SCERT Vishay Sahayak Pad Bharti Link
SCERT Vishay Sahayak Pad Bharti Link
SCERT MAHARASHTRA Recruitment process for the post of Subject Assistant
जा.क्र. राशैसंप्रपम/आस्था-उसनवारी/२०२६
दिनांक:-२८/१०/२०२६.
विषयः- विषय सहायक पदे उसनवारी तत्वावर भरण्याबाबत
संदर्भ :- १
) शासन निर्णय क्रमांक डायट-४५१६/(४०/१६) प्रशिक्षण, दिनांक १७ ऑक्टोबर २०१६
२) शासनाचे पत्र क्र. ६६७४३२, दिनांक ०५/१०/२०२६.
३) मा. संचालक यांच्या दि.२६/१०/२०२६ रोजीची मान्य टिप्पणी
वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, “विषय सहायक” पदे उसनवारी तत्वावर भरण्याबाबतची लिंक या कार्यालयाचे www.maa.ac.in या वेबसाईटवर “विषय सहायक निवड प्रक्रिया” या टॅबवर दिनांक २८.१०.२०२६ रोजी सकाळी १०.०० पासून दिनांक १५.११.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तरी, सदर विषयाच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, शासकीय, स्थानिक स्वराज्य शाळा व अध्यापक विद्यालयातील नियमित शिक्षकांना सदर लिंक www.maa.ac.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली असल्याबाबत कळविण्यात यावे.
Digitally signed by Jyoti Balasaheb Shinde Date: 28-10-2026 17:12:27
उपसंचालक
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

SCERT विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया
विषय सहायक पद लिंक
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत “विषय सहायक पदे” शासन पत्र दिनांक २६.०५.२०२५ व दिनांक ३१.०७.२०२५ अन्वये उसनवारी तत्वावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयासाठी एकूण १० पदे, सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (गडचिरोली वगळून) ३३ पैकी ३१ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेसाठी प्रत्येकी ०३ या प्रमाणे ९३ पदे व जिल्हा शिक्षण संस्था लातूर करिता ०१ पद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव करिता ०२ पदे असे एकूण ३३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकरिता ९६ पदे तसेच, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई – १० पदे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर- ०४ पदे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर-०५ पदे अशी एकूण १२५ विषय सहायकांची पदे उसनवारी तत्वावर भरावयाची आहे परिषदेच्या www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या “विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया” या टॅबव्रर दिनांक ०७.०८.२०२५ रोजी सकाळी १०.०० पासून ते दिनांक १५.०८.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत अर्ज सादर करावेत.
विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया
१ जाहिरात लिंक्स Open
२ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण (नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई) येथे “विषय सहायक” पदासाठी ही लिंक भरावी Open
३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (गडचिरोली वगळता) येथे “विषय सहायक” पदासाठी ही लिंक भरावी Open