Shala Praveshotsav शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत

Shala Praveshotsav

Shala Praveshotsav

Shala Praveshotsav शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत

क्र. प्रशिसं/८०२/शाळा प्रवेशोत्सव / २०२६/
दिनांक- १९/०५/२०२६

    विषय:- "शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत

संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५२/एसएम -१. दिनांक-१२/०३/२०२५
२) या कार्यालयाचे पत्र क्र १२५००५७ दिनांक १५.०५.२०२५
३) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविण्यासाठी उपाययोजना समितीचा अहवाल दिनांक २५/०३/२०२६

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र १ शासन निर्णय दिनांक-१२/०३/२०२५ नुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळा भेटी, दत्तक शाळा, पटनोंदणी याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या होत्या.

शासन आदेशानुसार सन २०२५-२६ मध्ये “शाळा प्रवेशोत्सव” या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करून नवागत विदयाथ्यांचे स्वागत केले. शालेय उपक्रम व शासनाच्या विविध योजना यांचा प्रचार प्रसार केला. यामुळे सन २०२५-२६ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेने पटसंख्येतील घट कमी झाली. UINSE नुसार २०२५-२६ मध्ये ६ जिल्हयांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत इ.१ ली चा पट वाढला आहे. UDISE + नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली च्या पटसंख्येची स्थिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था शाळामधील इयत्ता १ ली चा पट मागील वर्षाच्या तुलनेत घट
१ २०२२-२३ ८,१५,००५
२ २०२३-२४ ७,४५,६३९ ६९,३६६
३ २०२४-२५ ६,७७,३९९ २१.२९४
४ २०२५-२६ ६.९८.६९३ ४६,९४६

गतवर्षी शासनाने राबविलेल्या शाळा प्रवेशामुळे वाढलेला विद्यार्थी पट विचारात घेता सन २०२६-२७ मध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होतांना करावयाच्या शाळा भेटी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.


शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत :-

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक १५/०६/२०२६ पासून सुरु होणार आहेत. यानुसार शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग), मा. उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास), सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एकेक शाळेमध्ये भेट देऊन सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणेकरीता मा. आयुक्त (मनपा), मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे. यात नमूद मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एक संपर्क अधिकारी नेमून द्यावा. तसेच ते कोणत्या शाळेला / शाळांना भेटी देणार आहेत याबाबत पूर्व नियोजन करून आवश्यक पूर्व तयारी करावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद व प्रशासन अधिकारी, मनपा यांनी पुढील नमुन्यात अहवाल राज्यस्तरावर सादर करावा.

अ.क्र. मा. लोकप्रतिनिधी/अधिकारी यांचे नाव पद संपर्क अधिकारी नाव पद दिनांक भेट देणाऱ्या शाळेचे नाव व पत्ता

दत्तक शाळा :-

उपरोक्त नमूद शाळा सदर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी दत्तक शाळा म्हणून देण्यात येत आहेत. संबंधित अधिकारी यांनी या शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घ्यावा तसेच मार्गदर्शन करावे.
शिक्षण विभागातील अधिकारी [प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना), ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण)] यांना उपरोक्त नमूद शाळे व्यतिरिक्त अजून प्रत्येकी १ शाळा दत्तक म्हणून द्यावी. याबाबत पुढील नमुन्यात माहिती या कार्यालयाकडे सादर करावी.

अ.क्र. नाव पद कार्यालय

UDISE क्रमांक
दत्तक शाळेचे नाव व UDISE क्रमांक
शाळेचे नाव व तालुका
UDISE क्रमांक
शाळेचे नाव व तालुका
पट नोंदणी / पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत बालकांना मोफत सक्तीचे गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राज्य शासन व स्थानिक प्राधिकरण यांची आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम व योजनांची अंमलबजावणी केली जाते याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाच्या स्तरावरुन शाळाप्रवेशोत्सव सन २०२५-२६ हा उपक्रम राबविण्यात आला होता. शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी उपाययोजनाबाबत अहवाल सादर करण्यासाठी राज्यस्तर समितीची स्थापना करण्यात आली होती. या राज्य समितीने त्यांचा अहवाल शासनास दिनांक २५.०३.२०२६ रोजी सादर केला असून यामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटसंख्या वाढविण्यासाठी मार्च ते जून कृती कार्यक्रम व शाळा सुरु झाल्यापासून वर्षभरासाठी राबविण्याचे उपक्रम / कृती कार्यक्रम नमूद केलेले आहे. याबाबत मा आयुक्त (शिक्षण) यांनी मा. आयुक्त (म.न.पा.) व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना अर्धशासकीय पत्राद्वारे सदर अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपक्रमांची अंमलबजावणी करणेबाबत कळविले आहे.

१०० टक्के विद्यार्थ्यांची पट नोंदणी व्हावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता १ ली च्या पटात लक्षणीय वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.

१. शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता १ ली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यादी घ्यावी. शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून १००% विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.
२. जिल्हा परिषद / नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमधील सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, विविध उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी. समाज माध्यमात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद / नगरपालिका/महानगरपालिका शाळेत दाखल होतील यासाठी प्रयत्न करावा.
३. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळा/शिक्षक यांनी इयत्ता १ ली मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी दिली आहे. यामध्ये शाळेचे यश, सोयी सुविधा, राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थी सहभाग व यश याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली आहे. याच धर्तीवर सर्व शाळांनी प्रचार प्रसिद्धी करावी. यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे व त्याबाबत सूचना द्याव्यात.
४. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावेत यासाठी शाळा भेटीच्या वेळेस मा. लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, नागरिक यांचेशी चर्चा करावी.
५. मा.आयुक्त (मनपा), मा.जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद / नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता १ ली च्या पटात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी उपरोक्त नमूद केले प्रमाणे उपक्रम सर्व शाळांमध्ये होतील यापद्धतीने नियोजन करावे, याव्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रमही घेता येईल यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. आयुक्त मनपा यांचे मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी.

शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

१. शाळा सुरू होण्यापूर्वी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग), मा. उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास), सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटी बाबत वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी. तसेच शाळा सुरु होण्याचा स्थानिक स्तरावर प्रचार प्रसार करावा.
२. सदर कार्यक्रमांतर्गत मा. लोकप्रतिनिधी व अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करतील मा. लोकप्रतिनिधी यांना संपर्क अधिकारी निश्चित करून द्यावेत शाळा भेटीचे नियोजन करावे.
३. शाळा सुरु होणार असल्याबत ग्रामीण भागात दवंडी काढून सर्वांना कळविण्यात यावे. तसेच पालकांचे what’s app ग्रुप व शालेय नोटीस बोर्ड यावर कळवावे.
४.शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करावी.
५. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना बोलवावे, अंगणवाडी सेविका/ताई यांना बोलवावे.
६.शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी/आयोजन करावे.
७. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे.
८. “पहिले पाउल” या संकल्पने अतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर घ्यावा. त्याची प्रत पालकांना द्यावी.
९. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात यावे.
१०. शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचा/नियोजनाचा आढावा घ्यावा.
११.निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा.
१२. शालेय भौतिक सुविधांचा आढावा घ्यावा. आवश्यकतेनुसार उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करावे.
१३. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी याबाबत आढावा घ्यावा.
१४. शालेय क्रीडा साहित्य, खेळाच्या सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा व मार्गदर्शन करावे.
१५. सर्व विद्यार्थ्यांकरीता शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करून शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन करावे.

तरी याबाबत, आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव” या उपक्रमाअंतर्गत आवश्यक कार्यवाही करून शाळांना भेटी दिल्याबाबतचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करावा.

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 20-05-2026 13:27:31
(डॉ महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य) महाराष्ट्र राज्य, पुणे

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 20-05-2026 12:28:45
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सादर.
१. मा. आयुक्त मनपा (सर्व) यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सविनय सादर.
२. मा. जिल्हाधिकारी (सर्व) यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सविनय सादर.
३. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव
४. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना पुढील कार्यवाहीस्तव सादर.
५. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.
६. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना पुढील कार्यवाहीस्तव सादर.
७. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पुढील कार्यवाहीस्तव
८. संचालक, महाराष्ट्र राज्य, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांना पुढील कार्यवाहीस्तव.

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
४. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख/शिक्षणाधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)

Shala Praveshotsav शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत
Shala Praveshotsav शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत

Shala Praveshotsav
Shala Praveshotsav

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे

क्र. प्राशिसं/८०२/शाळाभेटी/२०२५/3/24
दिनांक १२.०६.२०२५

विषय :- “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम राबविणेबाबत.

संदर्भ :
१. शासन निर्णय क्र संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५२/एसएम१, दि १२.०३.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र प्राशिसं/ ८०२/शाळा भेटी/२०२५/१२५००५७, दिनांक १५.०५.२०२५
३. मा. आयुक्त (शिक्षण) पुणे यांची दि २७.०५.२०२५, ०२.०६.२५ व ११.०६.२५ ची अर्धशासकीय पत्रे

“शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १६.०६.२०२५ पासून तर विदर्भात दिनांक २३.०६.२०२५ पासून सुरु होत आहे. सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संदर्भ क्र २ च्या पत्रान्वये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.

“शाळा प्रवेशोत्सव” या उपक्रमांच्या नियोजनासाठी आपल्या जिल्हयामध्ये “शाळा प्रवेशोत्सव कक्ष” स्थापन करावा. सदर कक्षामध्ये आवश्यक कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करावी.. विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १६.०६.२०२५ पासून शाळा सुरु होत असल्याने दिनांक १४ व १५ जून २०२५ रोजी व विदर्भातील शाळा दिनांक २३.०६.२०२५ रोजी सुरु होत असल्याने दिनांक २१ व २२ जून २०२५ रोजी आपल्या कार्यालयातील शाळा प्रवेशात्सव कक्ष सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. शाळा प्रवेशोत्सवाबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच राज्यस्तरावरुन मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी

शाळा प्रवेशोत्सव” हया उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला शाला प्रणालीमध्ये (school portal) शाळा भेटीचा अहवाल नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक १६.०६.२०२५ व विदर्भामध्ये दिनांक २३.०६.२०२५ रोजी भेट देणा-या मा. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शाळा भेटीच्या अहवालाची नोंद करावयाची आहे तरी दिलेल्या सुविधेमध्ये तालुक्यांतील शाळा भेटीची ची माहिती त्याच दिवशी नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरुन गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे. सदर सुविधा ही शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी ६.०० वाजता बंद होणार असल्याने विहित मुदतीत माहिती भरणेबाबत सर्व संबंधीतांना कळवावे.

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जि प (सर्व)
३. शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी/शिक्षण प्रमुख, मनपा/नप (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई

IMG 20250612 201827
Shala Praveshotsav

Also Read 👇

image 21
Shala Praveshotsav

Shala Praveshotsav

Shala Praveshotsav 2025-26

क्र.प्राशिसं/८०२/शाळा भेटी/२०२५-२६/०२७८८
दिनांक: १४/०५/२०२५

विषय :- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविणेसाठी उपाययोजना करणेकरीता ऑनलाईन बैठक.

संदर्भ :-
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-११२५/प्र.क्र.२५२/एसएम-१, दिनांक- १२/०३/२०२५.
२. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) व शिक्षण संचालक (प्राथ.), पुणे यांचे पत्र जा.क्र.शिसंमा-२५/(ओ-०१)/उन्हाळी सुट्टी/एस-१/२२३७, दि-२९/०४/२०२५.


उपरोक्त विषयान्वये संदर्भिय शासन निर्णय दिनांक १२/०३/२०२५ नुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच संदर्भ क्र.२ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा सुरु करणेबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.


यासाठी शाळा, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सर्व शिक्षक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रिपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. या विषयाच्याअनुषंगाने शिक्षक व अधिकारी यांची मते जाणून घेऊन अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करावयाचा आहे. यासाठी दिनांक १५ मे, २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीस मा. मंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व राज्यस्तरीय संघटनांचे अध्यक्ष व सचिव (२ प्रतिनीधी) यांनी व उपरोक्त नमूद अधिकारी यांनी ऑनलाईन बैठकीस उपस्थित रहावे.

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे

प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुबई महानगरपालिका, मुंबई.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, (सर्व).
३. प्रशासन अधिकारी, नगर परिषद/नगरपालिका/महानगरपालिका (सर्व).
४. राज्यस्तरीय शिक्षक संघटना (सर्व/सोबत जोडलेल्या यादीनुसार)

Online meeting to celebrate school entrance festival in the academic year 2025-26 and take measures to increase the number of schools of local self-government bodies.

1 thought on “Shala Praveshotsav शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत”

Leave a Comment

error: Content is protected !!