Divyang Candidates Written Exam Writer And Compensatory Time Guidelines

Divyang Candidates Written Exam Writer And Compensatory Time Guidelines

IMG 20250501 200351
Divyang Candidates Written Exam Writer And Compensatory Time Guidelines

Divyang Candidates Written Exam Writer And Compensatory Time Guidelines

Divyang Candidates Written Examination Writer And Compensatory Time Guidelines for TAIT 2025

Disabled Candidates: Guidelines regarding Written Examination TAIT 2025 and Grace Period

Compensatory Time

दिव्यांग उमेदवार : लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा 2025

दिव्यांग उमेदवार : लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शक सूचना

    केंद्र शासनाकडून दिव्यांग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ ऐवजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ दिनांक १९ एप्रिल, २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील तरतूदी लक्षात घेऊन क्रमांक ३४-०२/२०१५-डी-डी-तीन, दिनांक २९ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाव्दारे केंद्र शासनाकडून ‘लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीचे परीक्षा आयोजित करण्याकरीता मार्गदर्शन सूचना २०१८’ (Guidelines for conducting written examination for persons with benchmark Disabilities २०१८) जारी करण्यात आल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचानांनुसार दिव्यांग व्यक्तीच्या परीक्षा आयोजित करताना संपूर्ण देशभरात एकसारखे व सर्वसमावेशक धोरण असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्तुत मार्गदर्शक सूचनांच्या आधारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित परीक्षांमध्ये लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेले उमेदवार लिहिण्याकरीता सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक तसेच अन्य सोयी सवलती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने खालील मार्गदर्शक सूचना विहित करण्यात येत आहेत:-

    महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

    🪀 Join our social media

    १.१ लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची अनुज्ञेयताः-

    (१) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ (आर) मध्ये विहित केलेल्या फक्त दृष्टिहिन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित व किमान 40% कायमस्वरुपी विकलांगत्त्य असलेल्या पात्र उमेदवारांना, ते लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास, परीक्षा प्रयोजनार्थ गुणवत्तेनुसार लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी (Compensatory time) अनुज्ञेय राहील,

    (२) लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची अनुज्ञेयताः

    1.1 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 2 (आर) मध्ये विहित केलेल्या व किमान 40% लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या उमेदवाराने मागणी केल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विहित केलेल्या अटींच्या अधीन राहून लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय आहे

    1.2 लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची सुविधा घेण्याकरीता लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या उमेदवाराने शासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नमुन्यातील वैध दिव्यांगत्याबाबतचे प्रमाणपत्र (Certificate of Disability) धारण करणे व ते परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

    1.3 लेखनिकाची आणि/अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवराने केंद्र शासनाच्या १९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या मार्गदर्शक सूचनाव्दारे विहित करण्यात आलेले दिव्यांगत्वामुळे उमेदवार स्वतः उत्तरे लिहण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचे विहित प्रधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र (Certificate Regarding physical limitation in an examinee to write) धारण करणे व ते परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे. (प्रमाणपत्राचा नमुना (नमुन क्रमांक ११) सोबत जोडण्यात आला आहे.)

    1.4 खालिल दिव्यांगत्व प्रकारातिल उमेदवारांनी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Certificate regarding physical limitation in an examinee to write) सादर करणे अनिवार्य नाही,

    १) Blindness

    २) Locomotor disability both arm affected-BA

    ३) Cerebral palsy

    २. उमेदवार स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणार असल्यास लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या वावी :-

    २.१ उमेदवार स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणार असल्यास लेखनिकाची शैक्षणिक अर्हता उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा एक टप्पा कमी असणे आवश्यक आहे. त्याकरीता उमेदवाराने परीक्षेच्या वेळी विहित नमुन्यामध्ये (नमुना क्रमांक १२) वचनपत्र (Letter of Undertaking for Using Own Scribe) भरून देणे आवश्यक आहे.

    २.२ दिव्यांग उमेदवारास ज्या परीक्षेकरीता लेखनिकाची मदत घ्यावयाची आहे. त्या परीक्षेकरीता संबंधित लेखनिक त्याच वर्षा किंवा त्यपूर्वी कोणत्याही वर्षी उमेदवार असल्यास उमेदवारास अशा लेखनिकाची निवड करता येणार नाही.

    २.३ एखद्या व्यक्तीने एका उमेदवारास लेखनिक म्हणून मदत केल्यास सदर व्यक्ती त्याच उमेदवारास पुन्हा पुढील परीक्षांमध्ये लेखनिक म्हणून मदत करू शकेल, परंतु, लेखनिक म्हणून एखाद्या उमेदवाराला मदत केलेली व्यक्ती दुसऱ्या उमेदवाराला लेखनिक म्हणून काम पाहू शकणार नाही.

    २.४ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एखाद्या पदावर निवड झालेली व्यक्ती दिव्यांग उमेदवारास लेखनिक म्हणून काम पाहू शकणार नाही.

    २.५ वेगवेगळ्या विषयाच्या पेपरसाठी मुख्यत्च्येकरून भाषाविषयक पेपरसाठी वेगवेगळे लेखनिक घेण्याची दिव्यांग उमेदवारास परवानगी राहील, तथपि, एका विषयाकरीता एकल लेखनिक घेता येईल, उमेदवाराने त्याच्या विनंती अर्जामध्ये त्याप्रामणे स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.

    २.६ दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाच्या निवडीसंदर्भातील सदर सूचानांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले असल्याचे कोणत्याही टप्यावर निदर्शनास सदर सूचनांचे कोणत्याही प्रकारे उल्लघंन केले असल्याचे कोणत्याही टप्प्यावर निदर्शनास आल्यास उमेदवाराने व लेखनिकावरील इतर कायदेशीर कारवाईसह संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल अथवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या स्वेच्छधिकारानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत निवडीकरीता प्रतिरोधित (Deber) करण्यत येईल.

    ३. लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीकरीता पूर्व परवानगी घेणे :-

    ३.१ दिव्यांग उमेदवाराने जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना दिव्यांगत्वाच्या प्रकारीची नोंद केल्यानंतर त्यास लेखनिकाची तसेच अनुग्रह कालावधीची आवश्यकता आहे किंवा नाही याबाबतची माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच, लेखनिकाची आवश्यता असल्यास लेानिकाची व्यवस्था उमेदवार स्वतः करणार आहे की आयोगाच्या कार्यालयामार्फत लेखनिकाची व्यवस्था करावी लागणार आहे. याचाही स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.

    ३.२ परीक्षेच्या वेळी लेखनिकाची आणि/अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्याबाबत जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन पध्दतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसाच्या आत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये (प्रपत्र-१ अथवा प्रपत्र-२) आयोगाकडे विनंती अर्ज करुन लेखनिक आणि/अथवा अनुबग्रह कालावधीची आवश्यकता असलयाबावत स्पष्ट मागणी करणे आवश्यक आहे. विनंती अर्ज टपालाक्षरे किया

    pre-examination@mpsc.gov.in

    या ईमेलवर पााविण्यात यावा.

    ३.३ लेखनिकाच्यामदतीची आवश्यकता असणाऱ्या उमेदवाराने पूर्व परवानगीकरीता खालील कागदपत्रे सादर करेण आवश्यक आहे:-
    (१) विनंती अर्ज (सोबत जोडलेल्या नमन्यामध्ये) (प्रपत्र-१ अथवा प्रपत्र-२)

    (२) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रांक अप्रवि-२०१८/सीआर ४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर २०१८ नुसार सगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील व कायमस्वरुपी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असल्याबाबतच्याप्रमाणपत्राची छायांकितप्रत.

    (३) दिव्यांगत्वामुळेउमेदवार स्वतः उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलयाबाबत विहित प्राधिका-याने प्रमाणित केलेल्या प्रमाणप्रत्राची छायांकित प्रत (Certificate regarding physical limitation in an examinee to write) (सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये) (नमुना क्रमांक-११)

    (४) लेखनिकच्या आधार कार्डची छायांकित प्रत.

    ३.४ केवळ अनुग्रह कालावधीची (Compesatory Time) मागणी करणाऱ्या उमेदवारांनी पूर्व परवानगीकरीता आयोगास खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे:-

    (1) विनंती अज्र (सोबत जोडलेलया नमुन्यामध्ये) (प्रपत्र-1 अथवा प्रपत्र-2)

    (2) शासन निज्रय, साव्रजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-2012/प्र.क्र. 297/आरोग्य-6, दिनांक 6 ऑक्टोबर, 2012 अथवा शासन निाय, साव्रजनिक आरोगय विभाग, क्रमांक अपवि 2018/सीआर46/आरोग्य-6, दिनांक 14 सप्टेंबर, 2018 नुसार संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील व कायमस्वरुपी किमान 40 टक्के दिव्यांगतव असलयाबाबतच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

    (3) दिव्यांगत्यामुळे उमेदवार स्वतः उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलयाबाबत विहित प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत (Certififate regarding physical limitation in an examinee to write) (सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये) (नमुना क्रमांक-19)

    3.1 लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीकरीता केलेला विनंती अर्जातील तपशील संपूर्णपणे भरलेला असणे व तयावर उमेदवाराची स्वाक्षरी अंगठा तसेच लेखनिकाची स्वाक्षरी (लागू असलयास) असणे आवश्यक आहे.

    3.2 दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह केलेल्या विनंती अर्जाची व त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करुन परीक्षेच्या वेळी मूह प्रमाणपत्रांची पडताहणी करण्याच्या अधीन राहून त्यांना मागणीप्रमाणे लेखनिकाची आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी देण्यात येईल, अशा प्रकारे पूर्व परवानगी दिलेल्या उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी प्रसिध्द करण्यात येतील.

    14 प्रत्यक्ष परीक्षेच्या वेही अवलंबविण्यात येणारी कार्यपध्दतः-

    4.1 लेखनिकाची आणि/अथवा अनुग्रह कालावधीची पूर्व परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी संबंधित उपकेंद्रप्रमुख समवेक्षक यांच्याकडे सत्र संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीकरीता सादर करणे अनिवार्य आहे.

    4.2 लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या व आयोगाच्या आर्यागाच्या कार्यालयाकडून पूर्व परवानगी घेतलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे:-

    (1) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-212/प्र.क्र.297/आरोग्य-6, दिनांक 6 ऑक्टोबर, 2012 अथवा शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रवि-2018/सीआर46/आरोग्य-6, दिनांक 14 सप्टेंबर, 2018 नुसार संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील व कायमस्वरुपी किमान 40 टक्के दिव्यांगत्व असल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत,

    (2) दिव्यांगत्यामुळे उमेदवार स्वतः उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबत विहित प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले मूळ प्रमाणपत्र (नमुना क्रमांक-11) (Certififate regarding physical limitation in an examinee to write) व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत.

    (3) लेखनिकाचे मूळ आधार कार्ड (ओळख पडताळणीसाठी) व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत.

    (4) लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराने लेखनिकासह द्यावयाचे विहित नमुन्यातील (नमुना क्रमांक-9) संयुक्त प्रमाणपत्र (लेखनिकाच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोसह)

    (5) स्वतःचा लेखनिक वापरण्यासंदर्भात विहित नमुन्यातील (नमुना क्रमांक 12) मूळ वचनपत्र (Lteer of Undertaking for Using Own Scribe).

    4.3. केवळ अनुग्रह कालावधीची (Compensatory Time) पूर्व परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वी तपासणीकरीता खालील मूळ कागदपत्रे तसेच त्यांच्या छायांकित प्रती सादर करणे अनिवार्य आहे:-

    (1) शासन निर्णया, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-2012/प्र.क्र.297/आरोग्य-6, दिनांक 6 ऑक्टोबर 2012 अथवा शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रवि-2018/सीआर 46/आरोग्य-6, दिनांक 14 सप्टेंबर, 2018 नुसार संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील व कायमस्वरुपी किमान 40 टक्के दिव्यांगत्व असल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत.

    (2) दिव्यांगत्वामुळे उमेदवार स्वतः उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबत विहित प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले मूळ प्रमाणपत्र (नमुना क्रमांक-11)) (Certififate regarding physical limitation in an examinee to write) व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत.

    (3) अनुग्रह कालावधीची (Compensatory Time) मागणी करणाऱ्या उमेदवाराने द्यावयाचे प्रमाणपत्र (नमुना क्रमांक-10)

    4.4. उपरोक्त सर्व कागदपत्रे प्रत्येक पेपरकरीता स्वतंत्ररित्या सादर करणे अनिवार्य आहे.

    4.5. पूर्व परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांपैकी लेखनिकाची स्वतः व्यवस्था करणा-या उमेदवारांचावत संबंधित लेखनिकाच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थितीबाबतची जबाबदारी उमेदवाराची राहील. लेखनिक उपस्थित नसलयाच्या कारणास्त्व ऐनवेळी लेखनिकाची व्यवस्था आयोगाच्या कार्यालयाच्या कार्यालयामार्फत कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही,

    लेखनिकाची व्यवस्था आयोग्याच्या कार्यालयामार्फत करण्याचा पर्याय निवडलेल्या व त्याबाबत पूर्व परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांबाबत परीक्षा उपकेंद्रावर लेखनिकाची व्यवस्था करण्यात येईल. उमेदवाराने मागणी केल्यास आयोगामार्फत व्यवस्था केलेल्या लेखनिकास परीक्षेपूर्वी भेटण्याची परवानगी देय राहील,

    लेखनिकाची मदत घेण्याची पूर्व परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी 20 मिनिटे याप्रमाणे अनुग्रह कालावधी (Compensatory Time) अनुज्ञेय राहील.

    लेखनिकाची मदत न घेता केवळ अनुग्रह कालावधीची पूर्व परवानगी घेतलेल्या उमेदवारांनाही परीक्षेच्या प्रत्येक तासाठी 20 मिनिटे याप्रमाणे अनुग्रह कालावधी (Compensatory Time) अनुज्ञेय राहील.

    4.9 काही अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा सुरु होण्यापूर्वी ऐनवेळी लेखनिक बदलास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित अपकेंद्रप्रमुखांना राहतील.

    4.10 उमेदवाराने स्वतः लेखनिकाची व्यवस्था केल्यास त्याच्या मानधनाची व्यवस्था उमेदवारास करावी लागेल.

    4.11 लेखनिकाची आयोगाच्या कार्यालयामार्फत पुरविण्यात आला असल्यास आयोगाने विहित केल्याप्रमाणे लेखनिकाचे मानधन संबंधित उपकेंद्रपमुखांकडे परीक्षा सुरु होण्यापुर्वी जमा करणे आवश्यक राहील.

         लेखतनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवारांकरीता विशेष सूचना :-

    दिव्यांग उमेदवार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचण्यास आणि अथवा उत्तरे लिहिण्यास सक्षम नसल्याच्या कारणास्तव त्यास लेखनिकाची मदत अनुज्ञेय आहे. यास्तव, लेखनिकाने दिव्यांग उमेदवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच उमेदवाराने सांगितलेले उत्तर छायांकित करण्यास/लिहिण्यास मदत करणे अपेक्षित आहे.

    लेखनिकाने प्रश्न वाचून दाखवल्यानंतर उमेदवाराने सांगितलेले उत्तरच विहित ठिकाणी छायांकित करणे/लिहिणे अपेक्षित आहे. उत्तराच्या निवडीबाबत लेखनिकाने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप/मार्गदर्शन/सूचना करुन नये.

    लेखनिकाने परीक्षा कालावधीत प्रश्नोत्तराबाबात अथवा इतर कोणत्याही विषयी उमेदवारांशी चर्चा/गप्पा करु नयेत, तसेच, इतर लेखनिका उमेदवार यांच्याशी बोलू नये.

    दिव्यांग उमेदवार व लेखनिक यांना आयोगाच्या परीक्षांचे सर्व नियम/सूचना जशाच्या तशा लागू असतील.

    उमेदवाराने स्वतः व्यवस्था केलेल्या लेखनिकाच्या गैरवर्तनाची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच लेखनिक व उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही अथवा इतर उमेदवारांची एकाग्रता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

    आयोगाच्या कार्यालयाकडून अथवा परीक्षेच्या वेळी संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास उमेदवार व लेखनिकावरील इतर कायदेशीर कारवाईसह संबंधित उमेदवाराची उमेदवारी रदद करण्यात येईल अथवा आयोगाच्या स्वेच्छधिकारानुसार आयोगामार्फत निवडीकरीता प्रतिरोधित (Debar) करण्यात येईल.

    निवड प्रक्रिया अथवा मुलाखत अथवा निवडीनंतर कामावर रूजू होताना अथवा कोणत्याही टप्यावर, दिव्यांगत्वामुळे लिहिण्याच्या वेगावर मर्यादा येत असल्यामुळे परीक्षेच्या वेळी लेखनिकाची सेवा घेणे आवश्यक असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यान नियुक्त केलेल्या वैद्यकीय मंडळाची खात्री पटविण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.

    लेखनिकाची मदत घेण्याबाबत अथवा अनुग्रह कालावधी घेण्याबाबत विहित निकषांची उमेदवाराकडून पूर्तता होत नसल्याचे अथवा उमेदवाराने स्वतः बद्दल तसेच लेखनिकाबद्दल दिलेली माहिती चुकीची खोटी असल्याचे अथवा उमेदवारांकडून अथवा लेखनिकाकडून कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे कोणत्याही टप्यावर निदर्शनास आल्यास, संबंधित उमेदवाराची परीक्षेची उमेदवारी रद्द करून उमेदवारास व लेखनिकास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमधून प्रतिरोधित (Debar) करण्यात येईल व अथवा इतरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकरणी उमेदवाराची शासन सेवेतील पदावर नियुक्ती इ शाली असेल तर त्याची सेवा समाप्ती करण्यास तो पात्र राहील.

    सदर मार्गदर्शक सूचना आयोगामार्फत यापुढे आयोजित करण्यात येणान्या सर्व परीक्षांकरीता लागू होतील.

    दिनांक :

    परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

    Leave a Comment

    error: Content is protected !!