आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाव्दारे संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत Aashramshala Shikshak Shikshakettar Karmchari Aakrutibandh

Aashramshala Shikshak Shikshakettar Karmchari Aakrutibandh

Aashramshala Shikshak Shikshakettar Karmchari Aakrutibandh

adivasi vikas vibhagamarfat swayamsevi sansthadvare sanchalit anudanit aashramshaleteel shikshak v shikshakettar karmcharyancha aakrutibandh nishchit karnyababat

Regarding determining the structure of teachers and non-teaching staff in aided ashram schools run by NGOs through the Tribal Development Department

आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाव्दारे संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र. अआशा.२०२२/प्र.क्र.१३१/का.११
(ई-ऑफीस क्र.८५६४७२) मंत्रालय, मुंबई

दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२६

वाचा :-

१. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग अआशा-१०९९/प्र.क्र.१३६/९९/का.११, दि.०१.०२.१९९९

२. आदिवासी विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक अआशा १०९९/प्र.क्र.१३६/९९/ का.११, दि. ०१,०२.२०००

३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. एसएसएन-२६०३/(४१/०३)/माशि-२, दि.२५.०१.२००५.

४. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, शाआशा-२०१२/प्र.क्र.१७०/का.१३, दि.२३.०१.२०१४

५. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि. ११.०२.२०१६

६. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, शाआशा-२०१८/प्र.क्र.८४/का.१३, दि.०६.०३.२०१८

७. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, शाआशा-२०१८/प्र.क्र.४८९/का.१३, दि.१५.१२.२०१८

८. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, शाआशा-२०१९/प्र.क्र.१२५/का.१३, दि.१३.०६.२०१९

९. आदिवासी विकास विभाग, आश्रमशाळा संहिता – २०१९.

१०. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९

११. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, वेतन-१२१९/प्र.क्र.१९/१९/टिएनटी, दि.२२.०२.२०१९

१२. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, अआशा-२०१५/प्र.क्र.१०४/का.११, दि.१०.०६.२०१९

१३. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, अआशा-२०१९/प्र.क्र.१०१/का.११, दि.१८.०७.२०१९

१४. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, अआशा-२०१८/प्र.क्र.१४५/का.११, दि.१८.०९.२०१९

१५. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, पदआ-३८१७/प्र.क्र.१३९/का.१५, दि.१६.११.२०२२

१६. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेपुर-११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि.१३.०२.२०२३.

१७. शासन निर्णय, इ. मा. ब. क. विभाग क्र. विभशा-२०२०/प्र.क्र.६३०/विजाभज-२, दि.२६.१२.२०२३.

१८. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, अआशा-२०२३/प्र.क्र.२२७/का.११, दि.०२.०२.२०२४

१९. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, एसएसएन-२०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२०. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, एसएसएन-२०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२,

दि.१९.०९.२०२४

२१. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, शाआशा-२०२४/प्र.क्र.१७२/का.१३, दि.०९.०९.२०२४

२२. वित्त विभाग, पृष्ठांकन क्र. पदनि-२०२६/प्र.क्र.४६/आपुक (E-१६९९१८३) दि.१६.०६.२०२६ सोबतचे उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.०४.०६.२०२६ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त

प्रस्तावना :

आदिवासी विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाव्दारे संचालित शासनाच्या मंजुरीने वेळोवेळी मंजूर प्राथमिक (इ. १ ली ते ७ वी) ५५६, माध्यमिक (इ. ८ वी ते १० वी) ५१९, कनिष्ठ महाविद्यालये (इ.११ वी व १२ वी) -२००, अतिरिक्त प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या २०० अतिरिक्त तुकड्या मधील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निर्गमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाव्दारे संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन व तसेच आवश्यकतेनुसार नवीन पदनिर्मिती प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्च स्तरीय सचिव समितीने उपरोक्त संदर्भाधीन अ. क्र. २२ येथील इतिवृत्तात नमूद मान्यतेनूसार, आकृतीबंध या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात येत आहे.

२. उपरोक्त संदर्भाधीन अ.क्र. २२ येथील इतिवृत्तात नमूद केल्यानुसार, पदनाम, वेतनश्रेणी, जुनी मंजूर पदे व नव्याने निर्मित पदे यांचा आकृतीबंधानूसार मंजूर पदे याची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अ) नियमित पदे :-

1000480104

1000480105

1000480106

३. उपरोक्त परिच्छेद २ मध्ये आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील आ) मृत संवर्गातील पदे येथे दर्शविलेल्या मृत संवर्गात जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य समजण्यात यावीत. अधिसंख्य ठरविलेल्या पदावरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यू इ. कारणामुळे ते रिक्त झाल्यानंतर सदर अधिसंख्य पदे रद्द होतील व सदर पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेतल्या जातील. तसेच ब) बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळ सेवा येथे दर्शविलेल्या मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेताना वित्त विभागाच्या दि.२७.०४.२०२२ रोजीच्या शासन निर्णयांतील तसेच शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची तसेच प्रशासकीय विभागाची मान्यता घेण्याची दक्षता घ्यावी.

४. सदर शासन निर्णय हा मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि. ०४.०६.२०२६ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तास अनुसरुन व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौस आपुक-१९९/२०२६, दि.२८.०७.२०२६ अन्वये दिलेल्या सहमतीने व मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०८०७१८४९३५०७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शासन निर्णय पीडीएफ लिंक

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाव्दारे संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत Aashramshala Shikshak Shikshakettar Karmchari Aakrutibandh
आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाव्दारे संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत Aashramshala Shikshak Shikshakettar Karmchari Aakrutibandh

Leave a Comment

error: Content is protected !!