Registration of Births Deaths Act New Update

Registration of Births Deaths Act New Update

IMG 20250317 172937
Registration of Births Deaths Act New Update

Registration of Births Deaths Act New Update

क्रमांकः संकीर्ण २०२५/प्र.क्र.०३/ई-१अ प्रति.

दिनांक १७ मार्च, २०२५

विषय :- जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत.

संदर्भ :
१. भारत शासन राजपत्र दि. ११ ऑगस्ट, २०२३.
२. शासनाचे समक्रमांकाचे दि.२१.०१.२०२५ रोजीचे पत्र.
३. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्रमांकः जमृनों २५२५/(ई.ऑ.९९११८११/प्र.क्र.२२/कु.क., दि.१२.०३.२०२५.

महोदय/महोदया,
उपरोक्त विषयी संदर्भिय क्र.१ येथील भारत शासन राजपत्राव्दारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उप विभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे यांना प्रदान करण्यात आले आहेत. या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यास्तव शासनाने संदर्भिय क्र.२ दि.२१.०१.२०२५ रोजीच्या पत्रान्वये उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या,

तद्‌नंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्या संदर्भिय क.३ येथील दि.१२.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ व सुधारणा अधिनियम, २०२३ अन्वये विलबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतची कार्यपध्दती निशित केली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

IMG 20250317 172955
Registration of Births Deaths Act New Update

अकोला जिल्यासह राज्यात दि.११.०८.२०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित झालेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रापैकी जे प्रमाणपत्र तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिका-यांनी निर्गमित केलेले आहेत ते प्रमाणपत्र रद करण्यात येत असून त्यांची सक्षम अधिका यांकडून फेरतपासणी करून त्यावर यथाशीघ्र निर्णय द्याचे,
२) सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक: जमूनों-२५२५/ (ई.ऑ.९९११८११/प्र.क्र.२२/कु.क., दि.१२.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तपासणी करुन प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावेत,

३) यापूर्वी दि.२१.०२.२०२५ रोजी देण्यात आलेला स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे.

आपला,

(महेश वरूडकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
मंत्रालय, मुंबई

प्रति,
१. विभागीय आयुक्त, (सर्व).
२. जिल्हाधिकारी, (सर्व).

IMG 20250317 173012
Registration of Births Deaths Act New Update

१. अपर मुख्य सचिव यांचे स्विय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, गो. ते. रुग्णसलय संकूल इमारत. मुंबई.
३. निवडनस्ती (कार्यासन ई-१ अ), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.

हेही वाचाल Also Read 👇

IMG 20250122 134509 1
Registration of Births Deaths Act New Update

Registration of Births Deaths Act New Upda

Janma mrutyu Nondani kayda

Amendment 2023 of the Registration of Births and Deaths Act 1969

दिनांक-२१ जानेवारी, २०२५

विषयः- जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत.

संदर्भः- १. भारत शासन राजपत्र दि.११ ऑगस्ट, २०२३.

२. गृह विभाग, महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. १० सप्टेंबर, २०२३.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयी संदर्भिय भारत शासन राजपत्राव्दारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी/उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारींची चौकशी करणेकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (SIT) स्थापना करण्यात आलेली आहे. सबब उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये, ही विनंती.

Circular pdf Copy Link

आपला,

(महेश घरूडकर) उप सचिव, महाराष्ट्र शासन

क्रमांक: संकीर्ण २०२५/प्र.क्र. ०३/ई-१अ

महाराष्ट्र शासनमहसूल व वन विभागमुंबई

प्रति.१. विभागीय आयुक्त, (सर्व).२. जिल्हाधिकारी, (सर्व).

Leave a Comment

error: Content is protected !!