Employees Regulation of Transfers 2025

Employees Regulation of Transfers 2025

image 105
Employees Regulation of Transfers 2025

Employees Regulation of Transfers 2025

Notification of Maharashtra Government Employees Regulation of Transfers and Government Commencement: Prevention of Delay in Performance of Duties (Amendment) Act, 2025

Maharashtra Government Employees Regulation of Transfers and Government Commencement: Prevention of Delay in Performance of Duties (Amendment) Act, 2025

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय प्रारंभः कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २०२५

RNI No. MAHBIL/2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ११, अंक ७ (७)] शुक्रवार, मार्च २१, २०२५/ फाल्गुन ३०, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २१ मार्च, २०२५ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-

L. A. BILL No. XVI OF 2025.

A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA REGULATION OF TRANSFER OF GOVERNMENT SERVANTS AND PREVENTION OF DELAY IN DISCHARGE OF OFFICIAL DUTIES AСТ, 2006.

सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ यात सुधारणा करण्यासाठी विधेयक. सन २००६ चा महाराष्ट्र

(१) ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ यात आणखी सुधारणा २१. करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-

भाग पाच-२४-१

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २१, २०२५/ फाल्गुन ३०, शके १९४६

संक्षिप्त नाव व

१. (१) या अधिनियमास महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय प्रारंभः कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २०२५ असे म्हणावे.

(२) तो ताबडतोब अंमलात येईल.

सन २००६ चा महा. अधिनियम क्रमांक २१ यांच्या कलम ३ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ याच्या कलम ३ मधील पोट-कलम (१) च्या दुसऱ्या ५ “अशा कर्मचाऱ्याला तीन वर्षपिक्षा अधिक कालावधीसाठी त्याच पदावर ठेवण्यात येणार नाही. आणि लागोपाठच्या दोन पदावधीपेक्षा अधिक पदावधीसाठी त्याला त्याच विभागात ठेवण्यात येणार नाही” या मजकुराऐवजी “अशा कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदावरून कार्यक्षमता, तत्परता व सचोटी या आधाराशिवाय, (त्या पदावरून किंवा त्या विभागातून) बदली करण्यात येणार नाही” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

    महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २१, २०२५/फाल्गुन ३०, शके १९४६ 
            उद्देश व कारणे यांचे निवेदन. 
                                                                    उद्देश व कारणे यांचे निवेदन 

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत प्रकरण दोन मध्ये कलम ३ (१) मधील दुसऱ्या परंतुकात सेक्रेटरिएट सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत नेमणुकीच्या पदावधीचा कालावधी नमूद केलेला आहे. परंतु सेक्रेटरिएट सेवेतील कर्मचारी हे साधारणतः स्मरण कृती (मेमरी फॅक्शन) नुसार काम करतात. परिणामतः कर्मचाऱ्याच्या कार्यात तत्परता व गती दिसून येत होती. परंतु एका विभागातून दुसऱ्या विभागात कर्मचाऱ्याच्या केवळ त्या विभागातील पदावधीच्या कालावधीनुसार झालेल्या बदलीमुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर व काम करावयाच्या गतीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करताना पदावधीच्या कालावधीची मर्यादा गैरवाजवी असून उक्त अधिनियमाचा हेतू व उद्देश यास बाधक असल्यामुळे उक्त मयदिऐवजी कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावर बदली करण्याचे विहित केल्यास ते नियमास अनुरुप होईल असे वाटते.


वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.

सुधीर मुनगंटीवार,
प्रभारी सदस्य.


विधान भवन : मुंबई,
दिनांक दिनांक २१ मार्च, २०२५.

विधान भवन : जितेंद्र भोळे,
मुंबई, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

image 107
Employees Regulation of Transfers 2025


Leave a Comment

error: Content is protected !!