UDID Card GR
UDID Card GR
vishesh sahayya anudan yojanentargat vaishvik olakhapatra (UDID Card) nasnarya divyanga labharthyanna mudatavadh denebabat
Regarding extension of time for disabled beneficiaries who do not have Universal Identity Card (UDID Card) under the Special Assistance Grant Scheme.
महाराष्ट्र शासन
दिव्यांग सक्षमीकरण विभाग
शासन निर्णय क्र. विसयो- २०२६/प्र.क्र.३९/कार्यासन-०६
ई-ऑफिस क्र. १६६१५२७, मुंबई
दिनांक :- २८ सप्टेंबर, २०२६.
वाचाः-
१) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. विसयो-२०१८/प्र.क्र.६२/विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९,
२) दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/दि.क.२, दि.२७ जून, २०२४.
३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. विसयो-२०२६/प्र.क्र.०६/विसयो, दि. २४ फेब्रुवारी, २०२६.
४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. विसयो-२०२५/प्र.क्र.६९/विसयो, दि. २७ मार्च, २०२६.
५) दिव्यांग सक्षमीकरण विभाग शासन निर्णय क्र. विसयो २०२६/प्र.क्र.३९/कार्यासन-०६, दि. १५ मे, २०२६.
प्रस्तावना :-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत स्वरुपात १. संजय गांधी निराधार अनुदान योजना, २. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, ३. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, ४. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व ५. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
हेही वाचाल –
सदर योजनामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपरोक्त नमूद ५ योजनांमधील दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २४ फेब्रुवारी, २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या विभागाकडे वर्ग करण्यात आले असुन ०१ एप्रिल, २०२६ पासुन दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सहाय्य योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २७ मार्च, २०२६ रोजीच्या शासन निर्णय प्रमाणे वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
विभागाच्या दिनांक १५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्याने ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, महाडीबीटी पोर्टल “महाडीबीटी २.०” या नव्या स्वरुपात अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु आहे. सबब वैश्विक ओळखपत्र (UDID) नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना UDID Card काढण्यासाठीची मुदत वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय :-
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक १ एप्रिल, २०२६ पूर्वी विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते, फक्त अशा लाभार्थ्यांपैकी वैश्विक ओळखपत्र (UDID) नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना UDID Card काढण्यासाठीची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात येत आहे.
२. इतर सर्व मार्गदर्शक सूचना या दिनांक १५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२६०९२८१३२९३११९३५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन