Shala Praveshotsav
Shala Praveshotsav
Shala Praveshotsav
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
क्र. प्राशिसं/८०२/शाळाभेटी/२०२५/3/24
दिनांक १२.०६.२०२५
विषय :- “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम राबविणेबाबत.
संदर्भ :
१. शासन निर्णय क्र संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५२/एसएम१, दि १२.०३.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र प्राशिसं/ ८०२/शाळा भेटी/२०२५/१२५००५७, दिनांक १५.०५.२०२५
३. मा. आयुक्त (शिक्षण) पुणे यांची दि २७.०५.२०२५, ०२.०६.२५ व ११.०६.२५ ची अर्धशासकीय पत्रे
“शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १६.०६.२०२५ पासून तर विदर्भात दिनांक २३.०६.२०२५ पासून सुरु होत आहे. सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संदर्भ क्र २ च्या पत्रान्वये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.
“शाळा प्रवेशोत्सव” या उपक्रमांच्या नियोजनासाठी आपल्या जिल्हयामध्ये “शाळा प्रवेशोत्सव कक्ष” स्थापन करावा. सदर कक्षामध्ये आवश्यक कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करावी.. विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १६.०६.२०२५ पासून शाळा सुरु होत असल्याने दिनांक १४ व १५ जून २०२५ रोजी व विदर्भातील शाळा दिनांक २३.०६.२०२५ रोजी सुरु होत असल्याने दिनांक २१ व २२ जून २०२५ रोजी आपल्या कार्यालयातील शाळा प्रवेशात्सव कक्ष सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. शाळा प्रवेशोत्सवाबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच राज्यस्तरावरुन मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी
शाळा प्रवेशोत्सव” हया उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला शाला प्रणालीमध्ये (school portal) शाळा भेटीचा अहवाल नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक १६.०६.२०२५ व विदर्भामध्ये दिनांक २३.०६.२०२५ रोजी भेट देणा-या मा. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शाळा भेटीच्या अहवालाची नोंद करावयाची आहे तरी दिलेल्या सुविधेमध्ये तालुक्यांतील शाळा भेटीची ची माहिती त्याच दिवशी नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरुन गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे. सदर सुविधा ही शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी ६.०० वाजता बंद होणार असल्याने विहित मुदतीत माहिती भरणेबाबत सर्व संबंधीतांना कळवावे.
परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जि प (सर्व)
३. शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी/शिक्षण प्रमुख, मनपा/नप (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
Also Read 👇
Shala Praveshotsav
Shala Praveshotsav 2025-26
क्र.प्राशिसं/८०२/शाळा भेटी/२०२५-२६/०२७८८
दिनांक: १४/०५/२०२५
विषय :- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविणेसाठी उपाययोजना करणेकरीता ऑनलाईन बैठक.
संदर्भ :-
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-११२५/प्र.क्र.२५२/एसएम-१, दिनांक- १२/०३/२०२५.
२. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) व शिक्षण संचालक (प्राथ.), पुणे यांचे पत्र जा.क्र.शिसंमा-२५/(ओ-०१)/उन्हाळी सुट्टी/एस-१/२२३७, दि-२९/०४/२०२५.
उपरोक्त विषयान्वये संदर्भिय शासन निर्णय दिनांक १२/०३/२०२५ नुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच संदर्भ क्र.२ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा सुरु करणेबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासाठी शाळा, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सर्व शिक्षक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रिपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. या विषयाच्याअनुषंगाने शिक्षक व अधिकारी यांची मते जाणून घेऊन अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करावयाचा आहे. यासाठी दिनांक १५ मे, २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीस मा. मंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व राज्यस्तरीय संघटनांचे अध्यक्ष व सचिव (२ प्रतिनीधी) यांनी व उपरोक्त नमूद अधिकारी यांनी ऑनलाईन बैठकीस उपस्थित रहावे.
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुबई महानगरपालिका, मुंबई.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, (सर्व).
३. प्रशासन अधिकारी, नगर परिषद/नगरपालिका/महानगरपालिका (सर्व).
४. राज्यस्तरीय शिक्षक संघटना (सर्व/सोबत जोडलेल्या यादीनुसार)
Online meeting to celebrate school entrance festival in the academic year 2025-26 and take measures to increase the number of schools of local self-government bodies.
Shubham