Finalizing Information Of Schools In U Dise Plus
Finalizing Information Of Schools In U Dise Plus
Finalizing Information Of Schools In U Dise Plus system
Regarding checking and finalizing the information of schools in all three portals – schools, students and teachers – for the year 2024-25 in the U-Dice Plus system
विषयः यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सन २०२४-२५ ची शाळा, विद्यार्थी व शिक्षक या तीनही पोर्टलमधील शाळांची माहिती तपासून अंतिम करणेबाबत.
संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. २३-२/२०२४-Stats दिनांक ०४ एप्रिल, २०२५.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये दि. ३० एप्रिल, २०२५ पर्यंत अंतिम करून राज्याचे प्रमाणपत्र यु-डायस प्लस प्रणालीवर अपलोड करण्याचे कळविले आहे.
NEP २०२० नुसार Gross Enrolment Ratio १००% असण्याच्या अनुषंगाने नियमित शाळा व या शाळांमधील पूर्व प्राथमिक वर्गासोबतच, नोंदणी नसलेल्या अनौपचारिक पूर्व प्राथमिक केंद्र/शाळा, अनाधिकृत शाळा, यु-डायस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा व कौशल्य केंद्रे इ. मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचीही नोंदणी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब, नोंदणी नसलेल्या अनौपचारिक पूर्व प्राथमिक केंद्र/शाळा, अनाधिकृत शाळा, यु-डायस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा व कौशल्य केंद्रे इ. शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती तालुका लॉगिनमधून गटशिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी यांनी नोंदवून घेणे बंधनकारक आहे. याप्रमाणे सर्व नोंदी मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी/शिक्षणाधिकारी यांची राहील.
या सोबत शाळांच्या काही महत्वाच्या मुद्यांची माहिती अंतिम करतांना खालील मुद्ये काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.
संगणकीय साहित्य शाळेमध्ये उपलब्ध असलेले संगणकीय साहित्य (संगणक, लॅपटॉप, सर्व्हर, प्रोजेक्टर, टॅबलेट, स्मार्ट टि.व्ही, स्मार्ट बोर्ड, प्रिंटर, मोबाईल फोन) विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरात असल्यास त्याच संगणकीय साहित्याची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करण्यात यावी. कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या संगणकांची नोंद विद्यार्थ्यांसाठीचे साहित्य म्हणून करण्यात येवू नये.
संगणक प्रयोग शाळा: संगणक प्रयोगशाळांमध्ये किमान ५ संगणक उपलब्ध असणे
आवश्यक आहे. सदर संगणक प्रयोग शाळेतील संगणक विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यापूर्वी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून (सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, समग्र शिक्षा इत्यादी) शाळांना संगणक प्रयोग शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा शाळांमधील संगणक प्रयोगशाळांचे ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर संगणक प्रयोग शाळेचे हस्तांतरण शाळांना करण्यात आले आहे. या संगणक प्रयोगशाळेचे संचालन शाळा स्तरावरून करण्यात येते. तथापि, सदर संगणक साहित्य बंद असेल, वापरण्यास योग्य नसेल तर अशा साहित्याची शासन निर्णय दि. ०१ ऑगस्ट, २०११ नुसार निर्लेखनाची कार्यवाही करण्यात यावी व निर्लेखन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर शाळेत प्रयोगशाळा नसल्याबाबतची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करावी.
इंटरनेट सुविधा : यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे किंवा कसे? याबाबतची माहिती विचारण्यात येते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये उपलब्ध असलेली इंटरनेट सुविधा लक्षात घेवून पुढील प्रमाणे नोंद करून माहिती तात्काळ अद्ययावत करावी. (1-Broadband/Leased Line, 2-USB Modem/dongle/Portable Hotspot, 3-Telephone line with modem, 4-Mobile phone Internet, 5-Any
Other type of connection, 6-VSAT)
पिण्याच्या पाण्याची सुविधा यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेमध्ये असलेल्या
पिण्याच्या पाण्याची उपलब्धताबाबत माहिती विचारण्यात येते. तरी भरण्यात आलेली माहिती पुढील मुद्यांच्या अनुषंगाने (Hand pumps/Bore well, Protected Well, Unprotected Well, Tap water, Packaged/Bottled Water, Others) भरण्यात आलेली आहे किंवा कसे? तपासून तात्काळ माहिती अद्ययावत करण्यात यावी. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होवू शकत नाही, अशा ठिकाणी स्वच्छ पेय पाण्याची/पिंपाची सुविधा उपलब्ध करून घ्यावी व त्याची नोंद इतर प्रकार (Other) मध्ये करण्यात यावी.
मुलां व मुलींकरिता स्वच्छतागृह : शाळेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीकरिता नोंदविण्यात
आलेल्या स्वच्छतागृहांची संख्या तपासून जसे, मुलांकरिता, मुलींकरिता, दिव्यांग मुलामुलींकरिता, स्वतंत्रपणे उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या यु-डायस प्रणालीमध्ये तात्काळ अचूक नोंदवावी.
विद्युत सुविधा : केंद्र शासनाकडून संगणक प्रयोगशाळा/स्मार्ट क्लासरूम यासारख्या सुविधा मंजूर करत असतांना विद्युत सुविधा उपलब्ध आहे, याची तपासणी केली जाते यामुळे विद्युत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करूनच तशी नोंद करावी.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी इतरही सर्वच मुद्यांची माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याची पडताळणी करून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अंतिम करावी.
त्याअनुषंगाने दि. २८ एप्रिल, २०२५ पर्यंत सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी यांनी तालुका/मनपा स्तरावरील सर्व शाळांची माहिती तपासून प्रमाणपत्र अपलोड करावे. तसेच सर्व शिक्षणाधिकारी यांनी तालुका व मनपा स्तरावरील माहिती तपासून. जिल्हास्तर प्रमाणपत्र अपलोड करावे. त्यानंतरच दि. ३० एप्रिल, २०२५ रोजी राज्यस्तर प्रमाणपत्र अपलोड करता येईल.
(संजय यादव, भा.प्र.से)
राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.