Pradushanmukt Dipawali Shapath Upkram
Pradushanmukt Dipawali Shapath Upkram
Pradushanmukt Deepavali Oath Upkram
Pradushanmukt Deepavali Shapath Upkram
Pradushanmukt Dipawali Shapath Upkram Paripatrak
vidyarthyanna pradushanmukt dipavalichi shapath denyacha upkram aayojit karnyababat
Regarding organizing an initiative to give students a pledge for a pollution-free Diwali
क्र.शिसंमा./संकीर्ण/प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ/२०२६/विद्या शाखा/ए-२/
दिनांक. स्वाक्षरीचे खाली नमूद असलेप्रमाणे
महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे
विषय : SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत.
संदर्भ :- १. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे पत्र दि. २२.१०.२०२६ २. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२५८ (ई-१९०५७१३)/एस. डी.४ दि.२८ ऑक्टोबर, २०२६
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन पत्रांच्या प्रती या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक २ च्या शासन पत्रान्वये शासनाने “मा. उच्ब न्यायालय, मुंबई येथे दाखल SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी व पर्यावरणीय प्रदूषणाबाबत जनजागृती करावयाची आहे. त्या अनुषंगाने दीपावली पूर्वी राज्यातील सर्व शाळांमध्ये /महाविद्यालयांमध्ये प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्याबाबत शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात यावा. यासाठी परिपाठाच्या वेळेचा उपयोग करता येऊ शकेल.
शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे-
प्रदूषण मुक्त दीपावलीची शालेय विद्यार्थ्यांना शपथ
Pradushanmukt Dipawali Oath Upkram
दिवाळी हा आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवात सभोवतालचे पर्यावरण प्रदूषित होणार नाही. यासाठी आम्ही शपथ घेत आहोत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते, ते आरोग्याला अपायकारक आहे याची आम्हाला जाणीव आहे. प्रदूषणाचा लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण, पशु-पक्षी यांना खूप त्रास होतो. आम्ही आज सर्वजण संकल्प व निश्चय करतो की यावर्षीच्या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही. तसेच आमचे मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबीय यांना देखील फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्त करू. वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी शपथ मी घेत आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपरोक्त शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना तातडीने निर्गमित कराव्यात,” असे संचालनालयास सूचित करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय वांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या शासनाच्या सूचना निदर्शनास आणून SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 01-11-2026 15:57:18
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.
प्रत माहितीस्तव :- १. मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.
२. श्री. संजय जगताप, कार्यासन अधिकारी, (एस.डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.
