Marathi Raj Bhasha Din

Marathi Raj Bhasha Din मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन या विशेष दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक ईप्रमाणपत्र ईमेल वर मिळवा

Din
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून “१ मे” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक यांचे सरकार यांनी ‘मराठी राजभाषा अधिनियम १९६४’ सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे.
वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली.
‘मराठी राजभाषा अधिनियम १९६४’  सन १९६६ पासून अंमलात आला राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले.
मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.
‘मराठी भाषा गौरव दिवस’ (२७ फेब्रुवारी) आणि ‘मराठी भाषा दिवस’ (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
मराठी ही भारतातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. आणि जगातील १५ वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे जी भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक परंपरा आणि समृद्ध साहित्यिक वारसा आहे.संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषा आणि संस्कृती जपली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा पहिले राजकोश स्थापन केला.
मराठी भाषेचा विकास नंतर देवगिरीच्या यादव राजवटीत झाला. संत एकनाथ महाराजांनी भारुडे मराठीत लिहिले आहे. महिंभट यांनी लीळा चरित्र लिहिले, तर संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली.अनेक संतांची कीर्तने, ओव्या, भजने मराठी भाषेत सापडतील.
पैठणच्या सातवाहन साम्राज्याने प्रशासकीय बाबींमध्ये प्रथम महाराष्ट्री भाषा स्वीकारली.महाराष्ट्र आणि गोवा त्यांच्या अधिकृत भाषा म्हणून मराठी बोलतात.
मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन या विशेष दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक ईप्रमाणपत्र ईमेल वर मिळवा त्यासाठी खालील सूचनांचे पालन करा
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे तुमचा ईमेल बरोबर नोंदविल्याची खात्री करा 
तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर ईप्रमाणपत्र येईल
ईप्रमाणपत्र मिळण्यासाठी ४०% गुण मिळणे अनिवार्य 

6 thoughts on “Marathi Raj Bhasha Din”

  1. खूप छान उपक्रम हाती घेतला आहे.💐🙏💐🙏💐🙏💐🙏🙏💐

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!