Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award

IMG 20250226 130703
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award

The first ‘Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet’ Award of the state government was announced for the song ‘Anadi Me Anant Me’ written by Freedom Fighters Vinayak Damodar Savarkar

“छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” सन २०२५ घोषित करण्याबाबत.

दिनांक : २५ फेब्रुवारी, २०२५

वाचा :-
१) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.सां.का.सं./ १००१, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५.
२) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण ८२२५/प्र.क्र.११५/सां.का.४, दि. २५.०२.२०२५.
३) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.सां.का.सं./ १०४८, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५.

प्रस्तावना:-
उपर्निदिष्ट क्र. २ येथील शासन निर्णयान्वये मराठी अथवा मराठी बोलीभाषेमधून लिहिलेल्या व संगीतबद्ध झालेल्या एका प्रेरणा गीतास सन २०२५ सालाकरीता “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” म्हणून प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    शासन निर्णय

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहीलेल्या “अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला” या प्रेरणा गीतास “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” सन २०२५ म्हणून या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येत आहे.

०२. सदर पुरस्काराचे स्वरुप रक्कम रुपये २.०० लक्ष (रुपये दोन लाख फक्त) मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०२२५१८१७१०६०२३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण ८२२५/प्र.क्र.११५/सां.का.४, मंत्रालय, मुंबई

IMG 20250226 130713
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award

Leave a Comment

error: Content is protected !!