थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali

Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali

Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali
Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali

Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali

Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali Year 2026-27

Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026 – 27

Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth System Year 2026-27

Online submission of outstanding salary payments in the Shalaarth system. Year 2026-27

क्र. शिसंमा/२०२६/टि-७/थकीत /ऑनलाईन / 1894257
दिनांक :-/०५/२०२६.
12 MAY 2026

महत्वाचे परिपत्रक

विषय – थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७

संदर्भ-
१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/(३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.
२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१
३) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिर्समा/२०२४/टि-७/शालार्थ/धकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.
४) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४.
५) दिनांक ०७/०४/२०२६ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ३ व ४ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.
सन २०२६-२७ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून आज दिनांक १२/०५/२०२६ पासून ऑनलाईन टॅब सुरू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

    अ.क्र. तपशिल

१ संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करून सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरुन थकीत देयकासह माहिती भरावी. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) शिक्षणाधिकारी/अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन / तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२६-२७ मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोषागारात सादर न केलेली व मान्यता न मिळालेली देयके पुनश्च ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत.
प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.

२. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) व संबंधित शिक्षणाधिकारी ( प्राथमिक/माध्यमिक) यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करणे.
तथापि, ऑन लाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता/बरिष्ठश्रेणी / न्यायालयीन आदेश / अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

२. विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र यापूर्वी दिलेले आहे. उपरोक्त क्रमांक १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

३. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचेकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता संचालकाकडे सादर करणे तसेच उपरोक्त अ.क्र..१ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

१. विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील समितीचे मंजूरीस्तव शिफारसपत्र.

२. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता/बरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

३. विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र जोडावे. यापूर्वी दिले प्रमाणे

४. न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाचे न्यायालयीन प्रकरण वावतचे परिपत्रक दि.६/१/२०२३ नुसार सादर करावे.

४ विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंवित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना शासन निर्णय १५/७/२०१७ मधील सूचनानुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजूरी शिक्षण संचालक यांचे स्तरावरुन देण्यात येईल.

५ संचालनालय स्तरावरुन शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील सूचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षनिहाय पुरवणी मागणी / पुनर्विनियोजन/ सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करण्यात येईल.

६. वरीलप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक ४ मध्ये नमूद प्रशासकीय मान्यतानुसार संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करुन स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरीत करण्यात येईल.

७ थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशील परिशिष्ट अ प्रमाणे (सोबत जोडली) आहे.

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali
थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali

    परिशिष्ट अ

थकीत वेतन देयक विषय निहाय आवश्यक कागदपत्रे
विषय आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड सोबत जोडणेचे कागदपत्रे

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali
थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Online Submission Of Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali

Leave a Comment

error: Content is protected !!