Masik Dharm Nako Sharm Bharti Sharadrao Deshmukh Yancha Navopkram Rajyastravar
Masik Dharm Nako Sharm Bharti Sharadrao Deshmukh Yancha Navopkram Rajyastravar
Masik Dharm Nako Sharm “मासिक धर्म नको शर्म”
Menstruation, not shame
मासिक धर्म नको शर्म
Menstruation, not shame
Masik Dharm Nako Sharm Bharti Deshmukh’s innovation at the state level
२८ मे – जागतिक मासिक पाळी दिन
विटाळ मानिसी बाई । सांगे मजला काई ॥ जेणें गर्भ राहे पोटीं । तेचि निंदिसी गोठी ॥ नामा म्हणे ऐसी रीत । देव न मानी विटाळीत ॥
- संत नामदेव
बाई, विटाळ कशाला मानतेस? ज्या रजाने गर्भराहतो, त्याचीच निंदा करतेस? नामदेव म्हणतात, देवसुद्धा हा विटाळ मानत नाही.
मासिक धर्माचा विटाळ । सांगतो मी सकळ ॥ जेणें सृष्टी चालविली । तेचि निंद्य तुम्हां झाली ॥ एका जनार्दनीं । खोटा विटाळ जाळूनी ॥
- संत एकनाथ
ज्या मासिक धर्माने सृष्टी चालते, त्यालाच तुम्ही निंद्य ठरवले. एकनाथ म्हणतात, हा खोटा विटाळ जाळून टाका.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन
दरवर्षी २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन (World Menstrual Hygiene Day) साजरा केला जातो.
या दिवसाचा मुख्य उद्देश महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यासंबंधीचे गैरसमज दूर करणे आहे. साधारणपणे महिलांचे मासिक पाळीचे चक्र हे २८ दिवसांचे असते आणि मासिक पाळीचा कालावधी ४ ते ५ दिवसांचा असतो. वर्षातील पाचवा महिना (मे) आणि २८ तारीख, या सूत्राशी मेळ साधून हा दिवस २८ मे रोजी निश्चित करण्यात आला आहे. मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शन (संसर्ग) होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छ सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप किंवा सुती कापड वापरणे आणि नियमित बदलणे गरजेचे आहे. वापरलेले पॅड उघड्यावर न टाकता ते कागदात गुंडाळून कचरापेटीत टाकावे. तसेच, पॅड्स जाळणे किंवा योग्य पद्धतीने नष्ट करणे आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी चांगले असते. या दिवसात शरीरातील रक्तस्त्राव होत असल्याने सकस आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, ज्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. ग्रामीण व शहरी भागातील किशोरवयीन मुलींमध्ये याबद्दल योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी भारत सरकार तर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत किशोरवयीन मुलींना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवले जातात. तसेच, युनिसेफ आणि विविध सामाजिक संस्था मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करतात.
हेही वाचाल –
Bharti Sharadrao Deshmukh Yana Maharashtra Shasanacha Rajyastariy Aadarsh Shikshak Puraskar Pradan भारती शरदराव देशमुख यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून

👉 अशी असते राज्यस्तरीय नवोउपक्रम स्पर्धा अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून 👈
जागतिक महिला आरोग्य दिन
आज जागतिक महिला आरोग्य दिना निमित्ताने महिलांच्या आरोग्या विषयी……
आपल्याकडे स्वयंपाक ही घरोघर महिलांचीच जबाबदारी. त्यामुळे एक दिवस जरी चारीठाव स्वयंपाक करायला जमलं नाही किंवा मुलं उपाशी राहिली किंवा त्यांना बाहेरून मागवून जेवावं लागलं तरी तिला याची रुखरुख लागते, अपराधी वाटतं. मात्र या साऱ्यात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे, आरोग्याकडे किती लक्ष देतो हा साधा प्रश्न तिला पडत नाही.
आजही तिच्या आरोग्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी कुणी तिला सांगताना दिसत नाही. बाळंतपणानंतर पोट सुटू नये म्हणून ‘तू तीन महिने पोटपट्टा बांध’ असं डॉक्टर किंवा घरचेही तिला सांगत नाहीत. तसंच गर्भपिशवी खाली उतरू नये म्हणून साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत, पण त्याबद्दलही ती अनेकदा अनभिज्ञ असते. वेळच मिळत नाही म्हणते. दुसरीकडे इंटरनेट, स्मार्टफोनचा जमाना असल्यामुळे बाळासाठी काय खावं, काय करावं याचाच ती शोध घेते. ते सारं करते, पण स्वत:च्या आरोग्याविषयी किमान काही गुगलून ते करावं असं तिला वाटत नाही कारण ती आजही स्वत:च्या आरोग्याला अजिबात महत्त्व देत नाही, असं सावित्रीबाई फुले स्त्री संसाधनच्या सचिव डॉ. कामाक्षी भाटे सांगतात. खरंतर रोज स्वत:साठी थोडा वेळ काढून तिनं व्यायाम केला पाहिजे. स्वत:च्या आरोग्यासाठी सकस, योग्य आहार घेतला पाहिजे. पण अन्न फुकट जाईल म्हणून ती उरलेलं, रात्रीचं अन्न निमूट खाते. त्यातील पोषक तत्त्वे कमी झालेली असतात आणि मेद वाढलेला असतो. पण घरात कुणाला शिळं खाऊन तब्येत बिघडायचा त्रस नको आणि अन्नाची नासाडी नको म्हणून ती स्वत:च ते खाऊन टाकते. नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावर सुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणाऱ्या बाईला सुटी देते.
आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्या आधी दहादा विचार करते.
स्वत:च्या ‘फिटनेस’ साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. स्वत:च स्वत:च्या आरोग्याचा विचार प्राधान्यानं करणं बायकांसाठी फार गरजेचं आहे, असं डॉ. भाटे आवर्जून सांगतात. आणि हीच कारणं असावीत की, वरवर साऱ्या सोयीसुविधा बायकांच्या हाती दिसत असल्या, तरी आजही शहरासह खेड्यापाड्यात महिलांच्या आरोग्याचे प्राथमिक प्रश्न पूर्वी होते तसेच आहेत. आजही ५ टक्के महिला ‘अॅनिमिक’ आहेत. म्हणजे त्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. गर्भारपणात हे प्रमाण ८ टक्क्यांवर जातं. या प्रश्नी महिलांनी काय करायला हवं असं विचारलं तर स्त्रीआरोग्यतज्ज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन सांगतात, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन मूलभूत गोष्टींचा सखोल विचार व्हायला हवा. एक म्हणजे हिमोग्लोबिन आणि दुसरं म्हणजे पोटाचा घेर. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
निरोगी आरोग्यासाठी एक मंत्र महिलांनी कायम लक्षात ठेवून आचरणात आणायला हवा. ‘खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्तानं सावकाश खा आणि पोट भरायच्या आधी थांबा’ हा मंत्र लक्षात ठेवला तर आपसुकच पोटाचा घेर आटोक्यात येतो. महिलांच्या पोटाचा घेर हा अधिक असू नये एवढं पथ्य जरी सांभाळलं तरी आरोग्याचे अनेक प्रश्न आटोक्यात येतील. तेच हिमोग्लोबिनचंही.
हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण महिलांमध्ये १२ ते १४ ग्रॅम इतकं असावं. हिमाग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहते. चिडचिड होत नाही. उत्साह, आनंदी राहता येते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अत्यंत सोप साधे घरगुती उपाय आहेत. पण अनेकदा फॅशनेबल जगात ते पटत नाहीत. स्वयंपाक करताना लोखंडी तवा, कढई, उचटणं वापरल्यास रोज चार मिलिग्रॅम लोह शरीराला मिळतं. याचाही शरीराला खूप फायदा होतो. डाएट फूडपेक्षा नाचणीचे आंबिल, उकड खाल्ल्यास त्याचाही हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो. आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असल्यास हे घरगुती साधे सोपे उपाय करावेत. हिमोग्लोबिन प्रमाणात आणि पोटाचा घेर कमी राहिल्यास डॉक्टरांकडे जायची आवश्यकता फारशी उरणार नाही. पण हे सारं करायचं तर आपल्या प्राधान्यक्रमावर आपला क्रमांक वरचा हवा. आपली तब्येत धडधाकट ठेवून स्वत:कडे लक्ष देणंही गरजेचं आहे हे बायकांनीच मान्य करायला हवं. जग बदलण्यापूर्वी आपलीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे आरोग्य दिनानिमित्त आपण मान्य केलं तरी खूप मोठं काम होईल.
सुशिक्षित महिला या अचाट शक्तिशाली होण्याच्या जाळ्यात अडकत आहेत. या महिलांना ऑफिस मध्ये चांगले काम करायचं असतं. तिथे सर्वोत्तम काम करताना मिळवलेली थाप त्यांना घरच्यांकडूनही अपेक्षित असते. पण त्यांना ही थाप ऑफिसच्या कामासाठी नव्हे, तर घरच्या कामासाठी हवी असते. म्हणजे दिवाळीत उत्तम चकल्या करते, तिच्या हाताला चव आहे असं घरी ऐकायचं असतं आणि प्रेङोण्टेशन उत्तम होतं म्हणून प्रमोशन, हे ऑफिसात ऐकायचं असतं. एकाच वेळी त्यांना चांगली कर्मचारी, आई, सून, बायको व्हायचं असतं. आणि आपण तशा आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात स्वत:च्या आरोग्यावर येणाऱ्या ताणांकडे त्या दुर्लक्ष करतात, स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात, मनावरही ताण येतोच त्याच्याकडे काणाडोळा करतात. या साऱ्याचा ताण, त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मनावरही येत आहे. स्मार्ट आयुष्य जगण्याच्या आभासी वातावरणात आपण आपल्याकडेच लक्ष देणं बंद करतो आहोत का ? याचा विचार महिलांनी करायलाच हवा.
दर वर्षी २८ मे हा दिवस “मासिक पाळी स्वछता दिन” म्हणून साजरा केला जातो. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ,युनिसेफ, व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटी यांच्या सहकार्याने “मासिक पाळीबद्दल जाणीव-जागृती” व्हावी यासाठी दिनांक २८ मे रोजी राज्यस्तरीय संवादसत्राचे चे आयोजन करण्यात येत आहे
विषय – मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य व प्रश्नोत्तरे
दिनांक- २८ मे
वेळ – सोयीनुसार
राज्यातील सर्व विद्यार्थी ,पालक ,शिक्षक ,मुख्याध्यापक ,व अधिकारी यांनी सदर संवाद सत्रासाठी वेळेत उपस्थित राहावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे.
प्रति,
१) प्राचार्य ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
२) शिक्षणाधिकारी मनपा बृहन्मुंबई.
३) शिक्षणाधिकारी , (प्राथमिक /माध्यमिक )जिल्हा परिषद,( सर्व)
४) शिक्षणाधिकारी (,दक्षिण, उत्तर व पश्चिम) मुंबई.
५) प्रशासन अधिकारी म न पा ( सर्व)