TET Divyang Teachers 15 Percent Relaxation
TET Divyang Teachers 15 Percent Relaxation
tet 15 percent relaxation
tet divyang teachers relaxation
tet disabled teachers
tet pwd 15 relaxation
Person with Disability Exemption in TET EXAM
tet pwd relaxation
tet Exam disabled teachers Fifteen percent relaxation
divyanga shikshak TET Exam madhye Pandhra takke gunanchi savalat
divyanga sanvargateel shikshakansathi shikshak patrata pariksha (TET) madhye 15% gunanchi savalat
Fifteen Percent relaxation of marks in Teacher Eligibility Test (TET) for teachers belonging to the Divyang category
दिव्यांग सक्षमीकरण विभाग
दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, म.रा., पुणे
जाक्र. दिकआ/कार्या-७/TET/ गुण सवलत / २०२६-२७/पुणे
दि. /०६/२०२६
प्रति,
आयुक्त, (शिक्षण),
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय :- दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये 15% गुणांची सवलत मिळणे बाबत.
संदर्भ :
१. शासन निर्णय क्र. बैठक-2021/प्र.क्र. 153/टीईटी- १ ३० जून २०२२
२. राज्याध्यक्ष, श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक २०/०४/२०२६
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते कि, संदर्भ क्र. ०२ अन्वये राज्याध्यक्ष, श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक २०/०४/२०२६ रोजी या आयुक्तालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनामध्ये दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये १५ % गुणांची सवलत मिळणे बाबत विनंती करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार दिव्यांगाचे २१ प्रकार वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. या २१ दिव्यांग प्रवर्गामध्ये समाविष्ठ होणाऱ्या दिव्यांगांना देखील त्यांच्या दिव्यांगत्वामुळे शिक्षक पात्रता परिक्षा TET मध्ये इतर सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त होत नाहीत. त्यामुळे या दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परिक्षा TET मध्ये 15% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे. अशी संदर्भ क्र. ०२ च्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे.
या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार (TET) माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना १५% गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच, सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परिक्षा TET मध्ये १५% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यास विनंती आहे.
Digitally signed by SATYAJEET DEVIDAS BADE Date: 01-07-2026
सत्यजीत बडे भा.प्र.से. आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत : माहितीस्तव
१. मा. सचिव, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर
२. राज्याध्यक्ष, श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य
