Performance Appraisal Report of Employees Proceedings of writing in MAHAPAR System
Performance Appraisal Report of Employees Proceedings of writing in MAHAPAR System
Gopniy Ahval
दिनांक: २२ जानेवारी, २०२५.
शासन परिपत्रक
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १.११.२०११ नुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच, दिनांक ७.२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये “गट-अ आणि गट-ब (राजपत्रित)” संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून “महापार” या प्रणालीद्वारे ऑनलाईन लिहिण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
जे राज्य शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था/मंडळे/महामंडळे/प्राधिकरणे या सेवांमध्ये (महापार या प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या) प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत त्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून शक्य तितक्या टप्यापर्यंत “महापार” या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावेत आणि त्यानंतरचे टप्पे ऑफलाईन पध्दतीने नोंदवून ते कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावेत, अशाही सूचना शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१८ अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.
शासन परिपत्रक क्रमांकः सीएफआर १२२४/प्र.क्र.१६४/आस्थार्म (१३)
तथापि, उपरोक्त सूचनांचे पालन केले जात नाही तसेच, आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले असतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
३. या अनुषंगाने कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याची कार्यवाही विहित वेळेत महापार या संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांना पुनःश्च खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-
१) यापुढे आस्थापना मंडळासमोर प्रस्ताव सादर करतांना विचारक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक आहे.
२) जे राज्य शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था/मंडळे/महामंडळे/प्राधिकरणे या सेवांमध्ये (महापार या प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या) प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत त्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल शक्य तितक्या टप्प्यापर्यंत “महापार” या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावेत आणि त्यानंतरचे टप्पे ऑफलाईन पध्दतीने नोंदवून ते कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावेत, प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याची जबाबदारी ही त्यांच्या मूळ विभागाच्या संस्करण अधिकाऱ्याची राहील.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२५०१२२१४४४१३०५०१४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सह सचिव, महाराष्ट्र शासन
१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: सीएफआर १२१०/ प्र.क्र.४७/१३. दि. ०१.११.२०११
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल
“महापार प्रणालीत” लिहिण्याबाबतची कार्यवाही करणे बाबत.
१) आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत
२) प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापारमध्ये समाविष्ट करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक सीएफआर १२२४/प्र.क्र.१६४/आस्थामं (१३)
मंत्रालय, मुंबई
वाचा :
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर १२११/प्र.क्र.२५७/१३, दि. ७.०२.२०१८
३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीएफआर १२२०/प्र.क्र. ११९/का.१३. दि. १७.१२.२०२१, दिनांक १७.११.२०२२, दिनांक १६.१२.२०२२ व दिनांक २६.११.२०२४