School Safety Audit
School Safety Audit
Shala Suraksha Mulyankan
Shlala Suraksha Ankeshan
rajyatil sarv shalanche suraksha mulyankan (Safety Audit) karnyababat paripatrak
Regarding the safety audit of all schools in the state GR Circular
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्रमांक : प्राशिसं-२०२६/८०२
प्रति,
दि. Digital Signed Date
१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व),
२. शिक्षणाधिकारी / शिक्षण प्रमुख / प्रशासन अधिकारी, मनपा/नप/नपा (सर्व)
विषय : राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा मुल्यांकन (Safety Audit) करण्याबाबत
संदर्भ : १) शासन पत्र समक्रमांक- न्यायाप्र-१३२५/प्र.क्र. २०४/एस.एम.१ दि. २८/०८/२०२५
२) राष्ट्रीय मानवधिकार आयोग, नवी दिल्ली, यांचे पत्र क्र. २२९५/२०/१७/२०२५ दि. ११/०५/२०२६
३) शासन पत्र क्र. न्यायप्र-१३२५/प्र.क्र.२०४/एसएम-१ दि.२९/०५/२०२६
४) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/Safety Audit/२०२६/१९५५८२८, दि. ११/०६/२०२६
५) म.प्रा.शि.प. मुंबई, यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि/बांधकाम/२०२६-२७/१५२५ दि.२२/०४/२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सर्व संदर्भीय पत्रांचे अवलोकन व्हावे.
उपरोक्त संदर्भीय विषायांनुसार राजस्थान मधील झालावाड जिल्ह्यातील दुर्देवी घटनेच्या पाश्र्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवा दिल्ली यांनी राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा मुल्यांकन (Safety Audit) करुन त्याचा कृती अहवाल (Action Taken Report) सादर करण्याबाबत कळविले आहे. उपरोक्त प्रकरणिकेबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबत मा. मुख्य सचिव कार्यालयाने निर्देश दिले आहेत.
शासनाने संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये राष्ट्रीय मानविकार आयोगाच्या खंडपीठाने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व शाळांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सर्व व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना सर्व सरकारी शाळांचे इमारतींचे सुरक्षा मुल्यांकन (Structural Audit) तात्काळ करणेबाबत, तसेच विहीत कालमर्यादेत प्राथम्य क्रमानुसार शाळा दुरुस्ती बाबत आराखडा तयार करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत कळविले आहे.
शासनाने संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रान्वये राष्ट्रीय मानवधिकार आयोगास राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा मुल्यांकन आवश्यक असल्याबाबत मा. आयुक्त शिक्षण यांनी कळविले आहे. राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा मुल्यांकन Manual of safety & security in school मधील तरतुदीनुसार होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून कार्यवाही होणेबाबत कळविले आहे.
मा. आयुक्त कार्यालयाच्या संदर्भ क्र. ४ च्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे उपरोक्त संदर्भीय पत्रातील मार्गदर्शक सुचनेनुसर राज्यात सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे सुरक्षा मुल्यांकन (Manual of Safety & Security in School) मधील तरतुदीनुसार होणे आवश्यक आहे.
आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे सुरक्षा मुल्यांकन (Manual of Safety & Security in School) मधील तरतुदीनुसार करण्यासाठी तात्काळ मा. आयुक्त महानगरपालिका, मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मुख्याधिकारी (नपा/नप) यांच्याशी संपर्क व समन्वय साधून कार्यवाही करावी. याबाबत सविस्तर सूचना यापूर्वीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी दिलेले असल्याने याबाबत जिल्हास्तरावरील संनियंत्रण आपल्या कार्यालयातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत यंत्रणेद्वारे करुन याबाबत कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शाळा निहाय / तालुका निहाय / व्यवस्थापन निहाय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करावा.
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 17-07-2026 14:27:58
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 17-07-2026 14:05:01
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रतः माहिती व कार्यवाहीस्तव :
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२/- यांना कळविण्यात येते की आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे सुरक्षा मुल्यांकन Manual of Safety & Security in School मधील तरतुदीनुसार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधावा. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्या कार्यालया मार्फत जिल्हा निहाय / व्यवस्थापन निहाय संचालनालयास सादर करावा. सदर कामकाजाबाबत वैयक्तिक लक्ष घालून कार्यवाही करावी.
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे ०१
