NISHTHA FLN online course on DIKSHA Portal
NISHTHA FLN Online Course On DIKSHA Portal Link
Regarding taking necessary action for beneficiaries to complete the NISHTHA FLN online course on DIKSHA Portal
DIKSHA Portal varil NISHTHA FLN online course labharthyanni purna karnesathi aavashyak karyavahi karanebabat
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व कीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/NISHTHA FLN/२०२६-२७/प्रति /545
दि.१५/०९/२०२६
21 SEP 2026
१. विभागीय उपसंचालक (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
४. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
५. प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा.. मुंबई
६. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)
७. शिक्षण निरीक्षक, दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई
संदर्भः IT विभाग, प्रस्तुत कार्यालय यांच्याकडून मराठी व गणित विभागास फॉरवर्ड CIET, NCERT नवी दिल्ली यांचा मेल दि. २२ जुलै, २०२६
उपरोक्त संदर्भान्वये आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत NISHTHA FLN हा ऑनलाइन कोर्स इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमांमध्ये विकसित केलेला आहे. सदर कोर्सचा कालावधी ३० तासांचा असून सदर कोर्सच्या उद्देश पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे असा आहे. हा कोर्स DIKSHA Portal वर अपलोड केलेला असून आपल्या अधिनस्त राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळेतील पायाभूत स्तरावरील (इ. १ली व २री) तसेच पूर्वतयारी स्तरावरील (इ. ३ ते ५) शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी हा कोर्स लागू आहे.
सदर कोर्स हिंदी, उर्दू व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत सदर कोर्ससाठी पहिल्या बॅचमध्ये नोंदणी केलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांना सदर कोर्स दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करता येईल. तसेच अद्याप नोंदणी न केलेले शिक्षक व मुख्याध्यापक यांनी दुसऱ्या बॅचसाठी दि. ०१ ऑक्टोबर २०२६ ते १० मार्च २०२७ या कालावधीत नोंदणी करून दि. ०१ ऑक्टोबर २०२६ ते १५ मार्च २०२७ या कालावधीत सदर कोर्स पूर्ण करावा.
कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारीः
१. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठीः
(अ) DIKSHA App डाउनलोड करणे: Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी. प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे.
२. Laptop / Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी:
Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login अथवा नोंदणी करावी. DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही. प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी. Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील “DIKSHA Courses” या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Search पर्यायामध्ये “NISHTHA FLN” कोर्स शोधून सदर कोर्समध्ये प्रवेश घ्यावा. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करावे.
करिता आपल्या स्तरावरून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांतील पायाभूत स्तरावरील (इ. १ ली व २ री) तसेच पूर्वतयारी स्तरावरील (इ. ३ ते ५) शिक्षक व मुख्याध्यापक यांना सदर कोर्ससाठी विहित कालावधीत नोंदणी करून सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी आदेशित करावे
Details of Courses Offered During Cycle 2 of Academic Year 2026-27
NISHTHA Category II: Specialisation Courses
SNO Programme Course Titie Medium of Instruction
Duration of Course
Course Link
Status
QR Code
1
NISHTH A FLN
NISH
English
30 Hour
https://learning.diksha.gov.in/diksha/cour se.php?id=1678§ion=3334
Ongoing
THA FLN h
Englis
NISH THA FLN Hindi
Hindi
Hour 30
https://learning.diksha.gov.in/diksha/cour se.php?id=1668§ion=3335
Ongoing
NISH
Urdu
Hour 30
https://learning.diksha.gov.in/diksha/cour se.php?id=1669§ion=3336
Ongoing
THA FLN Urdu
