Science Exhibition Prize Increase
Science Exhibition Prize Increase
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षिस रक्कमेत भरघोस वाढ शासन निर्णय
Science Fair award trophy reward medal and accolade GR
Increase in prize money for winners of state-level science exhibition
Huge increase in prize money for winners of state-level science exhibition
Rajyastariy Vidnyan Pradarshani Bakshis Rakkam Vadh
Increasing the prize money in the state-level science exhibition
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षीसाच्या रकमेत वाढ करणे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र. १४६/एस.डी-१, मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०००३२
दिनांक: २४ मार्च, २०२६.
वाचा
(१) संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशि विद्या प्राधिकरण), नागपूर यांचे पत्र जाक्र, रा.वि. शि.सं (प्रा.वि.प्रा.३/५२ राबविप्र २०२५/प्रशा-१, दि.२६.०२.२०२५.
(२) मा. मंत्रिमंडळाची बैठक, दि. १० फेब्रुवारी, २०२६.
(३) मा. मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त, दि. २५ फेब्रुवारी, २०२६.
प्रस्तावना:
विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि गणित विषयातील सर्जनशीलता, कल्पकता व नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन हा या उपक्रमांचा एक भाग आहे. राज्यपातळीवर गुणानुक्रमे निवडलेल्या निवडक प्रदर्शनीय वस्तूंची निवड पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी करण्यात येते. राज्यस्तरीय प्रदर्शनाची सुरुवात ही तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात. दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर ही संस्था समन्वयक यंत्रणा / संस्था म्हणून काम करते.
२. राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये संशोधनाच्या गुणवत्तेमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सद्यस्थितीत केंद्र शासनामार्फत INSPIRE, Bulldathon, Hackathon यांसारखे विज्ञानावर आधारित उपक्रम व स्पर्धा राबविण्यात येत आहेत. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. यामध्ये वैज्ञानिक पद्धतीवर भर देऊन शालेय शिक्षणात अधिक खेळ व शोधावर आधारित अध्ययन शैलीच्या दिशेने निश्चित बदल करण्याचा समावेश आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधील बक्षीस पात्र विद्यार्थी / शिक्षक / प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांना वितरित करण्यात येणाऱ्या बक्षीसाच्या रकमेमध्ये वाढ करण्याच्या विभागाच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. १० फेब्रुवारी, २०२६ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यास अनुसरून संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झाले आहे. प्राप्त मान्यतेनुसार, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षीसाच्या रकमेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये बक्षीस पात्र विद्यार्थी / शिक्षक / प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर यांना मिळणाऱ्या रोख बक्षिसाच्या रक्कमेमध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून वाढ करण्यास तसेच, बक्षीसपात्र प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर या गटातील आदिवासी, दिव्यांग प्रवर्गातील द्वितीय, तृतीय, चतुर्थ व उत्तेजनार्थ गटातील द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनाही पुढीलप्रमाणे रोख बक्षीस वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
प्रस्तावित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या पारितोषिकाच्या रकमेचे विवरण
प्राथमिक विद्यार्थी गट
माध्यमिक विद्यार्थी गट
शिक्षक गट
प्रथम क्रमांक
व्दितीय क्रमांक
(एक)
५१००० ५१०००0
सर्वसाधारण आदिवासी दिव्यांग सर्वसाधारण
आदिवासी दिव्यांग प्राथमिक माध्यमिक
२. सदर निधी मागणी क्र. ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक शिक्षण, १०७ शिक्षक प्रशिक्षण, (०२) अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (०२) (०६), राज्य विज्ञान संस्थांना त्या चालवित असलेल्या अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय् (कार्यक्रम), (२२०२ एच ८६६), ३१-सहायक अनुदाने, (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली आर्थिक वर्षात नमूद लेखाशिषातील उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून भागविण्यात यावा.
३. सदरचा शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १० फेब्रुवारी, २०२६ रोजीच्या बैठकीत
दिलेल्या मंजूरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०३२४१६४४१५९५२१ असा आहे. हा शासन
निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
TUSHAR VASANT
MAHAJAN
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
ALSO READ 👇
मंगळवार दि. १० फेब्रुवारी, २०२६
मंत्रिमंडळनिर्णय,CabinetDecision,
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षिस रक्कमेत भरघोस वाढ
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
विद्यार्थ्यांतील विज्ञान आणि गणित विषयातील सर्जनशीलता, कल्पकता आणि नाविन्य वृत्तीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन आय़ोजित करण्यात येते. या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी राज्यस्तरीय प्रदर्शनातील विजेत्यांच्या उपकरणांना पाठविण्यात येते. राष्ट्रीय़ विज्ञान प्रदर्शनात जास्तीत जास्त कल्पक उपक्रमांचा समावेश व्हावा यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांच्या रक्कमेत वाढ करण्यात आली. सध्या केंद्र सरकारकडून इन्स्पायर, बिल्डॅथॅान, हॅकॅथाँन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे. यामध्य़ेही राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्यात येत आहे.
हॅकॅथाँन बद्दल जाणून घ्या अधिक या ओळीला स्पर्श करून
इन्स्पायर अवार्ड बद्दल जाणून घ्या अधिक या ओळीला स्पर्श करून
बिल्डॅथॅान बद्दल जाणून घ्या अधिक या ओळीला स्पर्श करून
प्राथमिक विद्यार्थी, माध्यमिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर यांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. वरील सर्व गटात सर्वसाधारण, आदिवासी आणि दिव्यांग गटात बक्षिस दिले जाणार आहे. सर्व गटासाठी बक्षिसाची रक्कम पुढीलप्रमाणे- प्रथम- ५१ हजार, व्दितीय- ३१ हजार. तृतीय २१ हजार, चतुर्थ- ११ हजार. उत्तेजनार्थ तीन- प्रत्येकी दहा हजार रुपये.

