सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय Examination Fee Waiver For Students

Examination Fee Waiver For Students

Examination Fee Waiver For Students

Examination fee waiver for all students

Examination fee exemption for all students

ssc HSC exam fees refund

Dshavi Baravi Pariksha shulk Partava Pratipurti

Regarding granting exemption from examination fees to all students in talukas affected by heavy rains and floods in the state in the year 2025.

Regarding exam fee waiver/reimbursement of fees for students of 10th and 12th standard in 31 partially affected and 251 fully affected talukas due to heavy rains and floods

अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे ३१ अंशतः बाधित व २५१ पूर्णतः बाधित तालुक्यातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतिपूर्ती करण्याबाबत
Examination Fee Waiver For Students
सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय
अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे ३१ अंशतः बाधित व २५१ पूर्णतः बाधित तालुक्यातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतिपूर्ती करण्याबाबत
Examination Fee Waiver For Students
सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

क्र. रा. मं. लेखा /अवर्षणग्रस्त फी माफी-प्रतिपूर्ती २५-२६/1679

राज्य मंडळ, पुणे ४११००४

दि. 17/04/२०२६

प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे.

विषयः- अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे ३१ अंशतः बाधित व २५१ पूर्णतः बाधित तालुक्यातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतिपूर्ती करण्याबाबत…

संदर्भ :-

१) शासन निर्णय क्र. सीएलएस. २०२५/प्र.क्र. ३६५/म. ३ (मदत-१), दि. १० ऑक्टोबर, २०२५

२) शासन निर्णय क्र. सीएलएस. २०२५/प्र.क्र.३६५/म.३, दि. ०९ ऑक्टोबर, २०२५

३) शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२९/प्र.क्र. ४७/एसडी-५, दि. ०१ ऑगस्ट, २०१९

४) शा. शुद्धीपत्रक क्र. संकिर्ण २०२९/प्र.क्र.४७/एसडी-५, दि. ०३/०२/२०२०

५)शा. नि.क्र. एफईडी १५९२/१००२/(११३२)/साशि-५, दि. १८/१०/१९९३

उपरोक्त विषयास अनुसरून आपणांस कळविण्यात येते की,

१. संदर्भिय क्र. ३ व ४ च्या शासन निर्णयानुसार, अवर्षणग्रस्त भागातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या आकारण्यात आलेल्या, संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्यमंडळ स्तरावरून, नियमित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आधार संलग्न Bank Account मध्ये NEFT/RTGS द्वारे करण्यात येणार आहे.

२. सन २०२५-२६ मध्ये २९ जिल्ह्यातील ३१ अंशतः बाधित व २५१ पूर्णतः बाधित असे एकूण २८२ तालुक्यातील, इ.१० वी व इ. १२ वी च्या या योजनेस पात्र असलेल्या, नियमित विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेल्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करावयाची आहे.

३. राज्यमंडळाने ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२६’ मधील प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी साठी मंडळाच्या संकेतस्थळावर शाळा महाविद्यालयांनी आपल्या लॉगइन पासवर्ड चा उपयोग करून लॉगइन करावे. अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी Option तेथे उपलब्ध होईल. सदर माहिती भरण्याकरीता सोमवार दि. २०/०४/२०२६ ते शनिवार दि. २/०५/२०२६ हा कालावधी देण्यात येत आहे.

४. राज्यमंडळाने उपलब्ध केलेल्या माहितीमध्ये नियमित विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, बैंक खाते क्रमांक, बँक आय एफ एस सी कोड, आधार क्रमांक अशी माहिती उपलब्ध करून दिली आहे.

५. राज्यमंडळाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या पुढेच पात्र (Qualified) रकाना उपलब्ध केला असून, त्यामध्ये (Qualified) असा शेरा संबंधित माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी नोंद करावयाचा आहे.

६. पात्र विद्यार्थी निश्चित करताना संदर्भिय क्र. ३ व ५ च्या शासन निर्णयामध्ये नमूद पात्रता निकष आणि सन २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अंशतः बाधित/पूर्णतः बाधित तालुक्यांची यादी विचारात घ्यावी. सदर शासन निर्णय उपरोक्त लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

७. अंशतः बाधित तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळांनाच ही योजना लागू आहे. त्यामुळे अंशतः बाधित तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळामधील विद्यार्थ्यांचीच माहिती भरावी.

८. पात्र नियमित लाभार्थ्यांना उपरोक्त संदर्भिय क्र. ३ व ४ च्या शासन निर्णयानुसार, राज्यमंडळ स्तरावरून शासनाकडून प्राप्त होणारा निधी हा NEFT/RTGS द्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आवेदनपत्रामध्ये नमूद केलेल्या आधार संलग्न खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल.

९. सर्व विभागीय मंडळानी आपल्या स्तरावरून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती भरण्यासाठी त्वरित कळवावे.

(डॉ. दिपक माळी) सचिव, राज्यमंडळ पुणे-०४

प्रत माहितीस्तव तथा तातडीच्या पुढील कार्यवाहीसाठी :-

१. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ३२.

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे ४११ ००१.

३. श्रीम. पल्लवी बच्छाव, कक्ष अधिकारी (SD-5), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.

४. मा.शिक्षण संचालक (योजना), मध्यवर्ती इमारत, पुणे ४११ ००१.

प्रत माहितीस्तव तथा आवश्यक त्या कार्यवाहीस्तव :-

१. विभागीय शिक्षण उपसंचालक – पुणे/नागपूर/छ. संभाजीनगर/अमरावती/नाशिक/लातूर/कोल्हापूर/बृहन्मुंबई

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व जिल्हे

यांना कळविण्यात येते की, मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ भरणेबाबत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय मंडळांना सादर करावा

सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्ती मुळे सवलती साठी बाधित तालुत्यातील इ.१० वी व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी बाबत..

                                               का र्य प ध्द ती

१. दि.१० ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या राज्यामध्ये अतिवृष्टी होवून पुर आपत्ती परिस्थिती उद्भवलेल्या अंशत: बाधित व पूर्णत: बाधित अशा एकूण २८२ तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२६ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इ.१०वीसाठी 

ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर

प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. सदर लिंकवर पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व सांकेतिक क्रमांक (Index Number), विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्याचे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक (आधार सलग्न बॅंक खाते असावे) अशी माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

३. मुख्याध्यापक / प्राचार्य, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी दुस-या रकान्यामध्ये नमूद केलेले पाच पात्रता निकष तपासून त्यापुढे बरोबर (√) असे दर्शविल्यानंतरच तो विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होणार आहे. अन्यथा सदर विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरणार आहे.

४. पात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाखाली “Qualify” दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची Bank Account ची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे.ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्याशी नाते इ.) भरणे आवश्यक आहे.रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.

५. सदर योजना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील.

६. अंशतः बाधित लाभार्थ्यांची यादी निकषांप्रमाणे प्रमाणित केल्याच्या कार्यवाहीनंतर ‘मुख्याध्यापक / प्राचार्य’ यांनी स्वाक्षरी upload करावयाची आहे. स्वाक्षरी upload केल्यानंतर submit हे बटन उपलब्ध होईल. त्यानुसार Bank Account चा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित दि.—— एप्रिल, २०२६ अखेर ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळ, पुणे कार्यालयास सादर (submit) करावयाची आहे. माहीती एकदा submit केल्यानंतर पुन:श्च submit करता येणार नाही. सदर माहिती ऑनलाइन पध्दतीने राज्यमंडळ, पुणे कार्यालयास प्राप्त होणार आहे.

७. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व अभिलेख (प्रमाणपत्र व Annexure ‘A’ ‘B’) हे संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करण्यात यावेत.

८. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ ,पुणे स्तरावरून NEFT/RTGS द्वारे विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या आधार सलग्न Bank Account मध्ये वर्ग करण्यात येणार असल्याने, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास अथवा चुकीची माहिती अथवा चुकीचा Bank Account दिल्यास सदर लाभपासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कलावधीमध्ये भरण्याची दक्षता घेण्यात यावी, ही जबाबदारी पूर्णतः संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील.

९. बँक खाते आधार क्रमांकास संलग्न नसल्यास फी प्रतिपूर्तीची रक्कम बँक खात्यावर वर्ग होणार नाही त्यामुळे बॅंक खाते क्रमांकाला आधार संलग्न केलेले असल्याची खात्री आपल्या स्तरावरून काटेकोरपणे करण्यात यावी

१०. सदर योजच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांनी वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये राज्यमंडळ, पुणे या कार्यालयाकडे माहिती सादर करणेबाबत पाठपुरावा करावा.

११. उपरोक्त सर्व माहिती परिपूर्ण / अचूक भरल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने वर्ग केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी

अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे ३१ अंशतः बाधित व २५१ पूर्णतः बाधित तालुक्यातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतिपूर्ती करण्याबाबत
Examination Fee Waiver For Students
सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय
अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे ३१ अंशतः बाधित व २५१ पूर्णतः बाधित तालुक्यातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतिपूर्ती करण्याबाबत
Examination Fee Waiver For Students
सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय

ALSO READ 👇

सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत.

दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२६

संदर्भ :-

(१) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. एचईडी-१५९२/१२०२/ (११३२)/ताशि-५ दि. १८.१०.१९९३

(२) शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२५/प्र.क्र.३६५/म-३ (मदत-१) दि. १०.१०.२०२५

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांची परीक्षा फी माफीची योजना कार्यान्वित आहे. संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये महसूल व वन विभागाने सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुके घोषित करुन या तालुक्यातील आपदग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती अनुज्ञेय केल्या आहेत. त्यानुसार या सवलती उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व विद्यार्थ्यांना अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

😄🕵️‍♂️शेती पीक नुकसानी करिता शासनाकडून दिली जाणारी मदत बँक खात्यात जमा झाली की कसे तपासा एका क्षणात त्यासाठी या ओळीला फक्त स्पर्श करा

संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये महसूल व वन विभागाने घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत अनुज्ञेय असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांची परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर सवलत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाकरिता लागू राहील.

३. प्रस्तुत प्रयोजनार्थ आवश्यकतेनुसार वित्तीय तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०२१११७५६५६३६०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२५/ई.प्र.क्र.१३९२२२९/मशि-२
, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

Examination Fee Waiver For Students
सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय Examination Fee Waiver For Students GR

2 thoughts on “सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय Examination Fee Waiver For Students”

Leave a Comment

error: Content is protected !!