Marathi Bhasha Gaurav Din Quiz With Certificate
Marathi Bhasha Gaurav Din Quiz With Certificate
Marathi Bhasha Gaurav Din Quiz
मराठी भाषा गौरव दिन प्रश्न
Marathi Bhasha Gaurav Din
मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिवस दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रासह इतर मराठी भाषिक भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व मराठी भाषेच्या जपणुकीसाठी, संवर्धनासाठी आणि गौरवासाठी आहे.
मराठी भाषा दिवस का साजरा करतात?
२७ फेब्रुवारी हा प्रसिद्ध मराठी कवी आणि साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन आहे. त्यांनी मराठी साहित्याला अभिजात दर्जा मिळवून दिला. त्यांच्या साहित्यसेवेला आदरांजली वाहण्यासाठी आणि मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी २००१ पासून हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषा दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टे
१ मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे
२ मराठी साहित्य आणि संस्कृती जपणे व पुढे नेणे
३ मराठी भाषेतील लेखक, कवी आणि साहित्यिक यांना सन्मान देणे
४ मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करणे
५ मराठी भाषेतील शुद्धलेखन आणि व्याकरण याबद्दल जागरूकता वाढवणे
मराठी भाषा दिवसाचे महत्त्वाचे कार्यक्रम
शाळा, महाविद्यालये, आणि संस्था यामध्ये मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम आयोजित करणे
मराठी कवी आणि साहित्यिक यांच्या साहित्याचे वाचन आणि चर्चा
निबंध, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आणि नाटकांचे आयोजन
मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबवणे
मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी प्रोत्साहन
मराठी भाषेचे महत्त्व आणि योगदान
मराठी ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील एक प्रमुख भाषा आहे.
भारतात ८ कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात.
मराठी ही भारताच्या संविधानाने अनुसूचित भाषांमध्ये समाविष्ट आहे.
मराठीत मोठे साहित्यिक, संत, समाजसुधारक आणि कवी होऊन गेले आहेत.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, लोकमान्य टिळक, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांसारख्या थोर व्यक्तींनी मराठी भाषेचा विकास घडवला.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे मराठी भाषा दिवस साजरा करून आपण आपल्या भाषेच्या जपवणुकीसाठी योगदान देऊ शकतो. या निमित्ताने मराठीचा अभिमान बाळगू या आणि तिचे संवर्धन करूया!
खालील पैकी …………………….. साहित्यिक यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो
प्रल्हाद केशव अत्रे
विष्णू वामन शिरवाडकर
राम गणेश गडकरी
पु.ल.देशपांडे
“मराठी राजभाषा दिन ” केव्हा साजरा केला जातो ?
२७ फेब्रुवारी
८ मार्च
१ मे
२८ फेब्रुवारी
वि.वा.शिरवाडकर यांचे टोपण नाव काय होते ?
बालकवी
केशवकुमार
कुसुमाग्रज
केशवसूत
मराठी भाषा गौरव दिन अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला
वि.वा. शिरवाडकर
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
प्रल्हाद केशव अत्रे
वि.वा. शिरवाडकर यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे ?
भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
नोबेल पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार
भारतरत्न पुरस्कार
मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे?
मराठा
दर्पण
केसरी
यापैकी नाही
———— हा आद्य कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला गेला आहे.
अमृतानुभव
विवेकसिंधू
लीळाचरित्र
भावार्थदीपिका
मराठी वर्णमालेत एकंदर ——— वर्ण आहेत?
४८
५०
२६
६०
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
आठ
चार
सात
सहा
त्र्यंबक बापूजी ठोंबरे या साहित्यिकाचे टोपण नाव ओळखा
बालकवी
अनिल
ग्रेस
केशवसूत
Thank you
Marathi bhash maharastra matru bhash