राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत दि.११.८.२०२६ रोजी आयोजित बैठक Update Data of Teachers in District for Intra District Transfer of Zilla Parishad Teachers

Update Data of Teachers in District for Intra District Transfer of Zilla Parishad Teachers

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Rajyatil Prathamik Shikshakanchya Aantarjilha V Jilha Antargat Badalya

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, मुंबई

बैठकीची सूचना

क्र.बैठक-१४२६/प्र.क्र.१७०/आस्था-१४

दिनांक :- १० ऑगस्ट, २०२६

प्रति,

१) श्री. संभाजीराव थोरात, नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

२) श्री. बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

३) श्री. बलवंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

४) श्री. बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

५) श्री. दिपक गिरी, राज्य संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

      विषय :- राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत दि.११.८.२०२६ रोजी आयोजित बैठक…

महोदय,

मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांच्या निर्देशानुसार “राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत” या विषयाच्या अनुषंगाने मंगळवार, दि.११.८.२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) महोदयांचे दालन क्र. (०१) पोट माळा मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.

आपली,

(ज्योत्स्ना अर्जुन) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :- १) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

२) मा. सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहायक.

३) उप सचिव (जि.प.आस्थापना), ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांचे स्वीय सहायक.

मंत्री
ग्रामविकास व पंचायत राज यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई

दिनांक : १०.०८.२०२६

तात्काळ

महोदय,

यावी असे निर्देशित केले आहे. मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांनी खालील नमुद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात :

विषय – राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत बैठक (संदर्भ पत्र सोबत जोडले आहे.)

वार व दिनांक : मंगळवार, ११.०८.२०२६

वेळ :  दुपारी ०२.०० वा.

स्थळ : मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे दालन क्र. (०१) पोटमाळा, मंत्रालय मुंबई.

बैठक आयोजित करणारा विभाग : ग्रामविकास व पंचायत राज विभाग

बैठकीकरीता निमंत्रितांची यादी : १. मा. सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)

२. उप सचिव/सह सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)

३. श्री. संभाजीराव थोरात, नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

४. श्री. बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

५. श्री. बलवंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

६. श्री. बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

७. श्री. दिपक गिरी, राज्य संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

८. विषयाशी संबधित इतर मंत्रालयीन व क्षेत्रिय अधिकारी.

> उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागाने करावे व नमुद केल्याप्रमाणे सर्व संबधितांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे.

> सदर बैठकीकरिता सर्व संबधित निश्चित केलेल्या वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता विभागाने घ्यावी.

> सदर बैठकीस चहापान, व्यवस्था व कक्ष आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही विभागाने करावी.

> संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी या कार्यालयास दि.१०.०८.२०२६ रोजी (rddminister@gmail.com) या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावी तसेच ३ हार्ड कॉपी या कार्यालयास पाठविण्यात यावी

> बैठकीचे कामकाज हाताळणाऱ्या अधिकाऱ्याचा तसेच बैठकीचे इतिवृत्त घेणाऱ्या अधिकारी / लघुलेखक यांचा कार्यालयीन तसेच मोबाईल क्रमांक बैठकीच्या सुचना पत्रात न चुकता नमुद करावा.

> सदर बैठकीच्या अनुषंगाने या कार्यालयातील श्री. सुर्यकांत सजगणे, स्वीय सहाय्यक, संपर्क क्र. (९८२१५३७०३१) / श्री. प्रफुल्ल पाटील (९००४३६५३०३) यांचेशी सपंर्क करावा.

> बैठक झाल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त मा. मंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी सात दिवसांत सा.प्र.वि. च्या शासन परिपत्रक क्र. सकर्कीर्ण-२०१८/१२५/प्र.क्र२२/का-१८ (र.व.का.) दिनांक ४ जुन, २०१९ मधील नमुद निर्देशाप्रमाणे सादर करावे.


(सुर्यकांत सजगणे)

स्वीय सहायक

प्रति,
सचिव (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
मंत्रालय, मुंबई.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत दि.११.८.२०२६ रोजी आयोजित बैठक Update Data of Teachers in District for Intra District Transfer of Zilla Parishad Teachers
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत दि.११.८.२०२६ रोजी आयोजित बैठक Update Data of Teachers in District for Intra District Transfer of Zilla Parishad Teachers

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग, मुंबई

क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४

दिनांक :- ७ जुलै, २०२५

प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत.

संदर्भ :- मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचे दि.२.७.२०२५ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे, नावे वगळणे आणि नव्याने नावे समाविष्ठ करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.

२. त्यामुळे मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांनी संदर्भाधिन पत्रान्वये सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे,-

१) बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ४ दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

२) सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत करावी.

३) तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करुन सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी.

४) विहीत केलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून, याकरीता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ मध्ये यावेळीला स्पर्श करून प्राप्त करा

आपली,
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :- मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

Also Read 👇

क्र. न्यायाप्र-१३२५/प्र.क्र.१००/आस्था-१४

दिनांक :- १३ मे, २०२५

विषय :- मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.५२०६/२०२५, ५२०७/२०२५ व ५२०८/२०२५ बाबत

संदर्भ :-
१. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचे दि.०९.०५.२०२५ रोजीचे आदेश.
२. शासन पत्र क्र. बैठक-१४२५/प्र.क्र.७२/आस्था-१४, दि.२८.०३.२०२५

महोदय,
उपरोक्त विषयाबाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल याचिका क्र. ५२०६/२०२५ व अन्य संलग्न याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.०९.०५.२०२५ रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. तसेच संदर्भ क्र. २ येथील शासन समक्रमांक दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक ३ येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत.

२. उपरोक्त न्यायनिर्णयाद्वारे मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील नियम ६ (८) (२) नुसार सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करुन त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याची आपणांस विनंती आहे.

परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

आपली,

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद (सर्व).

बदलीसंदर्भात शिक्षकांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा – सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा निर्णय

बदलीसंदर्भात शिक्षकांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा – सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा निर्णय

दिनांक ०९ मे २०२५ औरंगाबाद खंडपीठ, उच्च न्यायालय

शिक्षकांच्या परस्पर आंतरजिल्हा बदल्यानंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याबाबतचा मोठा निर्णय आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आला. न्यायालयाने शासनाच्या नकारात्मक निर्णयाला झुगारत शिक्षकांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Also Read 👇

क्र.बैठक-१४२५/प्र.क्र.७२/आस्था-१४

दिनांक :- १६ एप्रिल, २०२५

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

CIRCULAR PDF COPY LINK

Also Read 👇

क्रमांक. जिपब-१६२५/प्र.क्र.१४/आस्था-१४

दिनांक:- ४ एप्रिल, २०२५

विषय :- विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.

Circular PDF copy link

Also Read 👇

क्रमांक. जिपब-१६२५/प्र.क्र.१४/आस्था-१४
दिनांक:- २ एप्रिल, २०२५

विषय :- विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.

Circular Pdf Copy Link

Also Read –

क्रमांक: माअअ-२०२५/प्र.क्र.५७/आस्था-१४

दिनांक: २४ मार्च, २०२५

विषय- माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळणेबाबत अर्ज. संदर्भ- आपला दि.०८.०३.२०२५ रोजीचा ऑनलाईन प्रणालीवरील प्राप्त अर्ज.

महोदय,
आपला संदर्भाधिन दि.०८.०३.२०२५ रोजीचा ऑनलाईन प्रणालीवर सादर करण्यात आलेला माहिती अधिकार अधिनियम,

परिपत्रक पीडीएफ लिंक

ALSO READ 👇

क्र.जिपष-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४

दिनांक :- २३ नोव्हेंबर, २०२२.

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ / २ यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण…

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

ALSO READ 👇

Also Read – दुर्गम भागातून सुगम भागात बदली

Leave a Comment

error: Content is protected !!