पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी त्रुटी निवारण Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran

Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran

Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran

Padvidhar Vetantruti Nivaran

Graduate Pay Error Troubleshooting

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

पदवीधर वेतन त्रुटी निवारण

पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी त्रुटी निवारण

वित्त विभागाच्या दिनांक ०२ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील संबंधित संवर्गाबाबतच्या शिफारशी लागू करण्याबाबत

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्र: वेतन १२१९/प्र.क्र.१९/टीएनटी-३, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : ३० जानेवारी, २०२६.

संदर्भ:-

१. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-२०१८/प्र.क्र.४४/सेवा-९, दिनांक ०१ जानेवारी २०१९

२. शासन अधिसूचना वित्त विभाग क्र. वेपुर २०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी २०१९

३. शासन परिपत्रक वित्त विभाग वेपुर २०१२/प्र.क्र.८/सेवा-९, दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१९

४. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१९/टीएनटी-३, दि.२२ फ़ेब्रुवारी २०१९

५. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१०५/टीएनटी-३, दि.१० जानेवारी २०२०

६. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी २०२३

७. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१९/ टीएनटी-३, दि.०४ मे २० २३

८. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दिनांक १६ मार्च२०२४

९. शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर-११२५/प्र.क्र.०१/सेवा-९, दिनांक २ जून २०२५

प्रस्तावना:-

वित्त विभाग संदर्भ क्र.८ येथील शासन निर्णयानुसार श्री. मुकेश खुल्लर, सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ स्थापन करण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी वित्त विभागाने संदर्भ क्र.९ येथील शासन निर्णयान्वये स्विकृत्त केल्या आहेत. या अनुषंगाने या विभागाच्या अखत्यारितील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार कार्यवाही करण्याकरिता मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

  शासन निर्णयः

वित्त विभागाच्या संदर्भ क्र.९ येथील शासन निर्णयात जोड्पत्र २ येथे नमूद केल्यानुसार वेतनत्रुटी समितीने वेतननिश्चिती, निवडश्रेणी व प्रशासकिय सुधारणांबाबत केलेल्या शिफ़ारशींपैकी या विभागाच्या अखत्यारितील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे.-

वेतनत्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालातील वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील शिफारसपात्र संवर्गांना लागू करण्याबाबत.शासन निर्णय नक्की वाचा या ओळीला स्पर्श करून

काही प्रसंगी सहायक शिक्षक यांचे वेतन दिनांक ०१.०१.२०१६ रोजी एस-१३ मध्ये आणि सहायक शिक्षक पदावरुन पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन एस-१४ या वेतनश्रेणीत निश्चित करताना सहायक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक ०१.०१.२०१६ रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक ०१.०१.२०१६ रोजी कमी होत असल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ मधील नियम ७ (१) (अ) (एक) अन्वये, त्याच वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे. उपरोक्त प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करुन, तद्नंतरच वेतननिश्चिती अंतिम करुन पुढील कार्यवाही करावी.

दिनांक २८.४.२०२२ रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024 वेतन त्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत शासन निर्णय नक्की वाचा या ओळीला स्पर्श करून

२. उपरोक्त संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी व समितीच्या शिफारशी लागू करताना संदर्भ क्र.९ येथील दि. ०२.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती लागू राहतील.

३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ई ऑफ़िस १२७१०५७, नोट #८, दिनांक २५/११/२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२६०१३०१७४८१२७७२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

 शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक 

(आबासाहेब कवळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran
पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी त्रुटी निवारण
वित्त विभागाच्या दिनांक ०२ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील संबंधित संवर्गाबाबतच्या शिफारशी लागू करण्याबाबत
Padvidhar Shikshak Vetan Truti Nivaran

Leave a Comment

error: Content is protected !!