Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran
Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran
Padvidhar Vetantruti Nivaran
Graduate Pay Error Troubleshooting
वाचा महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 11 (1)
2. ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमाक जिप-2021/पा. क. 142/आस्था-4 दि. 26 सप्टेंबर 2023
3. या कार्यालयाचे मार्गदर्शनपर जाक 2025/जिपला शिविधा/कायो-१/कादि-145 दि.14/11/2025
4. कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग महाराजासन याचे पत्र सकीर्ण 2025/संदर्भ क.981/आस्था-4 दि. 25/11/2025
5. या कार्यालयाचे आदेश क. जिपल्स/क्षिण (पा/का-9/का-22/दि.13.02.2026
जा.क्र. जिपला/शिक्षण (प्रा)/कार्या-09/कावि- 98/2026 शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, लातूर
दिनांक :- 11.04.2026
शुध्दीपत्रक
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जिपअ-2021/पा.क्र. 142/आस्था-4 दि. 26 सप्टेंबर 2023 नुसार संदर्भ क्रमांक 05 अन्वये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करतांना एक वेतनवाढ देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या आदेशातील अट क.3 मध्ये प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदोन्नतीपुर्वीच पदोन्नतीच्या पदाच्या वेतनश्रेणीत किंवा वरिष्ठ वेतनश्रेणीत वेतन आहरण करीत असेल तरीही पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होत असल्याने त्यांची एक वेतनवाढ देवून वेतननिश्चिती करण्यात यावी. “
याऐवजी
पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदा-यांमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चिती करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 11 (1) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी.” असे वाचावे व सदर आदेशाची संबधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.
(राहुल कुमार मीना, मा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर.
प्रतिलीपी माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव ०:-
1) मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद लातूर.
2) गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व संबधित जि.लातूर
3) मुख्याध्यापक, जि.प. प्रशाला / कै.प्रा.शा./प्रा.शा. सर्व संबंधित.
4) संबंधितास (कार्यालय प्रमुखामार्फत)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर
ALSO READ 👇
पदवीधर वेतन त्रुटी निवारण
पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी त्रुटी निवारण
वित्त विभागाच्या दिनांक ०२ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील संबंधित संवर्गाबाबतच्या शिफारशी लागू करण्याबाबत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्र: वेतन १२१९/प्र.क्र.१९/टीएनटी-३, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ३० जानेवारी, २०२६.
संदर्भ:-
१. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-२०१८/प्र.क्र.४४/सेवा-९, दिनांक ०१ जानेवारी २०१९
२. शासन अधिसूचना वित्त विभाग क्र. वेपुर २०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी २०१९
३. शासन परिपत्रक वित्त विभाग वेपुर २०१२/प्र.क्र.८/सेवा-९, दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१९
४. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१९/टीएनटी-३, दि.२२ फ़ेब्रुवारी २०१९
५. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१०५/टीएनटी-३, दि.१० जानेवारी २०२०
६. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी २०२३
७. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१९/ टीएनटी-३, दि.०४ मे २० २३
८. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दिनांक १६ मार्च२०२४
९. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-११२५/प्र.क्र.०१/सेवा-९, दिनांक २ जून २०२५
प्रस्तावना:-
वित्त विभाग संदर्भ क्र.८ येथील शासन निर्णयानुसार श्री. मुकेश खुल्लर, सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ स्थापन करण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी वित्त विभागाने संदर्भ क्र.९ येथील शासन निर्णयान्वये स्विकृत्त केल्या आहेत. या अनुषंगाने या विभागाच्या अखत्यारितील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार कार्यवाही करण्याकरिता मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
वित्त विभागाच्या संदर्भ क्र.९ येथील शासन निर्णयात जोड्पत्र २ येथे नमूद केल्यानुसार वेतनत्रुटी समितीने वेतननिश्चिती, निवडश्रेणी व प्रशासकिय सुधारणांबाबत केलेल्या शिफ़ारशींपैकी या विभागाच्या अखत्यारितील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे.-
काही प्रसंगी सहायक शिक्षक यांचे वेतन दिनांक ०१.०१.२०१६ रोजी एस-१३ मध्ये आणि सहायक शिक्षक पदावरुन पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन एस-१४ या वेतनश्रेणीत निश्चित करताना सहायक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक ०१.०१.२०१६ रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक ०१.०१.२०१६ रोजी कमी होत असल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ मधील नियम ७ (१) (अ) (एक) अन्वये, त्याच वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे. उपरोक्त प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करुन, तद्नंतरच वेतननिश्चिती अंतिम करुन पुढील कार्यवाही करावी.
२. उपरोक्त संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी व समितीच्या शिफारशी लागू करताना संदर्भ क्र.९ येथील दि. ०२.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती लागू राहतील.
३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ई ऑफ़िस १२७१०५७, नोट #८, दिनांक २५/११/२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२६०१३०१७४८१२७७२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक
(आबासाहेब कवळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

