Karmchari Svagram Badal GR
Karmchari Svagram Badal GR
karmchari svagram badal Shasan nirnay
Employee Swagram Change GR
rajya shasakiy karmcharyanna ghoshit
kelele svagram badal karnyasathi atirikt sandhi denebabat
Regarding giving additional opportunity to state government employees to make the declared change of residence
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घोषित केलेले स्वग्राम बदल करण्यासाठी अतिरिक्त संधी देणेबाबत
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः- रप्रस-२०२५/प्र.क्र.९/सेवा-५
मुबंई
दिनांक:- २६ मे, २०२६
वाचा:-
१. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक टिआरए-११६३/२७२६/व्हि, दिनांक २३ ऑक्टोबर, १९६३
२. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक टिआरए-११६४/९४/॥/५, दिनांक ०३ जून, १९६४
३ वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक रप्रस-१११४/प्र.क्र.११/सेवा-५, दिनांक १० जून, २०१५
प्रस्तावना :
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वरील संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली असून सदर तरतूदी वेळोवेळी सुधारित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत स्वग्राम घोषित करण्यासाठी प्रथम नियुक्ती दिनांकापासून ६ महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करण्याची कालमर्यादा विहित केली असून सदर कालमर्यादेत स्वग्राम घोषित केल्यास संबंधित कर्मचाऱ्यास पुढील सेवा कालावधीत स्वग्राम बदलण्याची संधी एकदा अनुज्ञेय आहे. तथापि, नियुक्ती दिनांकापासून सहा महिने कालावधीनंतर स्वग्राम घोषित करणाऱ्या कर्मचाऱ्यास सदर स्वग्राम बदलण्याची संधी नाही. त्याकारणे महिला कर्मचाऱ्यांना विवाह वा तदनुषंगिक अन्य कौटुंबिक घटना किंवा पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना शासकिय योजना वा नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतरण वा अन्य कौटुंबिक /वैयक्तिक कारणास्तव स्वग्राम बदल होत असल्यास सदर स्वग्राम बदलण्याची संधी अनुज्ञेय होत नाही. त्याकारणे सदरहु कर्मचारी स्वग्राम रजा प्रवास सवलतीचा लाभघेण्यापासून वंचित रहात आहेत. या प्रयोजनांमुळे स्वग्राम घोषित करण्याच्या कालमर्यादेची अट रद्द करणे योग्य नसल्याने शासनाने कर्मचाऱ्यांना स्वग्राम सवलत उपभोगण्याची संधी प्राप्त होत राहावी या दृष्टिकोनातून सदर तरतूद सुधारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने पुढील निर्णय
घेतला आहे.:-
शासन निर्णय
शासनाने कर्मचाऱ्यांना स्वग्राम सवलत उपभोगण्याची संधी संपूर्ण सेवा कालावधीत प्राप्त होत रहावी या दृष्टिकोनातून स्वग्राम घोषित करण्याबाबतची तरतूद पुढीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहे:-