Eco Clubs For Mission LiFE
Eco Clubs For Mission LiFE
Eco Clubs For Mission LiFE portal link
विषय :- निसर्गास अनुकूल पर्यावरण विषयक संवर्धन होण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये
संवेदनशिलता विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमांतर्गत पर्यावरण विषयक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी व त्याचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी पोर्टलच्या उपयोगाबाबत दि. १६/०४/२०२५ रोजी आयोजित ऑनलाईन पद्धतीने (You Tube Live) प्रशिक्षण सत्राकरीता उपस्थित राहण्याबाबत.
संदर्भ :-
१) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रपम/वि.वि. ECO club/२०२४/०२४६९ दि. २७/०५/२०२४.
२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ ECO club/२०२४-२५/१८९४
दि. २८/०६/२०२४.
३) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रपम/NEP/ शिक्षा सप्ताहा/२०२४/०३४५५ दि. १६/०७/२०२४.
४) केंद्र शासनाचे पत्र क्र. १०-१/२०२४-EE.१२ (EcoClub) दि. ०९/०४/२०२५.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार शालेय शिक्षणाच्या माध्यमातून एकात्मिक पर्यावरण जागरुकता सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये टिकवून ठेवून इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत नवोपक्रमशील असे विशिष्ठ कौशल्य आणि क्षमता विकसित करुन उत्कृष्ट, असे उत्पादनशील नागरीक निर्माण करणे अपेक्षीत आहे. त्याअनुषंगाने संदर्भीय पत्र क्र. १ व ३ अन्वये आपण आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदारपूर्ण वर्तनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना वयानुरुप आणि अर्थपूर्ण पर्यावरणीय उपक्रम आणि प्रकल्प हाती घेण्यास सक्षम करण्यासाठी शाळांमध्ये मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. मिशन लाईफसाठी इको क्लबच्या उपक्रमांना समग्र शिक्षा आणि पीएमश्री योजनेंतर्गत साह्य करण्यात येते. संदर्भीय पत्र क्र.२ अन्वये उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहे.
Eco Clubs For Mission LiFE बद्दल अधिक जाणून घ्या ओळीला स्पर्श करून
केंद्र शासनाने संदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे सुव्यवस्थीतपणे दस्ताऐजीकरण करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमासाठी एक पोर्टल
Eco club of mission life portal link
विकसीत केलेले आहे. सदर पोर्टलचे उद्दिष्ट हे एक केंद्रिकृत व्यासपीठ म्हणून देशभारातील शाळांद्वारे राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांच्या माहितीचे अपलोडींग आणि संनियत्रण करावयाचे आहे. या पोर्टलचा टप्प्या टप्प्याने सुलभपणे अंवलंब करुन सक्षम करण्यासाठी मार्गदर्शिका विकसीत करण्यात आलेली आहे. सदर मार्गदर्शिका सोबत जोडण्यात आलेली आहे.
३ केंद्र शासनाने संदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये सदर पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी आणि उपयोग सुनिश्चित करण्यासाठी दिनांक १६/०४/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने (You Tube Live) वर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, इको क्लब प्रभारी शिक्षक, आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांना पोर्टलची वैशिष्टये आणि वापराबाबत ओळख करुन देण्यासाठी विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. ऑनलाईन सत्राची लिंक खालीलप्रमाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=W4ZJdfrs9pY
४ त्या अनुषंगाने आपणांस विनंती करण्यात येत आहे की, आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलची वापराबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहंचावी या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, इको क्लब प्रभारी शिक्षक, आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण सत्रास दि. १६/०४/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहण्याबाबत आपल्यास्तरावरुन आदेशीत करावे.
५ शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गास अनुकुल पर्यावरणीय जाणिव, जागृती व सक्षमीकरण करण्यासाठी आणि मिशन लाईफला सामूहीकरित्या यश मिळवून देण्यासाठी आपल्या सतत सहकार्याची अपेक्षा आहे.
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
( राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई