Shala Purv Tayari Melava 2024

Shala Purv Tayari Melava 2024

image 15
Shala Purv Tayari Melava 2024

Shala Purv Tayari Melava 2024

विषय- शाळा पूर्व तयारी २०२४ अंतर्गत शाळा स्तरावर दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करणेवावत

संदर्भ :- १. प्रस्तुत कार्यालयाचे जा.क्र. राशैसंप्रपम / वालशिक्षण/SRP/२०२४/०१९५८, दि. ०५/०४/२०२४ २. शिक्षण संचालनालय माध्य. व उच्च माध्यमिक कार्यालयाचे पत्र क्र. शिसंमा २४/ (ओ-०१)/ उन्हाळी सुट्टी/एस-१/२२०६, दि. १८ एप्रिल २०२४.

उपरोक्त

संदर्भीय विषयान्वये २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीला दाखलपात्र वालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान” अंतर्गत “पहिले पाऊल” हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२४ मध्ये मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. संदर्भ क्र. १ च्या पत्रानुसार शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. २ माहे जून २०२४ मध्ये विदर्भ वगळता इतर विभागात दि. १५ ते २० जून २०२४. विदर्भात दि. २८ जून ते ०३ जुलै २०२४. आयोजित करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते.

Also Read –

शाळा पूर्व तयारी २०२४ – २५ यशस्वी अंमलबजावणी SCERT दिनांक ०५ एप्रिल २०२४ चे परिपत्रक वाचाल LINK त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

संदर्भ क्र. २ च्या पत्रानुसार उन्हाळी सुट्टी नंतर राज्यातील राज्य मंडळाच्या शाळा सुरु करण्याविषयी तारखा सुनिश्चित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी सुरु कराव्यात तर विदर्भातील शाळा सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी सुरु करणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे.

करिता या पत्राद्वारे आपणास सूचित करण्यात येत आहे कि, शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक २ चे आयोजन हे विदर्भातील शाळांकरिता २८ जून ते ३ जुलै २०२४ ऐवजी दि.१ जुलै ते ५ जुलै २०२४ या कालावधीत एक दिवस करण्यात यावे. सदर मेळावे आयोजन करताना संदर्भ क्र. १ च्या पत्रात सूचित सर्व सूचनांचे पालन करण्यात यावे.

डॉ. शोभा खंदारे

सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे -३०

सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!