दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्याबाबत शिक्षण संचालकांचे आदेश Payment of salary family pension before festivals माहे ऑक्टोबर २०२६ चे वेतन दिवाळीपूर्वी

Payment of salary family pension before festivals

Payment of salary family pension before festivals

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

जा.क्र./प्राशिसं/अंदाज व नियोजन/२०१/२०२/२०३/२०२६-२७/प्रति,

Digital sign date

    विषय : दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्याबाबत.

संदर्भ:-. संचालनालयाचे ज्ञापन दिनांक २१.१०.२०२६, २३.१०.२०२६, २६.१०.२०२६ व २७.१०.२०२६

उपरोक्त विषयानुसार संचालनालयाच्या संदर्भीय ज्ञापनान्वये आपणास लेखाशिर्ष २२०२०१७३-३६/०४/१०, २२०२००४८-३६, २२०२०१८२-३६, २२०२०२०८-३६/०४/१०, २२०२३२६१-३६, २२३५२९७६, २२०२आय८७१, २२०२आय८७१ अंतर्गत नियमित वेतन, निवृत्तिवेतन व कंत्राटी शिक्षकांचे मानधन, अंशकालीन निदेशकांचे मानधन या बाबींसाठी आवश्यक तरतुदी वितरित करण्यात आलेल्या आहेत.

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न झाल्यास याबाबत तक्रारी प्राप्त होण्याची तसेच विधिमंडळात तारांकित व अतारांकित प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असते. तसेच, कर्मचारी संघटनांकडूनही यासंदर्भात तक्रारी व निवेदने सादर केली जातात. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अनावश्यक अडचणी निर्माण होऊन विभागाची प्रतिमा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी उपरोक्त बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या स्तरावर वितरित करण्यात आलेल्या तरतुदींचा विनियोग करून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा होईल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन अथवा मानधन प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

सदर कार्यवाहीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 27-10-2026 19:36:43

(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रत-माहितीस्तव सविनय सादर,

१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

Payment of salary family pension before festivals
Payment of salary family pension before festivals

जा.क्र. शिसंमा /२०२५-२६/५१8३

दि. १५/१०/२०२५

New pay-bill process linked to the Sanch Manyta recognition system in the Shalarth Pranali system

शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बील प्रक्रीये मुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळी नंतर लागू करणेबाबत..

संदर्भ : आपले पत्र दिनांक १४/१०/२०२५.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सद्यस्थितीत शालार्थ प्रणालीवर संचमान्यते मधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी इंटिग्रेशन प्रक्रिया सुरु आहे. तथापि राज्यातील अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून वेतन पथकाकडे सादर होणाऱ्या देयकासंदर्भात संचमान्यतेमधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे जुळल्यास सदरील देयक वेतन पथक स्तरावर मान्य होवून कोषागार कार्यालयाकडे पुढील प्रक्रियेकरीता सादर करण्यात येते. संचमान्यतेमधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे न जुळल्यास अतिरिक्त पदासंदर्भात निर्णय घेणेकरिता व या कार्यरत पदांच्या वेतनास मान्यता देणेकरिता सदरील देयक संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), यांचे लॉगिनला उपलब्ध होते. अशा देवकास मान्यता देण्याची सुविधा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), यांना देण्यात आलेली आहे. या प्रणालीचा प्रभावी उपयोग सुरु आहे. इंटिग्रेशन प्रक्रिया ही संचमान्यता व शालार्थ प्रणाली च्या कामकाजाचा हा एक भाग आहे. यामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या प्रणाली बाबत सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), व वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक/माध्यमिक), यांना देण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीबाबत वेळेत मार्गदर्शन/सूचना व आवश्यकतेनुसार प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

*NEW process for forwarding Salary pay bills has now changed*
*आता पे-बिल पुढे पाठविण्याची प्रक्रिया बदलली आहे सिस्टीम काय सांगते वाचा या ओळीला स्पर्श करून*

संचमान्यता शालार्थ प्रणालीवर इंटिग्रेट करणे व तद्नंतर वेतन अदा करणे ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामुळे नियमित वेतन अदा करण्यास कोणतीही अडचण उदभवणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे.

Payment of salary family pension before festivals
Payment of salary family pension before festivals

प्रत: माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

ALSO RREAD👇

Regarding payment of salary/pension/family pension for the month of August, 2025 due on 1st September, 2025 before Ganeshotsav……

दिनांक १ सप्टेंबर, २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्ट, २०२५ चे वेतन / निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत……

दिनांक: २१ ऑगस्ट, २०२५.

वाचाः
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः डिडिओ-१००५/प्र.क्र.५/कोषा. प्रशा.५, दि.२९.०८.२००५.

प्रस्तावनाः
या वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दि. २७ ऑगस्ट, २०२५ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्ट, २०२५ चे वेतन / निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

        शासन निर्णयः-

उपरोक्त वाचा मधील शासन निर्णयातील परिच्छेद १ (८) मधील तरतूद शिथील करुन, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट, २०२५ या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतनाचे / कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २६ ऑगस्ट, २०२५ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

D A HIKE TWO PERCENT २% महागाई भत्ता वाढला वाचा या ओळीला स्पर्श करून

२. या साठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहेत.

३. वेतन देयकांचे आणि निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन देयकांचे प्रदान दि. २६ ऑगस्ट, २०२५ या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन / निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन देयके यथास्थिती संबंधित उप कोषागार कार्यालय /जिल्हा कोषागार कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे त्वरीत सादर करण्याची दक्षता घ्यावी.

४. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे / कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक / कुटुंब निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील.

५. या संदर्भात संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०८२११६५३०१६५०५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

        शासन निर्णय पीडीएफ लिंक

शासनाचे उप सचिव


महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.९१/कोषा-प्रशा ५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

image 26
Payment of salary family pension before festivals

Leave a Comment

error: Content is protected !!