‘निपुण सेतू’ – गुणवंत युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचा सेतू! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी “निपुण सेतु” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत Nipun Setu Upkram

Nipun Setu Upkram

Nipun Setu Upkram

Nipun Setu Upkram Portal Link

‘Nipun Setu’ – A bridge to new employment opportunities for talented youth!

maharashtra lokseva aayogachya antim nivdit shifaras n zalelya umedvaransathi “nipun setu” ya upkramachi ammalbajavani karnyababat

Regarding the implementation of the “Nipun Setu” initiative for candidates not recommended in the final selection of Maharashtra Public Service Commission

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी “निपुण सेतु” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१३०/उद्योग-३ मंत्रालय, मुंबई

तारीख: ०५ जून, २०२६.

वाचा –

दि.१३.०४.२०२६ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.

प्रस्तावना –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. सदर परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरत असले तरी उपलब्ध पदसंख्या मर्यादित असल्यामुळे अंतिम निवडीसाठी केवळ काही उमेदवारांचीच शिफारस केली जाते. परिणामी, अनेक गुणवंत व सक्षम उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, स्पर्धात्मक परीक्षांमधून विकसित झालेली विश्लेषणक्षमता, नेतृत्वगुण तसेच सार्वजनिक सेवा करण्याची मानसिकता असूनदेखील त्यांना अपेक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी “प्रतिभा सेतू” पोर्टल विकसित केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत (मुलाखत/कौशल्य चाचणी) पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या राज्यातील गुणवंत उमेदवारांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी करून घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने उमेदवारांचे तपशील सार्वजनिक तसेच विशेषतः महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांना आणि उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी, उद्योग विभागामार्फत विकसित केलेल्या एक खिडकी ‘मैत्री २.०’ (MAITRI २.०) पोर्टल अंतर्गत “निपुण सेतू” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या अनुषंगाने मंत्रिमंडळाने दि.१३.०४.२०२६ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत (मुलाखत/कौशल्य चाचणी) पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या राज्यातील गुणवंत उमेदवारांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी करून घेण्यासाठी, मा. मंत्रिमंडळाच्या दि.१३.०४.२०२६ रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, उद्योग विभागामार्फत विकसित केलेल्या एक खिडकी ‘मैत्री २.०’ (MAITRI २.०) पोर्टल अंतर्गत “निपुण सेतू” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करुन “निपुण सेतु” पोर्टल विकसित करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. या उपक्रमाची सविस्तर रूपरेषा, अटी व शर्ती, आणि कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे:

अ) उपक्रमाची व्याप्ती व उमेदवारांची पात्रता निकषः

१. पात्रताः हा उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत (मुलाखत फेरी / कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी, जी लागू असेल ती) पोहोचलेल्या, परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांसाठी लागू राहील.

२. कालावधी व अंमलबजावणीः हा उपक्रम सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पुढे आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अनिवार्यपणे लागू राहील.

३. भूतलक्षी तरतूद (Retrospective Provision): मागील एका वर्षात झालेल्या परीक्षांच्या अंतिम

टप्प्यातील उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संमती पत्र प्राप्त झाल्यास आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास, अशा उमेदवारांची माहिती देखील या पोर्टलवर समाविष्ट करण्यात येईल.

ब) पोर्टलवर उपलब्ध करावयाची उमेदवारांची माहिती (Data Fields):

महाराष्ट्रातील खाजगी उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना योग्य मनुष्यबळ निवडता यावे यासाठी उमेदवारांचे खालील तपशील पोर्टलवर उपलब्ध राहतील.

१. उमेदवाराचे पूर्ण नाव आणि जन्मवर्ष.

२. शैक्षणिक पात्रता (पदवी, पदव्युत्तर पदवी, विशेष प्राविण्य).

३. पूर्व कामाचा अनुभव (असल्यास)

४. संबंधित परीक्षेचे नाव आणि अंतिम टप्प्यात (मुलाखत/कौशल्य चाचणी) मिळालेले गुण.

५. उमेदवाराचा संपर्क तपशील (ईमेल आणि मोबाईल क्रमांक केवळ अधिकृत नियोक्त्यांनाच दृश्यमान).

क) डेटा गोळा करण्याची व प्रदर्शित करण्याची कार्यपद्धतीः

१. स्वयंचलित डेटा स्थलांतर (API Integration): महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) प्रत्येक परीक्षेचा

अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, तथापि अंतिम निवडयादीत समाविष्ठ न झालेल्या उमेदवारांचा वरील डेटा ‘निपुण’ पोर्टलवर दरवर्षी आपोआप API (Application Programming Interface) द्वारे सुरक्षितपणे स्थलांतरित करेल.

२. डेटा दृश्यमानतेचा कालावधी (Data Visibility): उमेदवाराचा डेटा आयोगाच्या अन्य परिक्षेत त्याची

निवड होईपर्यंत निपुण पोर्टलवर संभाव्य नियोक्त्यांसाठी दृश्यमान राहील. त्यानंतर हा डेटा निपुण पोर्टलद्वारे आपोआप वगळला जाईल.

ड) उमेदवारांची संमती आणि माहितीची गोपनीयता (Data Privacy & Consent):

१. अनिवार्य संमती (Consent):

अ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परिक्षेचे फॉर्म भरताना त्यांचा डेटा परिक्षा अंतिम निकालानंतर निपुण सेतु पोर्टलवर प्रकटन करण्याबाबत संमती (Digital Opt-in Consent) घेण्यात येईल.

आ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेले उमेदवारांचे तपशील नियोक्त्यांना त्यांनी दर्शविलेल्या आवश्यक अर्हतेनुसार निपुण सेतु मार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील.

इ) नियोक्त्याकडून उमेदवारांना नियुक्ती देताना उमेदवारांकडून नियुक्ती स्वीकृतीबाबतचे डिजिटल संमती पत्र (Digital Consent) घेण्यात येईल.

२. गोपनीयता सुरक्षाः उमेदवारांच्या माहितीची गोपनीयता (Privacy) पूर्णपणे सुरक्षित राहील याची दक्षता ‘मैत्री’ पोर्टलच्या आयटी विंगकडून घेतली जाईल. हा डेटा केवळ ‘मैत्री’ पोर्टलवर नोंदणीकृत आणि पडताळणी झालेल्या (Verified) अधिकृत खाजगी उद्योजकांना आणि संस्थांनाच तसेच शासकीय/निमशासकीय संस्था/मंडळे/महामंडळे यांना रोजगाराच्या हेतूसाठी पाहता येईल. डेटाची कोणत्याही प्रकारची गळती किंवा व्यावसायिक गैरवापर होणार नाही याची तांत्रिक खबरदारी (Encryption & Access Control) मैत्री पोर्टलद्वारे घेतली जाईल.

ई) राज्यस्तरीय संनियनंत्रण समिती (Monitoring Committee):

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, तांत्रिक समन्वयासाठी आणि वेळोवेळी उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात येत आहे:

१ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग – अध्यक्ष

२ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (उद्योग) / प्रतिनिधी – सदस्य

३ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग/प्रतिनिधी – सदस्य

४ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग/प्रतिनिधी – सदस्य

५ सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग – सदस्य

६ मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – सदस्य

७ विकास आयुक्त (उद्योग) तथा अध्यक्ष, मैत्री कक्ष -सदस्य सचिव

समितीचे कामकाजः सदर समिती ‘निपुण सेतू’ उपक्रमाचा त्रैमासिक आढावा घेईल. खाजगी क्षेत्रातील उद्योजकांशी तसेच शासकीय/निमशासकीय संस्था, मंडळे, महामंडळांशी समन्वय साधेल आणि या सर्वांना निपुण पोर्टल चा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

फ) अन्य अटी व शर्तीः

१. या उपक्रमांतर्गत ‘मैत्री’ पोर्टल केवळ एक समन्वयकाची (Facilitator) भूमिका बजावेल. उमेदवारांना खाजगी/शासकीय/निमशासकीय क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याची कायदेशीर हमी शासन किंवा आयोग घेणार नाही.

२. नोकरीचे स्वरूप, वेतन श्रेणी, आणि सेवाशर्ती या पूर्णपणे खाजगी उद्योजक नियोक्ता आणि उमेदवार यांच्यातील परस्पर करारावर आधारित असतील. तथापि, वेतन व भत्त्यांसंदर्भातील प्रचलित कायदे व नियम नियोक्त्यांवर बंधनकारक राहतील.

३. सदर पोर्टल हे खाजगी उद्योजकांच्या सुविधेसाठी असल्याने, पोर्टलवर उपलब्ध असलेल्या उमेदवारांची निवड होणे अथवा न होणे हे उद्योजकांसाठी, मैत्री कक्षासाठी अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी बंधनकारक असणार नाही.

३. मैत्री २.० पोर्टल वर निपुण सेतु पोर्टल तयार करुन उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पुढील दोन महिन्याच्या कालावधीत पुर्ण करण्यात येईल.

४. सदर निपुण पोर्टलच्या निर्मिती व परिचलनाची संपूर्ण कार्यवाही मैत्री कक्षाकडून करण्यास व त्यावरील होणा-या खर्चास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च मैत्री कक्षाच्या २८५२ ए०२२ या लेखाशिर्षाखाली चालु सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीतून भागविण्यात येईल. सदर पोर्टलची सविस्तर कार्यपध्दती स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

५. मैत्री पोर्टलवर नोंदित असलेल्या खाजगी उद्योजकांना निपुण पोर्टलचा प्राधान्याने व जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्रे आणि सर्व प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी प्रोत्साहित करण्याची कार्यवाही करावी व त्याबाबतचा मासिक अहवाल दरमहा मैत्री कक्षाकडे सादर करावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०६०५११४५४४७६१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

   शासन निर्णय पीडीएफ लिंक

प्रधान सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

‘निपुण सेतू’ – गुणवंत युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचा सेतू!     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी "निपुण सेतु" या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत Nipun Setu Upkram
‘निपुण सेतू’ – गुणवंत युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचा सेतू! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी “निपुण सेतु” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत Nipun Setu Upkram

Leave a Comment

error: Content is protected !!