दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश Showing students answer sheets to parents while issuing result उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देणे

Showing students answer sheets to parents while issuing result

Showing students answer sheets to parents while issuing result

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Nikal patrak detana vidyarthanchya uttarpatrika palkanchya nidarshanas anun dene

Showing students’ answer sheets to parents while issuing result sheets GR Circular

Regarding bringing the answer sheets of the students to the attention of the parents while issuing the result sheet on May 1, 2026…

Uttarpatrik Palkanchya Avlokansathi Uplbdh karn Dene

student’s score card

vidyarthanchya gunpatrika detana palkana uttar Patrika dakhavne

Making the answer sheets available for parents to review will have the following benefits:

showing Answer paper to parents while issuing annual exam results

Making answer sheets available for parents to review

varshik pareeksha nikal detana vidyarthanchya uttarpatrika palkanchya nidarshanas anun dene

जा. क्र. प्राशिसं/उन्हाळी सुटटी/८०२/

दि.२७/०४/२०२६

विषय : दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत...

संदर्भ :- १. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एसडी-४, दि. २०-०४-२०२३

२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२६/उन्हाळी सुटटी/एस-१/१७७६३११, दि. २८-०३-२०२६

उपरोक्त संदर्भ क्र १ च्या परिपत्रकास अनुसरुन संदर्भ क्रमांक २ अन्वये संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यापूर्वी दिनांक १ मे २०२६ रोजी निकाल जाहीर करावयाचा आहे

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पुढीलप्रमाणे नमूद आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्टपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे -शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे.

उपरोक्त बाबींचा विचार करता राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणाव्यात.

    उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिल्यास पुढील प्रमाणे फायदे होतील -

उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्यांचे अचूक निदान करता येईल.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल.

तसेच वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील.

गुणांपेक्षा कौशल्य व समज यांवर आधारित प्रगतीचे मोजमाप करणे शक्य होईल.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील.

अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी (अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन) विकसित करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील, शाळा-घर या दोन्ही स्तरांवर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल.

शिक्षक-पालक यांच्यात सतत संवाद होईल.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो.

मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होतो.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येते.

आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते.

शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रीत होईल.

वरील प्रमाणे दिलेल्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना निदर्शनास आणून त्याप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी.

Digitally signed by

SACHINDRA PRATAP SINGH Date: 27-04-2026 21:00:27

(सचिन्द्र प्रताप सिंह) (भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय,पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

१. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत – पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी

२. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रति,
१. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश Showing students answer sheets to parents while issuing result
दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश Showing students answer sheets to parents while issuing result

Leave a Comment

error: Content is protected !!