शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत अंतर्गत बिल्डॅथॉन २०२५ अभियान राबविणेबाबत BUILDATHON 2025 Registrations Link

BUILDATHON 2025 Registrations Link

BUILDATHON 2025 Registrations Link

विषय :- राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी VIKSIT BHARAT अंतर्गत BUILDATHON 2025 अभियान राबविणेबाबत…

उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशन यांचा संयुक्त उपक्रम विकसित भारत या अभियान राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी च्या प्रत्येक विद्यार्थ्याने विकसित भारत अंतर्गत BUILDATHON 2025 साठी नवे विचार मांडणेविषयी सूचित करण्यात आलेले आहे.
यानुसार,

1) VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अंतर्गत आत्मनिर्भर भारत, स्वदेशी Vocal for Local, आणि  समृध्द भारत या चार संकल्पना वर आधारित आहे.

2) यामध्येत 5 ते 7 विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग नोंदवणे आवश्यक आहे सदरील विद्यार्थी हे इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गातील असावेत.

3)  सदरील स्पर्धा दोन प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे

1. Idea Submission: कल्पना (२ मिनिटांचे लघु व्हिडिओ)

2.Prototype Submission: प्रोटोटाईप/मॉडेल (व्हिडिओ स्वरूपात)

4) व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांनी जगातील वास्तव आव्हानांवर मात करण्यासाठी विविध संकल्पना सुचवाव्यात.

5) व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांनी फिजिकल व डिजिटल बाबत काम करण्यासाठी आपल्या संकल्पना सुचवाव्यात.

6) सदरील अभियानामध्ये शिक्षकांनी आपल्या शाळेतील अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नोंदणी व प्रकल्प अपलोड मदत, विद्यार्थ्यांना थीम समजावणे.

7) सदरील अभियानामध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अभियानामध्ये प्रोत्साहन देणे, नोंदणी/प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन करणे, स्पर्धा व उपक्रम आयोजित करणे.

8) VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अंतिम दिनांक 6 ऑक्टोबर 2025 आहे. याची विधार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.

9) जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख यांना सदरील अभियान 100 टक्के शाळांनी नोंदणी सहभाग करणेसाठी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आपल्या अंतर्गत येणार्याा सर्व शाळांना सूचना देणे, सहभागाचे निरीक्षण करणे, प्रचार उपक्रम राबवणे.

10) सदरील अभियानामध्ये जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीयस्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

11) या अभियानामध्ये पुढीलप्रमाणे टप्पे देण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी

• २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर: नोंदणी

• १३ ऑक्टोबर: Live Innovation Event

• १३ ऑक्टोबर – ३१ ऑक्टोबर: प्रकल्प नोंदणी व सादरीकरण

• नोव्हेंबर–डिसेंबर: मूल्यमापन

• जानेवारी २०२६: निकाल व विजेत्यांचा सत्कार

12) मूल्यमापन निकष-
• कल्पनेची नवीनता व मौलिकता
• विस्तारक्षमता व उपयुक्तता
• शाश्वतता व सामाजिक परिणाम
• प्रत्यक्षात अंमलबजावणीची शक्यता
• Atmanirbhar Bharat, Swadeshi, Vocal for Local, and Samriddh Bharat या ४ थीम्सशी सुसंगतता.

राष्ट्रीय स्तरावर १० विजेते

राज्यस्तरावर १०० विजेते
घोषित केले जाणार आहेत…..

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता सहावी ते बारावीच्या जास्तीत जास्त शाळांची नोंदणी करून घ्यावी व सक्रिय सहभाग नोंदवावा.

नोंदणी लिंक 🔗

सोबतच नोंदणी व्हिडीओ अधिकच्या मार्गदर्शनास्तव

(महेश पालकर)
शिक्षण संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य पुणे

BUILDATHON 2025 Registrations Link
BUILDATHON 2025 Registrations Link

प्रति,
1) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
2) शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व
3) शिक्षण निरीक्षक बृन्हमुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
4 ) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व
5 ) उपशिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सर्व
6) मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये.

विषय: “Viksit Bharat Buildathon 2025” बाबत

संदर्भ : १) महाराष्ट्र शासनाचे पत्र क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र. २५२/एस. डी. ४, दि. २२/०९/२०२५
२) अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र, दिनांक १८-०९-२०२५

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे, अटल इनोव्हेशन मिशन (AIM) व नीती आयोग यांच्या सहकार्याने, दि. १३ ऑक्टोबर, २०२५ रोजी "विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५ (Viksit Bharat Buildathon२०२५)" चे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते २३ सप्टेंबर, २०२५ रोजी करण्यात आले आहे.

दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ४०० विद्यार्थ्यांसह विज्ञान भवन येथे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल लाईव्ह बिल्डाथॉनचे उद्घाटन होणार आहे; त्याचवेळी देशभरातील १ कोटी विद्यार्थ्यांद्वारे एकाचवेळी नवोपक्रम केले जाईल.

सदर "विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५ (Viksit Bharat Buildathon२०२५) उपक्रमांमध्ये सरकारी, अनुदानित व खाजगी शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी इत्यादींना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्या.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे, राभेची लिंक खालीलप्रमाणे आहे.

Topic: Viksit Bharat Buildathon 2025
Time: Oct 1, 2025 04:00 PM India.
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/845003561677pwd=O3cdwVtt1yal3UJJqaASEwgWBEnpLT.1
Meeting ID: 845 0035 6167

Passcode: 953989

सदर ऑनलाईन व्हिडोओ कॉन्फरेन्ससाठी आपण उपस्थित रहावे, तसेच सदर Viksit Bharat Buildathon २०२५ या उपक्रमाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात यावी.

उपसंचालक (प्रकल्प/प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.

Leave a Comment

error: Content is protected !!