Ek Bharat Shreshtha Bharat Upkram
Ek Bharat Shreshtha Bharat Upkram
Ek Bharat Shreshtha Bharat programme
Ek Bharat Shreshtha Bharat
“ek bharat-shreshth bharat “yojaneantargat sarv shalanmadhye upkram rabavine babat
Regarding implementing activities in all schools under the “One India-Best India”
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र.राशैसंप्रपम/कला व क्रीडा/EBSB/सन२०२६-२७/प्रति, दिनांकः स्वाक्षरी खाली नमूद
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
३. शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य), सर्व
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर मुंबई)
५. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा, सर्व
विषय : “एक भारत-श्रेष्ठ भारत “योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविणे बाबत…
संदर्भ : १. मा. संचालक, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, PACE Section, नवी दिल्ली यांचे पत्र जा. क्र F.No.1-7/2019-IS.5/PACE, Dated: 9th September, 2026 (बैठकीचे इतिवृत्त)
२. भारत सरकार शिक्षा मंत्रालय द्वारे आयोजित ऑनलाईन बैठक दि. २१ ऑगस्ट, २०२६ (मा. सहसंचालक, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, PACE Section, नवी दिल्ली यांचे पत्र जा. क्र F.No.1-7/2019-IS.5(Part.2)/PACE, Dated: 20th August 2026.)
३. मा. राजेशकुमार मौर्य, उपसचिव भारत सरकार यांचे पत्र दि.२०/११/२०२० ( सुधारित मार्गदर्शक सूचना)
उपरोक्त विषयाबाबत, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत “एक भारत – श्रेष्ठ भारत ” योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, भौगोलिक, जैविक विविधता, वेगवेगळे प्राणी, वनस्पती, संगीत, नृत्य, लघुचित्रपट चित्रपट, हस्तकला, खेळ, सण-उत्सव, साहित्य, चित्र-शिल्प या सर्वामध्ये विविधतेचे दर्शन होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून विविधता टिकविणे व त्याबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी देशातील राज्या-राज्यांची जोडी करुन राज्यांमधील उपरोक्त नमूद बाबींची माहिती करून घ्यावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची ओरिसा या राज्यात सोबत जोडी (Pairing) करण्यात आलेली आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत या उपक्रमातंर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये संदर्भ क्र. ३ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार उपक्रम घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. तथापि संदर्भ क्र. १,२ नुसार ऑनलाईन बैठकीचे इतिवृतानुसार सदर उपक्रम आयोजित करणे बाबत आदेशित करण्यात आले आहे.
संदर्भ क्र. ३ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ते १२ वीच्या शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रम कार्यान्वित कण्यात यावे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश करण्यात यावा. एक भारत- श्रेष्ठ भारत या उपक्रमातंर्गत सोबत जोडलेल्या यादीतील उपक्रम शाळांमध्ये माहे सप्टेंबर, २०२६ व एप्रिल, २०२७ या कालावधीत राबविण्यात यावेत. एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रम शाळेत राबविण्या संदर्भात स्तरावर आयोजित केल्यावर त्याबाबतची माहिती
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfC811mFdak4Sacb19xykNDl-IZmGTz2btejAruNahxw8nTcg/viewform
https://forms.gle/EzjagksxeC४४Pm५७८
या लिंकवर भरावी.
तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ” एक भारत-श्रेष्ठ भारत अंतर्गत सर्व उपक्रम राबविले जातील यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना तालुकास्तरीय/केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा, बैठका, झूम/गुगल मिटद्वारे प्रेरित करून शाळांना मार्गदर्शन करावे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयन्त करावे. दरमहा आपल्या जिल्ह्यातील शाळांनी राबविलेले उपक्रम व सहभागी विद्यार्थी यांची संख्यात्मक माहिती याचा आढावा घेतला जाईल. तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी सदर उपक्रम आप-आपल्या जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयात राबविण्यात यावे. तसेच संबंधित अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापक यांच्या मार्फत सराव पाठ करिता निश्चित केलेल्या शाळांमध्ये उपक्रम घेण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात यावे.
सोबत :- १. संदर्भीय पत्र क्र.३.
२. परिशिष्ट अ, ब, क
Digitally signed by
Kamaladevi Shridhar Awate Date: 02-10-2026 15:53:58
(डॉ. कमलादेवी आवटे ) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२
मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-१
मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई-०४
प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव सविनय सादर :
मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-०१
