वैश्य वाणी जातीबाबत स्पष्टीकरण शासन परिपत्रक Vaishya Vani Jati

Vaishya Vani Jati

Vaishya Vani Jati

Vaishya Vani Jati

Vaishya Vani jati babat spashtikaran Shasan Paripatrak

Explanation regarding “Vaishya Vani” caste Government Circular

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

“वैश्य वाणी” जाती बाबत स्पष्टीकरण

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक: सीबीसी-२०२६/प्र.क्र.४९/मावक, मुंबई

दिनांक : ०९ सप्टेंबर, २०२६.

वाचा :-

१) शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क्रमांक: सीबीसी -१४७०/प्र.क्र.६३११७/ डेस्क-५, दिनांक १२ ऑक्टोबर, १९७६.

२) शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क्रमांक :- सीबीसी -१४९६/प्र.क्र.३८/मावक-५, दिनांक २१ ऑगस्ट, १९९६.

३) राज्य मागासवर्ग आयोगाचे पत्र क्रमांक रामाआ/पुणे/वैश्यवाणी/२००७-०८/७७, दिनांक ४ मार्च, २००८ व त्यासोबतचा अहवाल क्र.२३

४) शासन परिपत्रक सामाजिक न्याय, व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी-१०/२००७/प्र.क्र.१७७/मावक-५, दिनांक २०.६.२००८.

५) शासन निर्णय, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी १०/२०१०/प्र.क्र.१०४ /मावक-५, दिनांक १९ जुलै, २०११.

६) राज्य मागासवर्ग आयोगाचा मागासवर्ग आयोगाचा प्र.क्र. २७/२०१४, अहवाल क्र. ४४ व ४५.

७) शासन निर्णय, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी-१०/२०१४/प्र.क्र.९/मावक, दिनांक १ मार्च, २०१४.

शासन परिपत्रक :-

शासन निर्णय दि. ०१ मार्च, २०१४ अन्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्र.क्र. २७/२०१४, अहवाल क्र. ४४ व ४५ अन्वये प्राप्त शिफारशीनुसार वैश्यवाणी या जातीचा समावेश इतर मागासवर्ग, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये करण्यात आलेली आहे

राज्य मागासवर्ग आयोगाने मार्च, २००८ मध्ये सादर केलेल्या अहवाल क्र. २३ नुसार हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी या तिन्ही जाती वैश्यवाणीच आहेत. त्यामध्ये कोणताही फरक करण्याचे कारण नसल्याबाबत निरीक्षण नोंदवले आहे. सदर अहवाल मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आला असून स्वयंस्पष्ट आहे. सदर अहवालामध्ये दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने “वैश्यवाणी” या जातीच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भात सर्व सक्षम प्राधिकारी आणि विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-
(१) हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी या तिन्ही जाती वैश्यवाणीच आहेत. त्यामध्ये कोणताही फरक करण्याचे कारण दिसत नाही. अज्ञानामुळे किंवा नजर चुकीने जातीच्या सदरात (कॉलममध्ये) अशा वेगवेगळ्या नोंदी दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे या जातीच्या व्यक्तींना त्यांच्या वडिलांच्या / आजोबांच्या आणि अन्य रक्त नात्यातील व्यक्तीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये अथवा दस्ताऐवजामध्ये हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी यापैकी कोणतीही नोंद असेल तर अशा व्यक्तींना ते “वैश्यवाणी” आहेत, असे आयोगाने स्पष्टीकरण केल्यामुळे त्यांना “वैश्यवाणी” जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे.

(२) ज्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर केवळ “हिंदू” असा उल्लेख असेल अशा व्यक्तींनी “वैश्य”, “वाणी” व “वैश्यवाणी” अशा नोंदी असलेली इतर कागदपत्रे (जसे जन्ममृत्यू रजिस्टरवर केलेली नोंद किंवा मालमत्ता रजिस्टरवर केलेल्या नोंदी इत्यादी) पुराव्यासाठी सादर केल्यास त्यास “वैश्यवाणी” समजण्यात येऊन त्यानुसार त्यांना “वैश्यवाणी” जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०९०९१४४४२०७१३४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Digitally signed by SACHIN SHRIPATI
KHANDEKAR
Date: 2026.09.09 14:45:13 +05’30’ (स. श्री. खांडेकर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

Vaishya Vani Jati
Vaishya Vani Jati

Leave a Comment

error: Content is protected !!