समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील 0 ते 18 वयोगटातीन दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणेबाबत Samaveshit Shikshan Upkram

Samaveshit Shikshan Upkram

Samaveshit Shikshan Upkram

Inclusive Education Initiatives

Regarding conducting a survey of disabled students aged 0 to 18 in the academic year 2026-27 under the Inclusive Education Initiative.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/आयई/2026-27/

दिनांक साक्षांकित

विषय: समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील 0 ते 18 वयोगटातीन दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणेबाबत.

संदर्भ : या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप / समग्र शिक्षा/IE/2026-27/1553, दि.23 एप्रिल 2026 रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय विषयानुसार समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दि. 15 जून 2026 रोजी विदर्भ विभाग वगळता उर्वरीत जिल्ह्यात शाळा सुरु झालेल्या आहेत. उपरोक्त नमुद नुसार 0 ते 18 वयोगटातील विशेष गरजाधारक दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण दिलेल्या मुदतीत म्हणजेच दि. 10 जुलै, 2026 पर्यंत 100% पूर्ण करणेबाबत कळविले आहे. तरी विहित मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी केंद्रात समायोजन झालेल्या सर्व १००% विशेष शिक्षकांना (केंद्रस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर) त्यांना नेमून दिलेल्या केंद्रात सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत तात्काळ सूचना निर्गमित करण्यात याव्या.
सर्वेक्षण दरम्यानची दि. 15 जून ते 10 जुलै, 2026 रोजी पर्यंतचा दैनंदिन अहवाल पुढील नमूद प्रपत्रात सादर करावा.

अ.क्र. जिल्हा/मनपा तालुका संख्या केंद्र संख्या विशेष शिक्षक संख्या दिनांक 0 ते 6 वयोगट इ.1 ली ते 8 वी इ.9 वी ते 12 वी एकूण

यु-डायस 2026-27 च्या प्रवेश प्रक्रीयेच्या अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती भरणे आवश्यक आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील सर्वेक्षणामुळे राज्यात यु-डायस

प्रणालीमध्ये 14 हजार दिव्यांग विद्यार्थ्यांची वाढ झाली होती. त्यामुळे सर्वेक्षणाचे महत्व पाहता आपण आपल्या स्तरावरुन सर्व १००% विशेष शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षण करण्याकरिता तत्काळ आदेशित करावे.
तसेच सर्व स्तरावरील विशेष शिक्षक यांना सर्वेक्षण व्यतिरिक्त कोणतेही जिल्हा किंवा तालुका स्तर कामकाज वाटप देण्यात येऊ नये. सर्वेक्षण दरम्यान सर्व दिव्यांग विद्यार्थी यु-डायस प्रणालीमध्ये नोंद होतील याबाबत केंद्रातील नेमून दिलेल्या विशेष शिक्षक यांनी मुख्याध्यापक यांच्यासोबत समन्वय साधून प्रणाली मध्ये सर्वेक्षण नुसार आढळून आलेले सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करुन द्यावी व नोंद झाल्याची खात्री करावी.

केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रात 100% दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे याची खातरजमा करुन केंद्र प्रमुख व संबधित विशेष शिक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रमाणित केलेला एकत्रित अहवाल सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र-अ नुसार आपल्यास्तरावर सादर करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तसेच प्राप्त सर्व केंद्राचे सांख्यिकीय अहवाल एकत्रीकरण करून या कार्यालयास जिल्हास्तरीय अहवाल आपल्या स्वाक्षरीने दिनांक १५.०७.२०२६ रोजी सादर करावा. तसेच आपल्या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या format मध्ये माहिती सादर करावी.

सदर सर्वेक्षण कालावधीत ० ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहिल्यास विद्यार्थ्यास मिळणाऱ्या सेवा सुविधांपासून वंचित राहील त्यामुळे याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

सादर करावा. तसेच आपल्या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या format मध्ये माहिती सादर करावी.
सदर सर्वेक्षण कालावधीत ० ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहिल्यास विद्यार्थ्यास मिळणाऱ्या सेवा सुविधांपासून वंचित राहील त्यामुळे याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

Digitally signed by Devidas Balkrishna Kulal Date: 25-06-2026 18:21:10

सोबत :- format व परिपत्रक साठी या ओळीला स्पर्श करा

(देविदास कुलाळ) सहसंचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई
प्रत माहितीस्तवः-
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) मा.शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालनालय, पुणे.
प्रति,
1) शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
2) शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी महानगरपालिका, सर्व.

Samaveshit Shikshan Upkram
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील 0 ते 18 वयोगटातीन दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणेबाबत Samaveshit Shikshan Upkram

Leave a Comment

error: Content is protected !!