अनुदानित माध्यमिक/प्राथमिक/कनिष्ठ महाविदयालय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती व अनुषांगीक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करणेबाबत Submit Pension Case Online In Shalarth

Submit Pension Case Online In Shalarth

Submit Pension Case Online In Shalarth

Submitting Retirement Proposals Through Shalaarth

Submitting retirement proposals through the Shalaarth system

karmcharyanche sevanivrutti prastav shalarth pranaleemarfat sadar karane

Submitting retirement proposals of employees through the Shalaarth system

Regarding submission of retirement and ancillary proposals of aided secondary/primary/junior college employees through the Shalarth system

anudanit madhyamik/prathmik/kanishth mahavidyalay karmcharyanche sevanivrutti v anushangik prastav shalarth pranaleemarfat sadar karanebabat

क्रमांकः-शिसं/शिक्षक/शिक्षकेत्तर, टी-०१/पेन्शन/ई. गव्ह/२०२६

दिनांक:- /०४/२०२६

महत्वाचे प्रकरण

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.सर्व

३. शिक्षण निरिक्षक, (उत्तर, दक्षिण, पश्चिम)

४. अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. (सर्व)

विषयः- अनुदानित माध्यमिक/प्राथमिक/कनिष्ठ महाविदयालय कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती व अनुषांगीक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करणेबाबत. 

संदर्भः-

१ शासन निर्णय क्र.ई गव्ह-१५१९/प्र.क्र.१८/संगणक, दि. १९ सप्‌ओबर२०१९

२. मा. शिक्षण आयुक्त कार्यालयाचे क्र. आशिका /२०२५/संपर्कअधि/ई. गव्ह. १४३, दिनांक-३०/१२/२०२५ व समक्रमांकाचे दिनांक-५/५/२०२५ चे आदेश

ईगव्हर्नन्स अंतर्गत विभागतील माहिती व तंत्रज्ञान सेवा परिणामकारकरित्या उंचावण्यासाठी आवश्यक ती मानके विकसित करून माहिती व तंत्रज्ञान संसाधनांची उपयोगीतता वाढवण्याकरीता विभागाअंतर्गत वेगवेगळे पोर्टल तयार करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांची सेवानिवृत्ती प्रकरणे विहीत कालमर्यादेत निकाली काढणे व याबाबतची कार्यप्रणालीम पारदर्शक असणे या करीता सेवानिवृत्ती व अनुषांगिक प्रकरणे महालेखाकार कार्यालयाकडे शालार्थ प्रणाली मार्फत सादर करण्याची सुविधा उपलब्ध (LIVE) करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे दि.०१ मे २०२६ पासून महालेखाकार, मुंबई /नागपूर कार्यालयाकडे सेवानिवृत्ती व अनुषांगिक प्रकरणे शालार्थ प्रणालीमार्फत सादर करण्यात यावीत. तूर्त असे प्रस्ताव ऑनलाईन प्रणाली सोबतच प्रचलित ऑफलाईन पध्दतीने महालेखाकार, मुंबई/नागपूर कार्यालयास सादर करावेत.

सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे शालार्थ प्रणालीवर अपलोड करतेवेळी उद्भवणा-या तांत्रिक अडचणीबाबत महाआयटी (मुंबई) यांच्यांशी संपर्क साधावा. यापुढे सर्व सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने महालेखाकार कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.

शिक्षण उपसंचालक
माध्यविक व उच्च उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे-०१

प्रतः माहितीस्तव सविनय सादर

१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२. श्री विशाल परमार, अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ (टिएनटी-६)

३. मा. महालेखाकार, कार्यालय, मुंबई/नागपूर

४. श्री पवन जोशी (प्राजेक्ट लीड) महाआयटी, मुंबई आवश्यक त्या कार्यवाहीसाठी

अनुदानित माध्यमिक/प्राथमिक/कनिष्ठ महाविदयालय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती व अनुषांगीक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करणेबाबत
Submit Pension Case Online In Shalarth
अनुदानित माध्यमिक/प्राथमिक/कनिष्ठ महाविदयालय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती व अनुषांगीक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करणेबाबत
Submit Pension Case Online In Shalarth

Leave a Comment

error: Content is protected !!