Tab is Available in Shalarth for online Pay of Pending Supplementry Salary Bills
Tab is Available in Shalarth for online Pay of Pending Supplementry Salary Bills
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन / ६७६६
प्रति,
दिनांक: १/१/२०२५
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व
01 JAN 2025
३. शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४. अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक)
विषय- सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/५०४७
दि. ११/९/२०२४
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६
दि. २५/९/२०२४.
उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शी संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दि. १५/१०/२०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले होते.
तथापि त्यानंतर शिक्षणाधिकारी/अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही.
सबब अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात येत आहे.
अ.क्र. तपशिल
१ अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांनी शाळांकडून प्राप्त थकीत देयके विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित यांना सादर करावयाचा अंतिम दिनांक.
विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी वेतन पथक यांचेकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक २०/०१/२०२४५
सन २०२४-२५ थकीत देयके ऑनलाईन सादर करणे.
दि. १०/०१/२०२५ पर्यंत
दि. २०/०१/२०२७.
तरी वरील तक्त्यामध्ये नमूद दिनांकापर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचालनालयास सादर करावी. तसेच क्षेत्रिय समितीचा सर्व सदस्यांचा संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील
विवरणपत्र क्रमांक १, २, व ३ ची हार्ड कॉपी संचालनालयास सादर करावी. तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयक प्रस्तावासोबत विधी अधिकारी यांचे स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाबाबतचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, घटनाक्रम व इतर आवश्यक कागदपत्रासह हार्ड कॉपी सादर करावी. त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके स्विकारली जाणार नाही. व त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
(संपत सुर्यवंशी) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे-१
२. श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२
Also Read 👇
Tab is Available in Shalarth for online Pay of Pending Supplementry Salary Bills
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, पुणे
क्र.शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/2868
प्रति,
दिनांक :-३/४/०६/२०२४.
श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट,
शालार्थ सिस्टीम, महाआयटी,
मुंबई.
विषय- थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत.
Pending Supplementry Salary Bills Shalarth New Tab Available
संदर्भ- १) वेतन पथक, माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिअवेपना/आस्था/२०२४-२५/१२७२ दि. ३/६/२०२४.
२) वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिक्षण/वेतन व भ.नि.नि. पथक/२०२४- २५/१२७३ दि. ३/६/२०२४.
उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅब शालार्थमध्ये बंद आहे. संदर्भ क्र. १ अन्वये वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली आहे.
२. त्याअनुषंगाने लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२१९४८ या लेखाशीर्षाची पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.
३. तसेच २२०२०४४२ व २२०२०४७८ ची वैद्यकीय देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायदा अंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सदरहु टॅब सद्यस्थितीत दिनांक 18 जून 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावा
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
👉सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा👈
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
२) रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२
प्रत- १) विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, संबंधित सर्व.
२) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) संबंधित सर्व.