Karyalay Bhojan Vel Nishchit कार्यालयांतील भोजनाची वेळ निश्चित

Karyalay Bhojan Vel Nishchit

IMG 20250327 121830
Karyalay Bhojan Vel Nishchit

Karyalay Bhojan Vel Nishchit

4 जून 2019 च्या GR नुसार जेवणाच्या वेळेची नियमावली

शासन परिपत्रक क्रमांक: संमिश्र 9009/प्र.क्र.26/19/र.व का.) हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळेचे नियोजन आणि कार्यालयीन कामकाजात व्यत्यय टाळण्यासाठी जारी करण्यात आला आहे. या GR मधील मुख्य नियम खालीलप्रमाणे आहेत

जेवणाची वेळ
सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना दुपारी 1:00 ते 2:00 या दरम्यान अर्धा तास जेवणासाठी वेळ देण्यात आली आहे.

याचा अर्थ कर्मचाऱ्यांना जेवणासाठी फक्त 30 मिनिटांचा ब्रेक घेता येईल, जेणेकरून कार्यालयीन कामकाजात जास्त वेळ वाया जाणार नाही.
एकाच वेळी जेवणासाठी बसू नये
GR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी जेवणासाठी जाऊ नये.

यामागचा उद्देश असा आहे की कार्यालयात किमान कर्मचारी उपस्थित राहतील, जेणेकरून कार्यालयीन कामकाजात खंड पडणार नाही. उदाहरणार्थ, जर सर्व कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी गेले, तर कार्यालयात कोणीच नसेल आणि काम थांबेल.


लागू असलेले कार्यालय:
हा नियम सर्व राज्य शासकीय कार्यालयांना लागू आहे, ज्यामध्ये मंत्रालय, विभागीय कार्यालये, आणि स्थानिक शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.


वेबसाइटवर उपलब्धता

Rajya Shasakiy Karyalay Bhojan Vel Nishchit

fixing lunch hours in state government offices

Office lunch time

Lunch Time In Offices
राज्य शासकीय कार्यालयांतील भोजनाची वेळ निश्चित करणेबाबत

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: समय १०१९ / प्र. क्र. २८/१८ (र. व का.)
मंत्रालय, मुंबई

दिनांक :- ४ जून, २०१९

वाचा
: १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक समय-१०८८ / १९ / अठरा (र. व का.), दिनांक ३१ ऑगस्ट, १९८८,
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक समय-१०.००/प्र.क्र.३३/०१/१८ (र. व का.), दिनांक १८ सप्टेंबर, २००१.

     शासन परिपत्रक

दिनांक ३१ ऑगस्ट, १९८८ च्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई तसेच बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असून कार्यालयीन वेळेत भोजनाची सुट्टी अर्ध्या तासाची असेल, ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १८ सप्टेंबर, २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारीवर्गाकरीता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १.०० ते २.०० या दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ असावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि मंत्रालयाव्यतिरिक्त इतर राज्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी कार्यालयीन वेळेत भोजनाची वेळ निश्चित नसल्याने जनतेशी थेट संबंध येत असलेल्या कार्यालयांमध्ये जेव्हा लोक तक्रारी / गा-हाणी / अर्ज घेऊन येतात, त्यावेळी बरेचदा संबंधित अधिकारी / कर्मचारी त्यांचे जागेवर उपलब्ध होत नाहीत. त्याबाबत विचारणा केली असता ही जेवणाची वेळ आहे, असे अभ्यागतांना सांगण्यात येते. विविध कार्यालयांमध्ये भोजनाची वेळ ही संबंधित कार्यालयाच्या सोयीनुसार ठरविली जाते. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, अशा तक्रारी शासनास प्राप्त झालेल्या आहेत. सबब सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत भोजनाची वेळ निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. तरी या परिपत्रकान्वये सूचना देण्यात येत आहेत की, राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारीवर्गाकरीता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १.०० ते २.०० या दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ असावी. भोजनासाठी अधिकारी / कर्मचारी अधिक वेळ घेणार नाहीत, तसेच एकाच शाखेतील सर्व अधिकारी / कर्मचारी एकाच वेळी भोजनासाठी जाणार नाहीत, याबाबत कार्यालय प्रमुखांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक २०१९०६०७१६१६०३१६०७ असा आहे. तसेच डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावांने.

सह सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250327 121849
Karyalay Bhojan Vel Nishchit

Leave a Comment

error: Content is protected !!