Class 12th Exam 2027 Application Forms Dates Apply Link
Class 12th Exam 2027 Application Forms Dates Apply Link
HSC Std 12th Exam 2027 Application Forms Dates
HSC EXAM FEB MAR 2027 ONLINE APPLICATION LINK
std12th exam 2027 date scheduled online apply link
Regarding the dates for submission of application forms for the Higher Secondary Certificate (std 12th) February March 2027 examination
• प्रकटन •
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near e-Balbharti, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे स.न.८३२-ए. फा.प्लॉ.नं. १७८.१७९. ई बालभारती शेजारी, आधारकर रिसर्च इन्स्टिटयूटच्या मागे भांबुर्डा शिवाजीनगर पुणे ४११००
महत्त्वाचे
क्र.रा मं. / परीक्षा-३/3455 पुणे
दिनांक-१३/०८/२०२६
प्रति,
विभागीय सचिव, सर्व विभागीय मंडळे.
संदर्भ – रा.मं/ले. पे०६/परीक्षा शुल्क २०२५-२६/१८६६, दि.०५/०५/२०२६ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणालीमधील PFN-ID वरून न घेता २०२५-२६ ला प्रवेशित इ. ११ वी (FYJC) च्या Online data वरून popup करून भरून घेण्यात येणार आहे. MCVC व ITI च्या विद्यार्थ्यांचा data, online FYJC मध्ये उपलब्ध नाही त्यांनी थेट आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त ज्यांचा data, FYJC online मध्ये उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळात समक्ष जावून आवश्यक ती माहिती सादर करणे आवश्यक आहे.
सदरची आवेदनपत्रे
या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे
शुल्क प्रकार
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे व शुल्क भरावयाच्या तारखा
नियमित शुल्क – शुक्रवार, दिनांक- १४/०८/२०२६ ते शनिवार, दिनांक- ३१/१०/२०२६
विलंब शुल्क – रविवार, दिनांक- ०१/११/२०२६ ते – रविवार, दिनांक- १५/११/२०२६
अतिविलंब शुल्क – (प्रति विद्यार्थी प्रति दिन -५०/-) – सोमवार, दिनांक-१६/११/२०२६ ते सोमवार, दिनांक- ३०/११/२०२६
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित पद्धतीने शुल्क भरावयाच्या तारखा
सोमवार दिनांक -३१/०८/२०२६ ते सोमवार दिनांक-३०/११/२०२६
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी शुल्क पावती, विद्यार्थ्यांच्या प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख – सोमवार दिनांक -०७/१२/२०२६
सर्व उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळाप्रमुख / प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ.१२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत-
१. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणाली मधील PFN-ID वरून न घेता २०२५-२६ ला प्रवेशित इ. ११ वी (FYJC) च्या Online data वरून popup करून भरून घेण्यात येणार आहेत. MCVC व ITI च्या विद्यार्थ्यांचा data, online FYJC मध्ये उपलब्ध नाही त्यांनी थेट आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे त्याव्यतिरिक्त ज्यांचा data, FYJC online मध्ये उपलब्ध नाही. अशा विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळात समक्ष जावून आवश्यक ती माहिती सादर करणे आवश्यक आहे. विभागीय मंडळांनी त्या माहितीच्या आधारे soft data तयार करावा व तो पोर्टलवर upload केल्यानंतर त्यांना आवेदनपत्रे भरता येतील. याबाबतची sop सर्व विभागीय मंडळांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
२. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्यांची माहिती FYJC online मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.
३. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी.
४. २०२६ च्या आवेदनपत्रातील फोटोमध्ये अनेक त्रुटी होत्या. फेब्रुवारी मार्च २०२६ परीक्षेपासून गुणपत्रक व प्रमाणपत्रावर फोटो छपाई होत असल्यामुळे सोबत जोडलेल्या सूचनाप्रमाणे फोटो upload करणेबाबत सूचना देणे, त्याचप्रमाणे प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर फोटो व विषयामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे फोटोबाबतच्या सविस्तर सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत.
५. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी Website द्वारे ठराविक संख्येने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कमेचा SBI बँकेच्या Online पेमेंट गेटवेद्वारे अचूक रक्कमेचा भरणा करावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्याच्या application status मध्ये ” Draft” चा “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” चा “Paid” असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी, अशा “Send to Board” व “Paid” Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही,
६. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकाच्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. यांची दक्षता घ्यावी.
७. उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्याथ्यांचे Status Update होईल.
८. आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेमध्ये असंख्य त्रुटी आढळतात. त्यामुळे prelist वर अथवा आवेदनपत्राच्या print out वर विद्यार्थ्यांची / पालकांची स्वाक्षरी घ्यावी.
९. आवेदनपत्रातील चुका टाळण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी अनेक दुय्यम login, college च्या main login मध्ये तयार करून computer lab मध्ये विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रे भरून मुख्य login द्वारे त्याची तपासणी करावी.
१०. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
११. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
उपरोक्त सर्व बाबी विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
(मा. अध्यक्ष यांच्या मान्यतेने)
(डॉ. दिपक माळी) सचिव, राज्य मंडळ पुणे-०४
प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी-
१. व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ, पुणे.
२. समन्वयक ऑनलाईन विभाग, राज्यमंडळ, पुणे.
३. अस्वीस, सस्वीस, राज्य मंडळ, पुणे.
४. लेखा शाखा, राज्य मंडळ, पुणे
Photo Instructions
परीक्षेसाठी फोटो अपलोड करताना व्यावसायिकरित्या काढलेला रंगीत पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. फाईलचे स्वरूप JPG असावे आणि आकार 25 KB ते 40 KB च्या दरम्यान असावा (जास्तीत जास्त 40 KB पर्यंत), फोटो गेल्या ६ महिन्यांत काढलेला असावा.
छायाचित्रासाठी महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे
१. स्वरूप आणि गुणवत्ता (Format & Quality):
फोटो हाय-क्वालिटी आणि स्पष्ट रंगाचा असावा.
फोटोचा पार्श्वभाग (Background) पांढरा किंवा साध्या रंगाचा असावा.
२. विद्यार्थ्यांचे स्वरूप (Student Appearance):
१. विद्यार्थ्यांचा चेहरा स्पष्ट आणि समोर असावा. दोन्ही डोळे आणि कान उघडे असावेत.
२. चेहरा पूर्णपणे दिसत असावा (चेहऱ्यावर केस किंवा मास्क नसावा).
३. विद्यार्थ्याने शक्यतो अधिकृत शालेय गणवेश घातलेला असावा.
४. जर विद्यार्थी चष्मा लावत असेल, तर डोळ्यांवर प्रकाश पडून फोटो खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
३. तंत्रज्ञानाची माहिती (Technical Details):
१. फोटो JPEG (.jpg) फॉरमॅटमध्येच सेव्ह केलेला असावा. इतर FORMAT मधील (.PNG, BMP) फाईल JPG म्हणून RENAME करू नये.
२. फाईलचा आकार 25 KB ते 40 KB दरम्यान असावा.
आवेदनपत्रे मंडळाकडे पाठविल्यानंतर व प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर कोणताही फोटो बदलता येणार नाही.
