राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत Vishesh Shikshak Sanman Samarambh

Vishesh Shikshak Sanman Samarambh

Vishesh Shikshak Sanman Samarambh

Special Teacher Certificate Honour Program

rajyatil sarv vishesh shikshakanna pramanpatra deun sanmanit karnyasathi samarambhapurvak karyakram aayojit karanyababat

Regarding organizing a ceremonial program to honor all special teachers in the state with certificates.

मंत्रालयीन सेवा

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
मंत्रालय, मुंबई

क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र. ३२९/टीएनटी-१,

दिनांक : १७ सप्टेंबर, २०२६.

प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

 विषय : राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत.

महोदय,

मा. मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक १५.०९.२०२६ रोजीचे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

२. दि. ०३.०९.२०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांनी “राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करावे” अशी महत्वाची घोषणा केली आहे.

३. तरी, उपरोक्त पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याची कार्यवाही यथाशीघ्र करण्यात यावी. तसेच याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती.

आपला,

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

Vishesh Shikshak Sanman Samarambh
Vishesh Shikshak Sanman Samarambh

परिपत्रक पीडीएफ लिंक

Leave a Comment

error: Content is protected !!