TAIT Entrance Provisions Amended शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याबाबतची तरतूद सुधारित

TAIT Entrance Provisions Amended

IMG 20250512 163738
TAIT Entrance Provisions Amended

TAIT Entrance Provisions Amended

प्रसिध्दी निवेदन

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एनसीएल (NCL) प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोहोच पावती नुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. परंतु त्यांनी पोहोच पावतीतील दिनांकानुसार मुदतीत एनसीएल (NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

ठिकाणः पुणे

दिनांकः १२/०५/२०२५

स्वाक्षरीत (अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

Also Read 👇

IMG 20250503 163252
TAIT Entrance Provisions Amended

TAIT Entrance Provisions Amended

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५

प्रसिध्दी निवेदन

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होणेबाबत सुधारीत तरतूद शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये जाहीर करण्यात आली आहे. सुधारीत तरतूदी अन्वये “शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकपासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल.”

IMG 20250503 163330
TAIT Entrance Provisions Amended

व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ चे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. याबाबतच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर जाहीर करण्यात येतील. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी.

ठिकाणः पुणे

दिनांक: ०३/०५/२०२५

(अनुराधा ओक)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे

Also Read 👇

IMG 20250502 221907
TAIT Entrance Provisions Amended

TAIT Entrance Provisions Amended

TAIT Examination Entrance Provisions Amended

Amending the provisions regarding admission to teacher aptitude and intelligence tests

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याबाबतची तरतूद
सुधारित करणे.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः संकीर्ण- २०२२/प्र.क्र. १०६/टिएनटि-१,मंत्रालय, मुंबई

दिनांक: ०२ मे, २०२५.

संदर्भ: शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दि.१०.११.२०२२.

प्रस्तावना:-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याची मागणी वारंवार केली आहे. सन २०१७ मध्ये अशा प्रकारची पहिली व सन २०२२ मध्ये दूसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०२५ मध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दूसऱ्या चाचणीत जवळपास ५ वर्ष व दूसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास ३ वर्ष इतके अंतर आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ठ होण्याची मागणी केली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा 2025 (TAIT)
दिव्यांग उमेदवार : लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शक सूचना वाचा या ओळीला स्पर्श करून

केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव व त्याअनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतूदी दुरुस्ती करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

IMG 20250502 221925
TAIT Entrance Provisions Amended

   शासन शुध्दीपत्रक

उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १०.११.२०२२ मधील परिच्छेद क्र. ०३ (२) येथील ” शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.” या तरतूदीऐवजी शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहीत मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.” अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे.

०२. उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेली तरतूद सन २०२५ मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचण्यांना लागू राहील.

IMG 20250502 221937
TAIT Entrance Provisions Amended

०३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५०२२०३६२९७७२१ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन शुद्धिपत्र पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!