Krutrim Buddhimatta Dhoran

Krutrim Buddhimatta Dhoran

Krutrim Buddhimatta Dhoran

Maharashtra Krutrim Buddhimatta (AI) Dhoran-2026

Maharashtra Artificial Intelligence (AI) Policy-2026

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६

महाराष्ट्र शासन
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग

शासन निर्णय क्रमांक: POLICY-2026/C.R.64/IT (E-1604501)
मंत्रालय, मुंबई

दिनांक: ०६ मे, २०२६

प्रस्तावनाः

कृत्रिम बुद्धिमत्ता ही जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था, उद्योग आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. भारतामध्ये “National Strategy for Al”, “IndiaAl Mission”, Al पोर्टल्स, उत्कृष्टता केंद्रे (COE) आणि सार्वजनिक व खासगी गुंतवणूक यांच्या माध्यमातून AI क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून वित्त, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे आर्थिक विकास, प्रशासनातील सुधारणा व नागरिकाभिमुख सेवा वितरणासाठी AI चा उपयोग करण्यासाठी राज्य सक्षम आहे.

राज्यात आधीपासून नवोन्मेष क्षेत्रे, स्टार्टअप्सना चालना देणे, AI पायाभूत सुविधा व क्षेत्रनिहाय AI चा वापर यासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तथापि, AI चा व्यापक अवलंब, गुंतवणूक आकर्षित करणे, स्थानिक क्षमता विकसित करणे व AI चा नैतिक व जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी संरचित धोरणाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६” तयार करून त्यास मा. मंत्रिमंडळाच्या दि. २९ एप्रिल, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे. सदर मान्यतेस अनुसरून “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६” प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

   शासन निर्णय :

मा. मंत्रिमंडळाच्या दि. २९ एप्रिल, २०२६ रोजीच्या बैठकीत प्राप्त मान्यतेस अनुलक्षून मराठी व इंग्रजी भाषेतील महाराष्ट्र राज्यासाठीचे “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) घोरण-२०२६” सदर शासन निर्णयाच्या परिशिष्ट-अ आणि परिशिष्ट-ब येथे जोडल्याप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

२. सदर धोरणाचे खालीलप्रमाणे प्रमुख ७ स्तंभ आहेत.

i. राज्यव्यापी AI सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांचा विकास,

ii. कृत्रिम बुद्धिमत्ता नवोपक्रम आणि आंतरकार्यक्षमतेसाठी (Interoperability) स्थानिक डेटासेट्स आणि प्लॅटफॉर्म्स निर्मीती,

iii. भविष्योन्मुख मनुष्यबळासाठी स्थानिक कौशल्य विकास व प्रशिक्षण,

iv. सार्वजनिक क्षेत्रातील नवोपक्रमांसाठी “स्टार्टअप फर्स्ट” चा अवलंब व अर्थसहाय्य,

V. प्रायोगिक प्रकल्पांना उत्पादन स्तरावर नेण्यासाठी (Pilot-to-Scale Deployment) अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवेगकाची अंमलबजावणी,

vi. अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्रे (CoEs),

vii. नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (Ethical Al) आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी अनुपालन आराखडा.

३. या धोरणाच्या परिशिष्ट १४ मध्ये कालानुरूप/वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागास असतील.

४. सदर धोरण हे शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू होईल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र.२०२६०५०६१५२२२८७२११ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने

स्वाक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Bशासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Krutrim Buddhimatta Dhoran
महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६
Krutrim Buddhimatta Dhoran
महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६

Krutrim Buddhimatta Dhoran
महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६
Krutrim Buddhimatta Dhoran
महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६

Leave a Comment

error: Content is protected !!