Mazi Shala Sundar Shala Sanvadsatra

Mazi Shala Sundar Shala Sanvadsatra

image 1

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत

शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ

ऐकु, समजू महावाचन चळवळ

दि. ०३ मार्च २०२४, रविवार           

वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५

मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत

“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!” या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.  यासाठी  या लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.

सदर लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण बंद करू शकता.

सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.

शालेय शिक्षण विभाग,

महाराष्ट्र शासन, मुंबई

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) (सर्व)गटशिक्षणाधिकारी (सर्व)प्रशासनाआधिकारी, न.प, न.पा,म.न.पा (सर्व)        

विषय :- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत संवादसत्राबाबत..

       आपणास विदितच आहे की, राज्यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाची सुरवात करण्यात आलेली आहे. सदरच्या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच अनुषंगाने शासनामार्फत *दिनांक १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता* राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून सदरच्या उपक्रमाच्या अनुषंगाने *श्री.गौर गोपाल दास, प्रेरक वक्ते यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राचे* आयोजन करण्यात आले आहे. *मा. मुख्यमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे संकल्पक श्री अमित हुक्केरीकर हे  सदरची प्रेरणादायी मुलाखत  घेणार आहेत* ऑनलाईन स्वरूपातील या संवाद सत्राचे थेट प्रसारण  खालील लिंक च्या मदतीने पाहू शकता 

Link :-

                तरी उपरोक्त लिंकवर क्लिक करून *दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी  ३:०० वाजता* आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत अवगत करण्यात यावे.

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) (सर्व)गटशिक्षणाधिकारी (सर्व)प्रशासनाआधिकारी, न.प, न.पा,म.न.पा (सर्व)        

विषय :- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत संवादसत्रा बाबत.

       आपणास विदितच आहे की, राज्यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाची सुरवात करण्यात आलेली आहे. सदरच्या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच अनुषंगाने शासनामार्फत *दिनांक १७ जानेवारी, २०२४ रोजी* राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या माध्यमातून सदरच्या उपक्रमाच्या अनुषंगाने *साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक श्री. राजीव तांबे यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे या शाळेमध्ये करण्यात आलेले आहे* सदर कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सदाशिव पेठ पुणे या दोन्ही शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील इतर सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांना सदर कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात / You Tube live स्वरूपात पाहता येईल. 

                तरी उपरोक्त लिंकवर क्लिक करून दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत अवगत करण्यात यावे

संवाद सत्र दुसरे

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्र अभियान कालावधी दि. १ जानेवारी, २०२४ ते दि. १५ फेब्रुवारी, २०२४

संवाद सत्र पहिले : मंगळवार दि. १६/०१/२०२४ चे पहा

संवाद सत्र तिसरे दिनांक २३ जानेवारी, २०२४

संवाद सत्र तिसरे दिनांक २४ जानेवारी, २०२४

13 thoughts on “Mazi Shala Sundar Shala Sanvadsatra”

 1. माझी शाळा सुंदर शाळा हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम असून या उपक्रमाद्वारे सर्व विद्यार्थी शिक्षक आपली शाळा स्वच्छ करण्याचे दृष्टीने प्रयत्न करीत आहेत असे दिसून येते
  आदरणीय मुख्यमंत्री यांनी हा चांगला उपक्रम समाजापुढे शिक्षक आणि विद्यार्थ्यांपुढे ठेवलेला दिसून येतो

  Reply
 2. माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाद्वारे शाळेला एक विशिष्ट वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.
  विद्यार्थी ,शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,गावकरी ,पालक, माता पालक, या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचे गावोगावी दिसून येत आहे.
  हा उपक्रम दरवर्षी राबवावा असे माझे वैयक्तिक मत आहे.

  Reply

Leave a Comment

error: Content is protected !!