CM Shri School
CM Shri School

CM Shri School
CM Shri School
CM Shri School
Central schools on the land of PM Shri.CM Shri. Regarding school choice
पी.एम.श्री.च्या धरतीवर केंद्रीय शाळांना सी.एम.श्री. शाळा निवडीबाबत.
जा.क्र.प्राशिसं/केंद्रसंरचना/टे-३०१/२०२५/संकीर्ण
दिनांक : २२/०१/२०२५
विषय : पी.एम.श्री.च्या धरतीवर केंद्रीय शाळांना सी.एम.श्री. शाळा निवडीबाबत.
संदर्भः- मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांचे दि.२१/०१/२०२५ रोजीच्या बैठकीतील निर्देश.
उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, केंद्रीय शाळांची फेरसंरचना सन २०२४ २५ मध्ये करण्यात आली आहे. सदर फेरसंरचनेमध्ये काही जिल्हयातील केंद्रीय शाळा बदलून नवीन शाळा ही केंद्रीय शाळा प्रस्तावित केली आहे. ही बाब लक्षात घेऊन पी.एम.श्री. च्या धर्तीवर केंद्रीय शाळांना सी.एम.श्री. शाळा म्हणून निवड करावयाची आहे. सी.एम.श्री. शाळांची निवड करतांना त्या केंद्रातील इतर शाळा किवा केंद्रशाळा आदर्श शाळा किंवा पी.एम.श्री शाळा या योजनेत अंतर्भुत असल्यास सदर केंद्राकरीता सी.एम.श्री शाळा प्रस्तावित करण्यात येऊ नये.
सी.एम.श्री. शाळांची निवड करतांना सदर शाळेस खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध असाव्यात.
१. केंद्रशाळा निवडतांना सदरची शाळा ही इतर शाळांसाठी दळणवळण सोयीयुक्त असावी.
२. सदर शाळेस आवश्यक त्या भौतिक सुविधा विकसीत करण्यासाठी पुरेशी जागा असावी.
३. सदर शाळेतील विदयार्थी संख्या पुरेशी असावी.
४.सी.एम.श्री. शाळा विकसीत केल्यास व दळणवळ णाच्या वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास कोणकोणत्या गावातील विदयार्थी येऊ शकतील याचा आराखाडा तयार करावा.
तरी केंद्रशाळा ही सी.एम.श्री. शाळा म्हणून निवड करतांना वरील बाबींचा अभ्यास करून सदरचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी दि.२९/०१/२०२५ पर्यंत संबधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करावा.
तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदरचा प्रस्ताव आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी करून आपल्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव संचालनालयास दि.३१/०१/२०२५ पर्यंत सादर करावा. यास विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी व यासाठी पुनश्चः पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे

सर केंद्रात ज्या शाळेला pm shri school दर्जा प्राप्त झाला आहे त्या शाळेच्या, तोडीची शाळा असून सुद्धा फक्त ती शाळा एक ते चार असल्या कारणामुळे वारंवार पीएमसी च्या स्पर्धेतून डावळण्यात आलेली आहे आणि आपण टाकलेली जाचक कट की ज्या केंद्रामध्ये पीएमसी शाळा आहे त्या केंद्रात सीएम श्री शाळा देण्यात येऊ नये ही अट त्यातून रद्द करावी ही शाळेच्या वतीने, पालकांच्या वतीने आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने आपणास आग्रहाची विनंती