Eco Club Mission Life Earth Day Portal Link
Eco Club Mission Life Earth Day Portal Link
Regarding regular documentation of information on activities under Eco Club Mission Life on the portal starting on Earth Day on 22/04/2025
विषयः – इको क्लब मिशन लाईफतंर्गत दि.२२/०४/२०२५ रोजी पृथ्वी दिन सुरू होणाऱ्या पोर्टलवर उपक्रमांच्या माहितींचे नियमित दस्ताऐवजीकरण करणेबाबत.
संदर्भ:-
१. केंद्र शासनाचे पत्र क्र. १०-१/२०२४-EE.१२ (EcoClub) दि. ०९/०४/२०२५.
२. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/२०२४-२५/११४७दि. ११/०४/२०२५
३. केंद्रशासनाचे पत्र क्र. D.O.No.8-6/2025-EE.12 (Eco Club), दि. ११/०४/२०२५
केंद्र शासनाने संदर्भिय पत्र क्र. १ अन्वये अन्वये इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे सुव्यवस्थीतपणे दस्ताऐजीकरण करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमासाठी एक पोर्टल (https://ecoclubs.education.gov.in/) विकसीत केलेले आहे.
२ सदर पोर्टलचे उद्दिष्ट हे एक केंद्रिकृत व्यासपीठ म्हणून देशभरातील शाळांद्वारे राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांच्या माहितीचे अपलोडींग आणि संनियत्रण करावयाचे आहे. या पोर्टलचा टप्प्या टप्प्याने सुलभपणे अवलंब करुन यंत्रणेस सक्षम करण्यासाठी मार्गदर्शिका विकसीत करण्यात आलेली आहे. उपरोक्तबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलच्या वापराबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहचावी या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, इको क्लब प्रभारी शिक्षक, आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणास दि.१६/०४/२०२५ रोजी उपस्थित राहण्याबाबत या कार्यालयाच्या संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने मा. केंद्रीय सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांचे अध्यक्षतेखाली दि. १६/०४/२०२५ रोजी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
३ मिशन लाईफ उपक्रमातंर्गत पर्यावरण जन-जागृतीस आणि शाश्वत कार्यपध्दती प्रभावीपणे टिकवून राहण्यासाठी केंद्र शासनामार्फत नेहमीच सक्रीयपणे सहभाग घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत “क्यूआर कोड्स फॉर फ्लोरा” (QR Codes for Flora) या सदराखाली एक शैक्षणिक उपक्रम इको क्लब्स फॉर मिशन लाइफव्दारे समग्र शिक्षाअंतर्गत ‘पृथ्वी दिनाचे औचित्य साधून दि. २२/०४/२०२५ पासून सुरू करण्यात येत आहे.
४ “क्यूआर कोड्स फॉर फ्लोरा” (QR Codes for Flora) उपक्रमातंर्गत शाळेच्या परिसरामधील वनस्पतीची ओळख करून प्रत्येक वनस्पतींच्या प्रजातींबद्दल सर्वसमावेशक माहिती असलेले क्यूआर कोड्स तयार करून त्यांच्या तपशीलांचे दस्तऐवजीकरण करावयाचे आहे. उपक्रमांच्या अंमलबजावणीकरिता विहीत कार्यपध्दतीची माहिती सुलभ संदर्भासाठी मराठी व इंग्रजी प्रत सोबत जोडलेली आहे.
५ सदर उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेतः
डिजिटल प्रवीणता जोपासणेः क्यूआर कोड निर्मिती आणि माहिती प्रसारण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित करणे.
मिशन लाईफ उद्दिष्टांना प्रोत्साहन देणेः शाश्वत जीवनशैलीसाठी योगदान देणारे पर्यावरणपूरक वर्तन आणि दृष्टिकोन निर्माण करणे.
६ सदर उपक्रम हा दि.२२/०४/२०२५ रोजी (पृथ्वी दिन) सर्व शाळांमध्ये इको क्लब्स फॉर मिशन लाईफच्या अंतर्गत देशव्यापी प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने शाळांनी उपक्रमांची विस्तृत माहिती इको क्लब्स फॉर मिशन लाईफ पोर्टलवर
अपलोड करावी.
७ उपरोक्तबाबत आपणांस कळविण्यात येते की, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात यावे. यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन व सहाय्य शाळांना करण्यात यावे.
परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
(संजय यादव, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.