थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत सन २०२५-२६ Thakit Vetan Deyak

Thakit Vetan Deyak

Thakit Vetan Deyak

Online submission of outstanding salary payments in the Shalaarth Pranali

Thakit Vetan Deyak Online Submission in Shalaarth

शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र.शिसंमा/२०२५/टि-७/थकीत /ऑनलाईन / 05369

दिनांक : १/११/२०२५.

महत्वाचे परिपत्रक

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षण निरीक्षक, उत्तर/दक्षिण/पश्चिम, मुंबई
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) सर्व.

विषय – थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत.
सन २०२५-२६

संदर्भ-
१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.
२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१
३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४
६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.तपशिल

१ संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करुन सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरुन थकीत देयकासह माहिती भरावी. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) शिक्षणाधिकारी/अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन /तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२४-२५ मध्ये

Thakit Vetan Deyak
Thakit Vetan Deyak

शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये सादर करावे. प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये सादर करावा.

डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील, त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

डीडीओ-२ शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक ३१/०१/२०२५ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील. डिडिओ २ यांनी अंतिम दिनांकापर्यंत वाट न पाहता शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून जसे जसे ऑनलाईन चकीत देयके प्राप्त होतील तसे नियमानुसार पडताळणी करून थकीत देयके त्वरीत पुढे अग्रेषित करावी.

सन २०२४-२५ मध्ये डिडिओ-२ यांनी शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. त्यामुळे डिडिओ-२ यांनी शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी/पडताळणी करूनच पुढे फॉरवर्ड करावे.

डीडीओ-३ विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक १०/०२/२०२५ पर्यंत मुविधा उपलब्ध राहील. डिडिओ-३ यांनी अंतिम दिनांकापर्यंत वाट न पाहता शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून त्वरीत संचालनालयास फॉरवर्ड करावे.

उपरोक्त नमूद अंतिम दिनांकापर्यंत संबंधित डिडिओ यांनी वाट न पाहता त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून त्वरील पुढील डिडिओकडे ऑनलाईन अग्रेषित करावीत. व यासोबतच सदरील देयकाची (हार्ड कापी) पडताळणीसह व स्पष्ट शिफारशीसह संचालनालयास सादर करावी.

सन २०२४-२५ मध्ये डिडिओ-३ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त काही थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता संचालनालयाकडे फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. त्यामुळे डिडिओ-३ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी/पडताळणी करूनच पुढे फॉरवर्ड करावे.

वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने आपल्यास्तरावरुन दिलेली कालमर्यादा पाळल्यास दिनांक १५/७/२०१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे सोईचे होईल व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकूर होईल. तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करता येईल. बर नमूद कालमर्यादा सर्वच स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये

(User Manual) पहावे. व परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक, प्राथमिक महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१.

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२. श्रीसी विशाल लोहार, कक्ष अधिकारी (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. यांनी वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सन २०२५-२६ थकीत देयके अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच वेळोवेळी येणा-या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे.

Leave a Comment

error: Content is protected !!