Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

IMG 20240626 204027
Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

ग्राम विकास विभाग, मुंबई

क्रमांकः न्यायाप्र २०२३/प्र.क्र.३९७/आस्था-४

दिनांक:- २५.०६.२०२४

प्रति,

१) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, धंतोली, वर्धा जिल्हा वर्धा- ४४२००१

२) अध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र (राज्यस्तर), परभणी-४३१४०१

३) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना, साईगंगा, लक्ष्मीनारायण नगर, लाडगांव रोड, वैजापूर, जि. औरंगाबाद-४२३७०१

४) अध्यक्ष, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी

५) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन १०२, शर्मा नगर, चितोड रोड, धुळे.

६) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना, पुणे प्लॉट नं. २३, महालक्ष्मी नगर, उजळाई वाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर

७) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, वित्त विभाग, जिल्हा परिषद, पुणे

८) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, मु. सायगाव, पो. एकंबे, ता. कोरेगाव, जि. सातारा-४१५५०१

विषयः- राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत संदर्भ:- वित्त विभागाकडील दि.१४.०६.२०२४ रोजीचे पत्र (प्रत संलग्न)

महोदय
उक्त संदर्भाधीन पत्रान्वये राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारीत वेळापत्रक देण्यात आले आहे. सदर पत्रात ग्राम विकास विभागाकरीता दि.०२.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० अशी वेळ देण्यात आली आहे.

२. उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दि.०२.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वाजता मंत्रालय, विस्तार इमारत, २ रा मजला, दालन क्र. २४१, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई-४०००३२ येथे (तसेच सादरीकरण करावयाचे असल्यास आगाऊ कळविण्यात यावे) बैठकीस जास्तीत जास्त ४ प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, ही विनंती.

आपला,
(सुभाष इंगळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20240626 204102
Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

Also Read 👇

IMG 20240617 105751
Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

image 2
Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

क्रमांक-वेपुर-११२४/प्र.क्र.८/सेवा-९

दिनांक : १४ जून, २०२४

प्रति,

अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग

विषय :- राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्याबाबत.

संदर्भ :- या विभागाचे समक्रमांकाचे दि. ३१ मे, २०२४ रोजीचे पत्र

महोदय,

उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ कडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने दिनांक १९.६.२०२४ ते ३१.७.२०२४ या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले होते.

तथापि, दिनांक २७.६.२०२४ पासून राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होत असल्यामुळे सदर सुनावणीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे. त्यानुसार अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती यांच्यासोबत प्रशासकीय विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

वेतनत्रुटी समिती कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात

आलेल्या बैठकीचे वेळापत्रक

IMG 20240617 105558
Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय (विस्तार इमारत), दालन क्र. २४१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई

क्रमांक-वेपुर-११२४/प्र.क्र.८/सेवा-९

दिनांक ३१.५.२०२४

प्रति, सह सचिव/उप सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग

विषय : राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाब

State Pay Error Redressal Committee 2024 Report

Extension of time for submission of State Pay Error Redressal Committee 2024 proposal

Rajya Vetan Truti Nivaran Samiti 2024

संदर्भ : १. या विभागाचा शासन निर्णय क्रमांक वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दिनांक १६.०३.२०२४.

महोदय,

२. या विभागाचे समक्रमांकाचे दि.८.४.२०२४,९.५.२०२४,१५.५.२०२४ व दि.२८.५.२०२४ रोजीची पत्रे.

संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार बेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासुन ६ महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. वास्तव मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाबाबतचे प्रस्ताव प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून सादर करण्यास नमूद केले आहे. या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक १६.५.२०२४ पुर्वी सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ येथील दि.९.५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये

कळविण्यात आले होते. तथापि, निवडणुकोच्या कामकाजासाठी विभागातील अधिकारी/कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर असल्यामुळे दि.१५.५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये दि.३१.५.२०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत विभागांना कळविण्यात आले होते.

अदयाप काहीच मंत्रालयीन विभागांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दिनांक १०.६.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सबब, आपल्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील नमूद तरतुदोप्रमाणे कार्यवाही करून दिनांक १०.६.२०२४ पूर्वी वित्त विभाग/सेवा-९ कार्यासनाकडे (बेतनत्रुटी निवारण समितीकडे) आपल्या अभिप्रायासह सादर करावेत, ही विनंती.

तसेच, मंत्रालयीन विभागांकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर दि.१८.६.२०२४ ते दि.३१.७.२०२४ या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सुनावणीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे. (याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.) सुनावणीच्या वेळी आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीचे संकलन करण्याबाबत व यापुढील प्रस्ताव वेतनत्रुटी समितीला सादर करताना हार्ड कॉपी सोबत ई-ऑफीसव्दारे (Vrishali Bhingarde या अकाऊंटवर) पाठविण्याबाबत आपणास दि. २८.५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे. कृपया त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

वेतन त्रुटीनिवारण समितीच्या सुनावणीचे वेळापत्रक

दिनांक
विभाग

१८.६.२०२४ – मराठी भाषा विभाग

१९.६.२०२४ – सामा. न्याय व विशेष सहा. विभाग

२०.६.२०२४ – जलसंपदा विभाग

२१.६.२०२४ – इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभाग

२४.६.२०२४ – सामान्य प्रशासन विभाग

२५.६.२०२४ – महिला व बाल विकास विभाग

२६.६.२०२४ – विधी व न्याय विभाग

२७.६.२०२४ – वित्त विभाग

२८.६.२०२४ – उदयोग ऊर्जा व कामगार विभाग

१.७.२०२४ – सार्वजनिक आरोग्य विभाग

२.७.२०२४ – उच्च व तंत्र शिक्षण विभाग

३.७.२०२४ – कृषी व पदुम विभाग

४.७.२०२४ – वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

५.७.२०२४ – गृह विभाग

८.७.२०२४ – ग्राम विकास विभाग

९.७.२०२४ – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

१०.७.२०२४ – सार्वजनिक बांधकाम विभाग

११.७.२०२४ – नियोजन विभाग

१२.७.२०२४ – शालेय शिक्षण विभाग

१५.७.२०२४ – आदिवासी विकास विभाग

१६.७.२०२४ – नगर विकास विभाग

१८.७.२०२४ – महसूल व वन विभाग

१९.७.२०२४ – विधानमंडळ

२२.७.२०२४ – सहकार पणन व वस्त्रोदयोग विभाग

२३.७.२०२४ – पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

२४.७.२०२४ -पर्यावरण विभाग

२५.७.२०२४ -गृह निर्माण विभाग

२६.७.२०२४ – कौशल्य विकास व उदयोजकता

२९.७.२०२४ – पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

३०.७.२०२४ – अल्पसंख्यांक विभाग

३१.७.२०२४ – मृदा व जलसंधारण विभाग व दिव्यांग कल्याण विभाग

आपली,

(वृषाली भिंगार्डे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!