राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत परिपत्रक दिनांक २० एप्रिल २०२३ Shala Sutti Jahir Karane Suru Karne GR

Shala Sutti Jahir Karane Suru Karne GR

Shala Sutti Jahir Karane Suru Karne GR

Shala Sutee Jahir Karane Suru Karne GR

Rajyatil Prathmik, Madhyamik v Uccha Madhyamik Shaletil Vidyarthyanna Sutee Jahir Karane Tasech Shala Suru Karnyachya Anushangane Nirdesh Nirgamit Karanebabat

Regarding declaring holidays for primary, secondary and higher secondary school students in the state and issuing instructions regarding the reopening of schools Date 20 April 2023 Circular

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- २० एप्रिल, २०२३.

   शासन परिपत्रक:-

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

२. त्यानुसार याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.

२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

३. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विदर्भविभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्यादिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील. ४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या

www.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०४२०२००३३८८४२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक 

सह सचिव, महाराष्ट्र शासन

राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत परिपत्रक दिनांक २० एप्रिल २०२३ Shala Sutti Jahir Karane Suru Karne GR
राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत परिपत्रक दिनांक २० एप्रिल २०२३ Shala Sutti Jahir Karane Suru Karne GR

Leave a Comment

error: Content is protected !!