशोगाथा लेखनात समाविष्ट करावयाचे मुद्दे
शाळेची प्रारंभिक माहिती
- शाळेचे नाव व पूर्ण पत्ता, ई मेल आय डी
- मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ई मेल आय डी
- शाळेचे व्यवस्थापन
- शाळेचे माध्यम
- शाळेतील इयत्ता — ते-
- एकूण विद्यार्थी संख्या
यशोगाथा लेखनासाठी Format
१. यशोगाथा क्षेत्र / विषय / शीर्षक
२. प्रास्ताविक
३. मुख्याध्यापक / शिक्षक यांना विषयासंदर्भात आलेल्या अडचणी किंवा
मुख्याध्यापक / शिक्षक यांनी विषयासंदर्भात अधिक प्रभावी केलेले काम.
४. या अडचणींवर मात करण्यासाठी मुख्याध्यापक / शिक्षक यांनी केलेल्या उपाययोजना किंवा
मुख्याध्यापक / शिक्षक यांनी प्रभावी कामासाठी केलेली अंमलबजावणी . मुख्याध्यापक / शिक्षक यांनी निवडलेल्या विषया संदर्भातील अडचणी दूर केल्यानंतर किंवा ५
मुख्याध्यापक / शिक्षक यांनी प्रभावी कामासाठी केलेल्या अंमलबजावणीनंतर दृष्य परिणाम / फलनिष्पत्ती /
यशोगाथा
६. समारोप (केवळ एक परिच्छेद)
महत्वाचे –
१. फोटो व व्हिडिओ लिंक जोडाव्यात.
२. Google Input मध्ये Arial Unicode MS font
३.word व pdf फाईल miepasla2019@gmail.com या मेलवर पाठवाव्यात.