Idol Teacher Search Process
Idol Teacher Search Process
Idol teacher search process
Implementation of the idol teacher search and selection process
जा.क्र. / अविवि / आयडॉल /E 1980507 दि. 27/05/2026
प्रति,
जिल्हास्तर समिती प्रमुख तथा जिल्हाधिकारी (सर्व)
विषय- आयडॉल शिक्षक शोध व निवड प्रक्रिया राबविण्याबाबत..
संदर्भ- १. शासन निर्णय क्र. नमाशा-२०२५/प्र.क्र.१४/ टीएनटी -४ दिनांक: १६/०४/२०२५
२. क्र.संकीर्ण : २०२६/प्र.क्र.१२/ टीएनटी ४, दिनांक ११.०३.२०२६ चे पत्र.
३. मा.आयुक्त शिक्षण यांचे पत्र जा.क्र./आस्था-ब-१२१/२०२६/७८८८१८ दि.१७/०३/२०२६
४. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांची आढावा बैठक दि १०/०५/२०२६
मा.महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे.
हेही वाचाल –
यासाठी संदर्भीय शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत व आपण यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख आहात. त्याअनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका समित्यांनी पात्र शिक्षकांचे मूल्यमापन करुन याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
हेही वाचाल –
अ.क्र. कार्यवाही मुदत
१ तालुकास्तर शोधप्रक्रिया : आयडॉल शिक्षक निवडीसाठी प्रत्येक केंद्रातून
शिक्षकांचा शोध घेताना संबंधित केंद्राचे केंद्रप्रमुख यांची मदत घेण्यात यावी. त्यासाठी संदर्भ क्रमांक १ अन्वये देण्यात आलेला मुद्दा क्रमांक “ब” मुद्दा विचारात घ्यावा.
१७.०६.२०२६
२ तालुकास्तर निवडप्रक्रिया: शोध घेतल्यानंतर तालुकास्तरीय समितीने
आपल्या तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील (ग्रामीण व शहरी) सोबत देण्यात आलेल्या मूल्यमापन प्रपत्रानुसार किमान २ शिक्षकांची निवड करून गुणानुक्रमे यादी जिल्हास्तरीय समितीला द्यावी. (जिल्हास्तर समितीकडे पाठविण्याच्या यादीचा नमुना सोबत दिला आहे) तसेच संबंधित शिक्षकांचे मूल्यमापन प्रपत्र जिल्हास्तरीय समितीस उपलब्ध करून द्यावे.
२५/०६/२०२६ पर्यंत
जिल्हास्तरीय समितीने तालुक्यांची माहिती एकत्रित करून जिल्ह्याची यादी विहित नमुन्यात तयार करावी त्यासाठीचा जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर यादी पाठविण्याचा विहित नमुना सोबत दिला आहे.
याप्रमाणे यादी तयार केल्यानंतर त्यावर समिती सदस्यांच्या स्वाक्षरी घेऊन नंतर सोबत दिलेल्या लिंक मध्ये माहिती विहित नमुन्यात भरावी. यासाठी फक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना कार्यालयाच्या अधिकृत इमेल वर सदर लिंक चा ACCESS असेल, त्यावरच माहिती भरायची आहे.
समिती सदस्यांच्या स्वाक्षरीची यादी आपल्या दफ्तरी सांभाळून ठेवावी व आवश्यकतेनुसार किंवा मागणीनुसार राज्यस्तरीय समितीस उपलब्ध करून द्यावी.
सदर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, शासन निर्णयास अनुसरून व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी.
३०/०६/२०२६ पर्यंत
यापूर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी दिनांक ७/७/२०२५ च्या पत्राद्वारे राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतून निवड झालेले राज्यस्तरावर ४२ व जिल्हास्तरावर ३३२ आयडॉल कार्यरत राहतील व सदरील प्रक्रियेद्वारे प्रत्येक केंद्रातील दोन आयडॉल शिक्षकांची नव्याने निवड करावी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
राज्यस्तरावर आयडॉल शिक्षकांची माहिती पाठविण्यासाठी लिंक
https://docs.google.com/spreadsheets/d/1P8oHXddCOxea2T9RBxKfq55y6prFhiTKFbDGDsOEW8/edit?usp=sharing
सोबत :
१. आयडॉल शिक्षकांचे मूल्यमापन प्रपत्र
२. तालुका व जिल्हास्तर माहिती प्रपत्र
डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.
आयडॉल शिक्षक
तालुकास्तर माहिती प्रपत्र
(जिल्हास्तरावर यादी पाठविण्याचा विहित नमुना)
आयडॉल शिक्षक जिल्हास्तर माहिती प्रपत्र (राज्यस्तरावर यादी पाठविण्याचा विहित नमुना)

——————- ALSO READ ——————–
विषय : आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहणेबाबत.
आपणास कळविण्यात येते की आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय नामदार श्री. दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण आणि माननीय नामदार श्री. पंकज भोयर, राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांच्या शुभहस्ते होणार आहे.
वरील कार्यशाळेचे Live प्रक्षेपण सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत उपलब्ध राहणार आहे.
या कार्यक्रमात विविध सत्रांमधून आयडॉल शिक्षकांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन, चर्चा व विषयानुरूप माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम पाहणे आवश्यक आहे.
तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांपर्यंत ही माहिती त्वरित पोहोचवून, कार्यक्रम पाहण्याची सूचना करावी.
Live लिंक : 👇
संचालक, SCERT महाराष्ट्र, पुणे
प्रति,
विभागीय उपसंचालक, सर्व
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), सर्व
शिक्षणाधिकारी (प्रा./माध्य.), सर्व
प्रशासन अधिकारी, सर्व
शिक्षण निरीक्षक, सर्व
ALSO READ 👇

Idol Teacher Search Process
जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/idol/2025/
दिनांक 07/07/2025
प्रति,
जिल्हास्तर समिती प्रमुख तथा जिल्हाधिकारी (सर्व)
विषय- आयडॉल शिक्षक शोध प्रक्रियेबाबत…
संदर्भ-
- शासन निर्णय क्र. नमाशा-2025/ प्र.क्र.14/ टीएनटी-4 दिनांक: 16/04/2025
- शासन पत्र संकीर्ण-2025/प्र क्र-14/टीएनटी-4 दिनांक 16/06/2025
उपरोक्त संदर्भ क्र.1 येथील शासन निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे.
यासाठी संदर्भीय शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत व आपण यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख आहात.
संदर्भ क्र. 2 अन्वये आयडॉल शिक्षक यांची निवड करून यादी शासनास सादर करणेबाबत या संदर्भ क्र. 2 अन्वये आयडॉल शिक्षक यांची निवड करून यादी शासनास सादर करणेबाबत या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका समित्यांनी पात्र शिक्षकांचे मूल्यमापन करुन याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
अ.क्र.कार्यवाही मुदत
1 अशा शिक्षकांचा शोध घ्यावा ज्यांच्या शैक्षणिक वर्ष 2024- 25 मधील त्यांना नेमून दिलेल्या कोणत्याही एका तुकडीच्या बाबतीत त्यांनी शिकविलेल्या सर्व विषयांसाठी वर्गातील किमान 90% विद्यार्थ्यांना सर्व अध्ययन निष्पती प्राप्त आहेत. यासाठी संबंधित शिक्षकांशी चर्चा करण्यास तसेच सदरील बाब संबंधित वर्गात जाऊन तपासणी करण्यास हरकत नाही. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणेची मदत घ्यावी.
15.07.2025
2 उपरोक्त शिक्षकांसाठी संदर्भ क्रमांक 1 अन्वये इतर आठ निकषांची पडताळणी पूर्ण करावी.
25.07.2025
3 सर्व तालुकास्तरीय समितींनी त्यांची गुणांकनासह बनवलेली प्रस्तावित शिक्षकांची यादी जिल्हास्तरीय समितीला द्यावी.
26.07.2025
संदर्भीय शासन निर्णयामध्ये यासाठीच्या शिक्षक मूल्यमापनाकरिता बाबी व गुणांकन दिलेले आहे. बाबनिहाय मूल्यमापन निकष सोबत संलग्न आहेत. निकषानुसार गुणांकन कार्यपद्धती अनुसरण्यात यावी. आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे