Selection Grade For Teachers In School College Of Education
Selection Grade For Teachers In School College Of Education
Selection Grade For Teachers In Private Secondary Schools And Junior College Of Education
Selection Grade For Teachers In Private Secondary Schools And Junior College Of Education
Implementing Selection Grade for teachers in private secondary schools and teachers’ colleges in the state.
राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विश्वालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे.
दिनांक ८ डिसेंबर, १९९५
वाचा :-
१) शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. चवेआ-१०८९/(१११)/माशि-२, दि.२.९.१९८९.
शासन निर्णय :- राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना चटटोपाध्याय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींवर आधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी वर नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार दि.१.१.१९८६ पासून लागू करण्यात आलेली आहे. या त्रिस्तरीय वेतनश्रेणीमधील निवडश्रेणी प्राप्त करण्यासाठी पुढे नमूद केलेल्या अटी विहित करण्यात आलेल्या आहेत :-
१) संबंधित शिक्षकाने वरिष्ठश्रेणीत १२ वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण केली असली पाहिजे.
२) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असले पाहिजे.
३ ) अ) प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
ब) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
क) माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकाची अर्हताप्राप्त केली असली पाहिजे.
निवडश्रेणी ही त्या त्या संस्थेतील व संवर्गातील वरिष्ठश्रेणीतील २०% पदांना सेवाज्येष्ठतेनुसार अनुड्डेय आहे व त्या संवर्गातील किमान ५ पदे असणा-या प्रवर्गाचा निवडश्रेणीसाठी विचार करण्यात येतो. त्रिस्तरीय वेतनश्रेणीतील वरिष्ठश्रेणी ही दिनांक १.१.१९८६ पासून लागू केली आहे व त्यामुळे निवडश्रेणी दि.१.१.१९९८ पूर्वी कोणत्याही शिक्षकास देय ठरत नसल्याने, दि.१.१.१९८६ वा त्यानंतर २४ वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवडश्रेणीचा फायदा सरळ मिळावा अशी विविध शिक्षक संघटनांची बद्दलची मागणी होती.
वा मागणीचा साकल्याने विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, दि.१.१.१९८६ पासून वरिष्ठश्रेणीत वेतन घेणा-या व दि.१.१.१९८६ वा तदनंतर २४ वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील वरिष्ठ श्रेकणीत वेतन घेणा-या शिक्षकां पैकी २० टक्के शिक्षकांना दि.१.१.१९८६ पासून निवडश्रेणी मंजूर करण्यात यावी. मात्र या शिक्षकांना शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग दि.२.९.१९८९ सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये निवडश्रेणी प्राप्त करण्यासाठी विहित केलेल्या इतर सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
माध्यमिक शिक्षकांना निवडश्रेणी ही दि.१.१.१९८६ पासून देय ठरविण्यात येत असलो तरी निवडश्रेणीचा प्रत्यक्ष फायदा या शिक्षकांना दि.१.१.१९९५ पासून देय होईल. दि.१.१.१९८६ वा तद्नंतर निवडश्रेणीसाठी पात्र ठरत असलेल्या शिक्षकास ज्यावेळी वरिष्ठ श्रेणौँ अनुज्ञेय ठरली असेल त्या दिनांकापासून तो शिक्षक वरिष्ठश्रेणीत जे वेतन घेत असेल तो टप्पा निवडश्रेणीमधील वेतनश्रेणीमध्ये असल्यास त्या टप्प्यावर, नसल्यास लगतच्या खालच्या टप्प्यावर त्याचे वेतन निश्चित करण्यात यावे व फरकाची रक्कम वैयक्तिक वेतन म्हणून मूळ वेतनात समाविष्ट करण्यात यावी. निवडश्रेणी अनुज्ञेय ठरेल त्या दिनांकापासून दि.१.१.१९९५ पर्यंत निवडश्रेणीमध्ये काल्पनिकरित्या वेतननिश्चिती करण्यात यावी. दि.१.१.१९८६ वा तदनंतर दि.३१.१२.१९९४ पर्यंतच्य कालावधीच्या कोणत्याही थकबाकीवर अनुदान या शिक्षकांना देण्यात येणार नाही. दिनांक १.१.१९९५ ते दि.३१.१२.१९९५ पर्यंत निवडश्रेणीमध्ये वेतननिश्चिती केल्यानंतर देय ठरणा-या फरकाची रक्कम संबंधित शिक्षकाच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. दि.१.१.१९९६ पासून निवडश्रेणीमध्ये रोखीने वेतन देण्यात यावे. २. शासन यासंदर्भात पुढे असेही आदेश देत आहे की, दि.१.१.९५ रोजी वयाची ५५ वर्षे पूर्ण करणा–या माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी विहित केलेल्या सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या अटीतूकन सूट देण्यात यावी. तसेच निवडश्रेणीसाठी विहित केलेल्या इतर अटींची पूर्तता करणारे जे शिक्षक दि.१.१.२००० पर्यंत सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे हमीपत्र लिहून देतील अशा शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात यावी. मात्र विहित कालावधीत संधी देवूनही सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण न केल्यास अशा शिक्षकांच्या निवडश्रेणीमधील वेतनाची वसुली करण्यात यावी. जे शिक्षक दि.३०.४.१९९६ पर्यंत स्वेच्छउनिवृत्ती स्वीकारतील किंवा दि.१.१.१९९८ पर्यंत रुग्णतच्या कारणास्तव त्यांना सेवानिवृत्त करण्यात वेईल अथवा ते मृत पावतील, अशा शिक्षकांना निवडश्रेणीसाठी विहित केलेल्या सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या अटीतून सूट देण्यात यावी.
३. निवडश्रेणीसाठी विहित करावयाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सविस्तर प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा.
४. जिल्हा परिषद व नगरपरिषद/महानगरपालिका शाळांतील माध्यमिक शिक्षकांना हे आदेश लागू करण्याच्या संदर्भात संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
५. निवडश्रेणी प्राप्त करण्यासाठी पात्र ठरल्यानंतर संबंधित शिक्षकांनी वेतननिश्चितीबाबतचा आपला विकल्प तीन महिन्यांच्या आत देणे आवश्यक राहील.
६. यासाठी होणारा खर्च खाजगी अनुदानप्राप्त माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वेतन व भत्त्यासाठी विहित केलेल्या नेहमीच्या लेखाशिर्षाखालो चालू वर्षी पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेल्या रु.२ कोटी ७९ लाख रकमेमधून खर्ची टाकण्यात यावा.
७. हे आदेश दि.१.१.१९९५ पासून अंमलात येतील.
८. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०२२/सेवा-१०.
दि.४.१०.९५ अन्व्यं निर्गमित करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवान.
संगणक संकेतांक २००९०४०४१६३७५१००१
उपसचिव, महाराष्ट्र शासन.